डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस यांच्यातील डिबेट येत्या 4 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी उशिरा ट्रूथ सोशलवरील पोस्टमध्ये दिली.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष जो बिडेन यांचा उल्लेख करताना सांगितले की, “स्लीपी जो यांच्याशी झालेल्या माझ्या डिबेटमधील नियमांसारखेच यावेळचे नियम असतील. खरंतर बायडेन यांना त्यांच्या पक्षाने अत्यंत वाईट वागणूक दिली आहे. त्यानंतरच त्यांनी पुर्ननिवडणूक लढवण्यापासून माघार घेतली.”
हॅरिसही तयार
डिबेट संदर्भातील ही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर काहीच वेळात हटवण्यात आली होती. त्यानंतर ती पुन्हा पोस्ट करण्यात आली. त्यामागचं कारण देताना जर हॅरिस “चर्चा करण्यास इच्छुक नसतील किंवा असमर्थ असतील” तर त्या तारखेचा “प्रमुख” टाऊन हॉलच्या मेळाव्याच्या प्रस्तावावर बोलण्यात काही अर्थ नाही असा विचार करून रिपब्लिकन पक्षाच्या ट्रम्प यांनी ती पोस्ट काही काळासाठी हटवली होती
फॉक्स न्यूजने 17 सप्टेंबर रोजी दोन्ही उमेदवारांमधील अध्यक्षीय चर्चेचा प्रस्ताव ठेवल्यानंतर उपाध्यक्ष हॅरिस यांनी गेल्या महिन्यात उत्तर दिले होते की त्या “तयार” आहेत.
21 जुलै रोजी बायडेन यांनी शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर आणि हॅरिस यांना पाठिंबा दिल्यानंतर, ट्रम्प म्हणाले की ते हॅरिस यांच्यासोबत डिबेटमध्ये भाग घेणार नाहीत कारण त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार नाहीत.
बराक यांचा पाठिंबा
हॅरिस यांना त्यांच्याच पक्षातून पाठिंबा मिळत नसल्याचा पुरावा म्हणजे, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप हॅरिस यांच्या नावाला मान्यता दिलेली नाही असे ट्रम्प यांनी म्हटले होते. पण एका दिवसातच ओबामांनी आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आणि शुक्रवारी हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे नामांकन मिळवण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिनिधी मते मिळवली.
जूनमध्ये सीएनएनवर ट्रम्प यांच्याविरुद्ध झालेल्या डिबेटमधील निराशाजनक कामगिरीनंतर बायडेन राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले. दुसरी डिबेट सप्टेंबरमध्ये एबीसी टेलिव्हिजनवर होणार होती, परंतु बायडेन शर्यतीतून बाहेर पडल्याने, आता या डिबेटमध्ये हॅरिस यांचा समावेश होणे अपरिहार्य आहे कारण त्यांनी अध्यक्षपदासाठी आवश्यक डेमोक्रॅटिक उमेदवारी देखील जिंकली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या वांशिकतेवर अलिकडेच प्रश्नचिन्ह उपस्थित करत दावा केला आहे की त्या अलीकडेच “कृष्णवर्णीय” झाल्या आणि त्यांना आपल्या द्वि-वांशिक उत्पत्तीबद्दल माहिती नव्हती. शिकागोमधील कृष्णवर्णीय पत्रकारांसोबतच्या एका कार्यक्रमात, त्या भारतीय आहे की कृष्णवर्णीय? असा प्रश्न आपल्याला पडल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.
त्यांच्या या वक्तव्यांचे तीव्र पडसाद उमटले आणि व्हाईट हाऊसने त्यांचे वर्णन “तिरस्करणीय आणि अपमानास्पद” असे केले.
सूर्या गंगाधर
(रॉयटर्स)