ऑस्ट्रेलियाः सिनेगॉगच्या बाहेर ज्यूविरोधी भित्तीचित्र

0
4
ज्यूविरोधी
न्यू साउथ वेल्स पोलीस सिडनीमध्ये गस्त घालत आहेत. (छायाचित्र सौजन्यः विकिमीडिया कॉमन्स/केट ऑसबर्न)

न्यू साउथ वेल्सच्या राजधानीतील एका सिनेगॉगची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी, एका सिनेगॉगच्या भिंतींवर ज्यूविरोधी भित्तीचित्रे रेखाटल्याची घटना घडली असल्याचे सिडनीमधील पोलिसांनी शनिवारी सांगितले.

ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षभरात अनेक ज्यूविरोधी घटना पाहिल्या आहेत –  ज्यात इमारती आणि गाड्यांना लक्ष्य करणारे सिडनी भित्तिचित्र आणि मेलबर्नचा सिनेगॉग जाळण्याचा प्रयत्न जो पोलिसांनी दहशतवादी हल्ला मानला आहे यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना शनिवारी पहाटे न्यूटाउनच्या उपनगरातील एका सिनेगॉगवर भित्तिचित्रे रेखाटल्याची माहिती देण्यात आली.

शहरातील ज्यू समुदायाचे केंद्र असलेल्या सिडनीच्या पूर्वेकडील एका घरावरही ज्यूविरोधी भित्तीचित्रे रंगवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले, ते मॅरिकविले उपनगरातील रस्त्यावरील पोस्टरवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांची देखील चौकशी करत आहेत.

शुक्रवारी पहाटे, अल्लावा उपनगरातील दक्षिणी सिडनी सिनेगॉगवर झालेल्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी एक विशेष पोलिस कृती दल स्थापन करण्यात आले.

दक्षिण सिडनी सिनेगॉग घटनेचा संदर्भ देत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी शुक्रवारी सांगितले की, “ऑस्ट्रेलियामध्ये, आपल्या सहिष्णु बहुसांस्कृतिक समुदायात, अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांना स्थान नाही.”

ज्यूविरोधी गुन्ह्यांमध्ये वाढ

ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केल्यापासून आणि इस्रायलने गाझाविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये ज्यूविरोधी आणि इस्लामोफोबिक घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही ज्यू संघटनांनी म्हटले आहे की सरकारने त्याविरोधात पुरेशी कारवाई केलेली नाही.

ज्यू आणि मुस्लिम समुदायांना लक्ष्य करणारे द्वेषयुक्त भाषण, तोडफोड आणि छळ याबद्दल समुदायाच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सिनेगॉग आणि मशिदींची विटंबना करण्यात आली आहे. तसेच लोकांनी धमक्या आणि शिवीगाळ केल्याच्या ही घटना घडल्या  आहेत. वाढत्या तणावाच्या काळात अधिकारी आणि वकिलांचे गट शांततेचे आवाहन करत एकजूटीवर भर देत आहेत.

ऑस्ट्रेलिया सरकारने अशा द्वेषयुक्त गुन्ह्यांचा निषेध केला आहे.  सुरक्षा उपाययोजनांमध्ये वाढ केली आहे आणि जग मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या परिणामांचा सामना करत असताना परस्परांचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here