भारतीय हवाई दलाकडून 200 अस्र मार्क1 क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला मंजुरी

0
हवाई

भारतीय हवाई दलाने स्वदेशी क्षेपणास्त्र निर्मिती क्षमतांना चालना देण्याच्या उद्देशाने, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेडला (बीडीएल) 200 अस्त्र मार्क1 या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली आहे.

अस्त्र मार्क1 ही क्षेपणास्त्रे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केली आहेत तर बीडीएलकडून त्यांचे उत्पादन केले जाणार आहे.

भारतीय हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी अलीकडेच हैदराबादला दिलेल्या भेटीदरम्यान बीडीएलला उत्पादन मंजुरी देण्यात आली, असे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

“आयएएफच्या उपप्रमुखांनी डीआरडीओच्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेला भेट दिली होती, जी अस्त्र क्षेपणास्त्रांसाठीची विकास संस्था आहे,” असे त्यांनी सांगितले.

ही क्षेपणास्त्रे रशियनच्या मूळ एसयू-30 तसेच स्वदेशी एलसीए तेजास लढाऊ विमानांच्या निर्मितीनंतर त्यांच्यात समाविष्ट केली जातील.

क्षेपणास्त्रांसाठी काम करणाऱ्या अनेक स्वदेशी प्रकल्पांना भारतीय हवाई दल मदत करत आहे. हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांबरोबरच असे तीन ते चार प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलातर्फे अस्त्र प्रकल्पाचे काम हळूहळू प्रगतीपथावर जाणार असून सध्या ते सुमारे 130 किमीवरील शस्त्र प्रणाली मार्क 2 ची चाचणी घेण्याच्या विचारात आहेत.

300 कि. मी. ची मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या अस्त्रची चाचणी आणि विकास करण्याचीही योजना आहे.

आय. ए. एफ. आणि भारतीय नौदलाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने या कार्यक्रमाला मंजुरी दिली होती, ज्या अंतर्गत दोन्ही सेवांसाठी 248 क्षेपणास्त्रे तयार करणे अपेक्षित होते.

हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची ही मालिका अस्त्र कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश भारतीय सशस्त्र दलांची हवाई लढाऊ क्षमता वाढवणे हा आहे. मार्क 2 चा पूर्ववर्ती असलेले अस्त्र मार्क 1 क्षेपणास्त्र यापूर्वीच भारतीय हवाई दल आणि नौदल या दोन्ही दलांमध्ये यशस्वीरित्या समाविष्ट करण्यात आले आहे.

आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सह)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here