भारतीय सैन्याच्या सर्वोच्च कमांडर्सनी, मंगळवारी चार दिवसीय ‘आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स‘ला सुरुवात केली, ज्यामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या सीमारेषांवर उभ्या ठाकलेल्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, आवश्यक असलेल्या ऑपरेशनल प्राथमिकतेचा आढावा घेतला जाईल. याशिवाय क्षेत्रीय सुरक्षा परिस्थितीच्या बदलांमध्ये भारतीय लष्कराची लढाऊ क्षमता सुधारण्यासाठीचे उपाय शोधले जातील.
एप्रिल आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत आयोजित केली जाणारी ‘ऑर्मी कमांडर्स कॉन्फरन्स’, ही उच्च-स्तरीय धोरणात्मक चर्चांसाठी एक महत्त्वाचा संस्थात्मक मंच आहे. सध्याची बैठक ही 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान होत असून, यामध्ये महत्त्वाच्या संरक्षण आणि सुरक्षा प्रश्नांवर, संघटनात्मक सुधारणांवर आणि आधुनिकीकरणावर भर दिला जाईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, या बैठकीत प्रमुख मार्गदर्शन करतील, ज्यामध्ये ‘सुधारणांचे वर्ष’ (Year of Reforms) उपक्रमांतर्गत भारतीय सैन्याच्या प्राथमिकतांवर एक सादरीकरण केले जाईल. संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान देखील यावेळी वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी संवाद साधतील, जेणेकरून पुढील वाटचालीवरील धोरणात्मक दृषटिकोन निश्चीत केला जाईल.
कॉनफरन्स दरम्यान, एक विशेष सत्र आयोजित केले जाईल, ज्यामध्ये NITI आयोगाचे CEO ‘भारताच्या विकास मार्गावर‘ चर्चा करतील आणि ‘सक्षम आणि सशक्त भारत’ (Capable and Strong India) निर्माण करण्यामध्ये, सशस्त्र दलांच्या अपेक्षित भूमिकेवर प्रकाश टाकतील.
यावेळी उपस्थित सर्वोच्च कमांडर्स, भविष्यातील सक्षण धोरणे आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी, तज्ज्ञांना सहकार्य करतील, जेणेकरून भारतीय लष्कर अधिक चपळ, अनुकूल आणि तंत्रज्ञानात प्रगत होण्यास चालना मिळेल. त्यांच्या चर्चा स्वदेशीकरण आणि विशिष्ट तंत्रज्ञानाच्या प्रेरणेने ऑपरेशनल तयारी आणि आधुनिकीकरण तसेच आवश्यक सैन्य पुनर्रचना यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित असतील.
तसेच, ते सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी कर्मचारी कल्याण उपक्रमाला प्राधान्य देतील. संघटनात्मक लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुसंगत करून अधिक प्रतिसादक्षम आणि मजबूत क्षेत्रीय सैन्य तयार करण्यावर चर्चा केली जाईल, तसेच जागतिक सुरक्षा परिस्थितींचा राष्ट्रीय संरक्षण धोरणांवर होणारा परिणाम तपासला जाईल.
“या मंचावर संघटनात्मक आरोग्य बळकट करण्यावर आणि प्रक्रिया सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, जेणेकरून भारतीय लष्कर अधिक लवचिक आणि प्रतिसादक्षम होईल,” असे लष्कराने त्यांच्या एका निवेदनात म्हटले आहे.
भारताला भविष्यात जटिल आणि गतिमान सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याने, या उच्चस्तरीय कॉन्फरन्सच्या माध्यमातून, महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय आणि भविष्यकालीन आधुनिक लष्करी रणनीतीचा पाया रचला जाईल.
टीम भारतशक्ती