शनिवारी रात्री नवी दिल्लीच्या मुख्य रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत, किमान 18 जणांना जीव गमवावा लागला तर अनेकजण जखमी झाले. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी लोक गाडीची वाट पाहत उभे होते, त्यावेळी हा दुर्देवी अपघात झाल्याचे, संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी स्थानिक वेळेनुसार, दुपारी 2:30 च्या सुमारास दोन प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली. प्रवासी प्रयागराज शहरात जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढण्यासाठी थांबले होते, असे वृत्त NDTV वृत्तसंस्थेने सांगितले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
एका प्रत्यक्षर्शीने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, “लोक ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर धावत होते आणि त्यातच अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, लोक एकमेकांवर पडले.”
दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी पत्रकारांना सांगितले की, “या घटनेत 15 लोक मरण पावले आहे” मात्र एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतिशी X वरील पोस्टद्वारे सांगितले की, “घटनेत बळी पडलेल्यांपैकी बरेच जण हे महाकुंभ मेळ्याच्या उत्सवाला जाणारे यात्रेकरू होते.”
“नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे माझे मन व्यथित झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्या सर्वांसोबत माझ्या सहवेदना जोडलेल्या आहेत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X द्वारे म्हटले आहे.
चौकशीचे आदेश
दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे.
सहा आठवडे चालणाऱ्या कुंभमेळा उत्सवाच्या सर्वात शुभ दिवशी, कोट्यवधी हिंदू लोक पवित्र त्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी जमले होते. दर 12 वर्षांनी एकदा आयोजित होणाऱ्या या महा-मेळाव्यामध्ये, मागील महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक मरण पावले.
सौदी अरेबियातील हज यात्रेच्या तुलनेत, गेल्यावर्षी 1.8 दशलक्ष लोक आले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या तुलनेत हिंदूच्या या उत्सवासाठी एकूण 400 दशलक्ष लोक उपस्थित लावतील अशी अपेक्षा आहे.
गेल्या दोन वर्षांत भारतात अनेक रेल्वे अपघात झाले आहेत, ज्यामध्ये 2023 मध्ये झालेल्या भीषण अपघातात किमान 288 लोकांचा मृत्यू झाला होता. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असून, पंतप्रधान मोदींच्या ‘कनेक्टिव्हिटीला’ चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्याच्या अपग्रेडेशनसाठी $30 अब्ज डॉलर्स खर्च केले जात आहेत.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)