डीएसीची अर्थात संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक 29 जुलै 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विविध भांडवल अधिग्रहण प्रस्तावांवर या बैठकीत विचार करण्यात आला. याशिवाय भारतीय लष्कराच्या सशस्त्र लढाऊ वाहनांसाठी प्रगत लँड नेव्हिगेशन प्रणालीच्या खरेदीसाठी आवश्यक मान्यता देण्यात आली. ही प्रणाली उच्च दर्जाच्या एन्क्रिप्शनसह कुठल्याही फसवणुकीपासून सुरक्षित आहे. याबरोबरच भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढवण्यासाठी, डीएसीने समुद्रात उथळ पाण्यात कारवाई करण्यास सक्षम असलेल्या अत्याधुनिक प्रणालीने सुसज्ज 22 इंटरसेप्टर बोटींच्या खरेदीसाठी आवश्यक मंजुरी दिली.
ALNS Mk-II हे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GLONASS) व्यतिरिक्त भारतीय प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली, भारतीय नक्षत्र (IRNSS, NavlC) वापरून नेव्हिगेशन या प्रणालींशी सुसंगत आहे. ALNS Mk-II संरक्षण मालिकेतील नकाशांशी सुसंगत आहेत , ज्यामुळे सशस्त्र लढाऊ वाहनांसाठी नेव्हिगेशनल ॲप्लिकेशन्समध्ये उच्च पातळीची अचूकता येते. हे उपकरण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), चेन्नईकडून भारतात रचना, विकास आणि निर्मिती [lDDM] श्रेणी अंतर्गत खरेदी केले जाईल.
बीईएलची प्रगत लँड नेव्हिगेशन प्रणाली ही रिंग लेसर गायरो (आरएलजी) आधारित नेव्हिगेशन प्रणाली आहे. ते ईएसएम स्वरूपात लष्करी नकाशाच्या निर्देशांकांद्वारे परिभाषित केलेल्या मार्गावरून जाते. नेव्हिगेशन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, प्रणाली जडत्वीय, जीपीएस आणि संकरित नेव्हिगेशन डेटा प्रदान करते. हे गतिशीलपणे वाहनाची सध्याची स्थिती अद्ययावत करते आणि वाहनाच्या कमांडर आणि चालकाला मार्गदर्शन करत निवडलेल्या गंतव्यस्थानावर पोहोचते.
भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढवण्यासाठी, डीएसी ने समुद्रात उथळ पाण्यात कारवाई करण्यास सक्षम असलेल्या अत्याधुनिक प्रणालीने सुसज्ज 22 इंटरसेप्टर बोटींच्या खरेदीसाठी आवश्यक मंजुरी दिली. या बोटी वैद्यकीय उपयोगाबरोबरच स्थलांतर करण्यासह किनारपट्टीवर देखरेख करणे आणि गस्त घालणे, शोध आणि बचाव कार्यासाठी वापरल्या जातील.
टीम भारतशक्ती