वादग्रस्त सागरी सीमांवरून परदेशी विमानांचे उड्डाण रोखण्यासाठी चीन नवीन कार्यपद्धतीवर काम करत आहे. या पद्धतीमध्ये परदेशी विमानाच्या जवळ अचानक धोकादायक फ्लेअर्स सोडणे हा प्रकार समाविष्ट आहे. ऑस्ट्रेलियाने अशाच एक प्रकरणाची नोंद केली आहे. मंगळवारी दक्षिण चीन समुद्रात ऑस्ट्रेलियन सागरी गस्तीवर चीनच्या लढाऊ विमानाने केलेल्या “असुरक्षित आणि अव्यावसायिक” कृतीबद्दल ऑस्ट्रेलियाने चीनकडे चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी फिलिपिन्सनेही अशा प्रकारच्या चिनी डावपेचांचा अहवाल नोंदवला आहे.
रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सचे (RAAF) P-8A पोसेडॉन सागरी गस्तीवरील विमान दक्षिण चीन समुद्रातील आंतरराष्ट्रीय पाण्यात नियमित पाळत ठेवून होते. त्यावेळी चीनच्या PLA J-16 लढाऊ विमानाने RAAF विमानाच्या दिशेने 30 मीटर (100 फूट) आत फ्लेअर सोडले, असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांनी गुरुवारी सांगितले.
“ही एक कृती आहे जी आम्ही असुरक्षित असल्याचे घोषित करण्यासाठी पुरेशी आहे. आम्ही काल आणि आज कॅनबेरा येथे आणि बीजिंगमध्ये देखील आमच्या चिंतेबद्दल चिनी सरकारला निवेदन दिले आहे,” असे मार्ल्स यांनी स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाला दिलेल्या एका टेलिव्हिजन मुलाखतीत सांगितले.
कॅनबेरामधील
चिनी दूतावासाने प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाने असेही नमूद केले आहे की चिनी नौदलाचा एक टास्क ग्रुप ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात कार्यरत आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मी नौदलाच्या frigate, cruiser and replenishment vessel ने ऑस्ट्रेलियाच्या सागरी मार्गात प्रवेश केला होता, जियांगकाई-श्रेणीचे फ्रिगेट हेंगयांग हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील समुद्रात मार्गक्रमण करत होते, असे संरक्षण विभागाने गुरुवारी एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचे हवाईदल आणि नौदल चिनी फ्रिगेटचे निरीक्षण करत होते, जे ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी दरम्यान टोरेस सामुद्रधुनीत मार्गक्रमण करत होते आणि तो ऑस्ट्रेलियाचा exclusive economic zone ह़ोता असे मार्ल्स म्हणाले.
“मला वाटते की ऑस्ट्रेलियन लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की हा कार्यगट काय करत आहे यावर आमची बारीक नजर आहे… परंतु आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीकोनातून, आम्ही याची खात्री करून घेऊ की आम्ही ज्या मार्गाने जात आहोत तो व्यावसायिक आणि सुरक्षित आहे,” असेही मार्लेस म्हणाले.
ऑस्ट्रेलिया QUAD बरोबरच AUKUS चा देखील सदस्य आहे ज्यात अमेरिका आणि ब्रिटन देखील या त्रिपक्षीय सुरक्षा उपक्रमाचा भाग आहेत.
संरक्षण विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, “ऑस्ट्रेलिया नौवहन आणि ओव्हरफ्लाइटच्या स्वातंत्र्याचा वापर करण्याच्या सर्व राज्यांच्या अधिकारांचा आदर करतो आणि इतरांनी ऑस्ट्रेलियाच्या तसे करण्याच्या अधिकाराचा आदर करावा अशी अपेक्षा करतो.”
ऑस्ट्रेलियाने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या दक्षिण चीन समुद्रात नौदल आणि हवाई दलाच्या परस्परसंवादाच्या मालिकांमुळे यापूर्वी राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत.