Apple चा नवीन बजेट iPhone; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

0

Apple आपल्या नवीन, ‘बजेट iPhone’ मॉडेलच्या लाँचिगसाठी सज्ज आहे. मिड-रेंज स्मार्टफोन बाजारातील वाढत्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवण्याठी आणि सॅमसंग, हुआवेई सारख्या प्रतिस्पर्ध्यांपाना टक्कर देण्यासाठी Apple हा नवा बजेट फ्रेंडली आयफोन बाजारात उतरवत आहे.

किफायतशीर मॉडेल्सची चौथी पिढी असलेली- iPhone SE सिरीज, आता ती Android स्मार्टफोनशी स्पर्धा करत आहे, जेव्हा ग्राहक त्यांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये AI- कृत्रिम बुद्धिमत्ता टूल्स समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत.

2022 मध्ये लाँच झालेल्या, iPhone SE ची किंमत $429 डॉलर (सुमारे 37-38 हजार INR) इतकी आहे. मात्र लाँच होत असलेल्या त्याच्या नवीन मॉडेल किंमत, तुलनेने प्रीमियम असण्याची शक्यता आहे. iPhone 16, जो सप्टेंबरमध्ये लाँच झाला, त्याची सुरूवातीची किंमत $799 डॉलर्स (सुमारे 69-70 हजार INR) आहे.

“जर SE 4 हे नवीन मॉडेल, फोनची कार्यप्रणाली, अन्य फिचर्स आणि AI वैशिष्ट्यांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा प्रदान करत असेल, तर ते त्याच्या बाजारातील आकर्षणाला पुनरुज्जीवित करू शकते आणि विविध किमतीच्या Apple सिरीजना  बळकटी देऊ शकते,” असे Counterpoint Research चे वरिष्ठ विश्लेषक वरुण मिश्रा यांनी सांगितले.

Apple ने गेल्या महिन्याच्या अखेरीस, मजबूत विक्री वाढीचा अंदाज वर्तवला असून, यामुळे कंपनी आयफोनच्या विक्रीत जी घट झाली होती, त्यातून सावरेल आणि येत्या काही महिन्यांत अधिक व्यापक प्रदेशांमध्ये आणि विविध भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली वैशिष्ट्ये प्रदान करेल.

तथापि, विश्लेषकांनी अशा मॉडेल्सच्या विक्रीत होणाऱ्या वाढीबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे, कारण Apple ची AI वैशिष्ट्ये काही प्रदेशांमध्ये. त्याच्या नवीन iPhone 16 लाइन-अप आणि iPhone 15 Pro मॉडेलमध्ये टप्प्याटप्प्याने लागू केली जातील.

Counterpoint Research नुसार, SE मॉडेलच्या iPhone च्या एकूण उत्पन्नातील विक्री 2016 मध्ये त्याच्या सुरूवातीच्या 10% वरून गेल्या वर्षी सुमारे 1% वर घसरली आहे.

यावर्षीच्या अपडेटमध्ये त्याच्या स्लॅब-डिझाइनचे नूतनीकरण केले जाण्याची अपेक्षा आहे. प्राथमिक होम बटण काढून टाकले जाईल आणि त्याचबरोबर कॅमेरा आणि प्रोसेसर अपडेट्ससह AI वैशिष्ट्यांना सपोर्ट करणारे FaceID फिचर दिले जाईल, असा अंदाज विश्लेषक आणि मिडिया रिपोर्ट्सने दिला आहे.

SE मॉडेल हे iPhone मधील शेवटचे मॉडेल असेल, जे USB Type-C पोर्ट स्वीकारेल, जे Lightning कनेक्टरशिवाय असेल.

Apple ने आधीच सध्याची SE आणि iPhone 14 ही मॉडेल्स, युरोपीय संघात रद्द केले आहेत. कारण ही उत्पादने USB Type-C चार्जिंग मानकांसोबत सुसंगत नाहीत. नवीन SE मॉडेलमुळे Apple ला EU मध्ये पुन्हा प्रवेश मिळवता येणार आहे.

सूर्या गंगाधरन
रॉयटर्सच्या इनपुट्ससह


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here