बांगलादेशमधील एकसूत्री वाटत असलेली विद्यार्थ्यांची चळवळ, जी गेल्या ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना पदावरुन खाली पाडण्यात यशस्वी झाली होती, त्यामध्ये आता फूट पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
धाका ट्रिब्युननुसार, गुरुवारी खुलना युनिव्हर्सिटी ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (KUET), येथील काही विद्यार्थ्यांनी, अन्य विद्यार्थी गटाच्या राजकीय संघटनांविरुद्ध “रेड कार्ड” आंदोलन केले. “त्यांच्या विश्वविद्यालयात राजकारण नसावे आणि फक्त विद्यार्थी विषयांवरच चर्चा व्हावी,” अशी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी होती.
खुलना विद्यापीठ जरी विद्यार्थ्यांच्या राजकारणाला परवानगी देत नसले, तरी ही चिंता कायम आहे की, स्थानिक न्यायालये यात हस्तक्षेप करून राजकीय पक्षांना त्यांच्या विद्यार्थी संघटनांना विद्यापीठात पाठवण्याची परवानगी देऊ शकतात.
इतर अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, खुलना विद्यापीठात मंगळवारी झालेल्या हिंसाचारात BNP (बांग्लादेश पॉलिटिक्स) ची- युवा विंग JCD चा समावेश होता, ज्याने विद्यार्थ्यांची भरती करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यामुळे भेदभाव विरोधी विद्यार्थी असा वाद निर्माण झाला, ज्यांनी हसीना यांच्या विरोधात निषेधाचे नेतृत्व केले होते.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी अन्य विद्यार्थ्यांवर चाकू आणि काटेरी शस्त्रांनी वार केला. या हल्ल्यांमध्ये अनेकजण रक्तस्त्राव होऊन गंभीर जखमी झाले, ज्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
हिंसाचाराने एक मुद्दा अधोरेखित केला, मोहम्मद युनूसच्या अंतरिम प्रशासनात त्यांची उपस्थिती असूनही विद्यार्थी अद्याप एक टिकाऊ राजकीय शक्तीमध्ये स्वत: ला संघटित करू शकले नाहीत.
युनूस यांनी जाहीर केले आहे की, “2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या पहिल्या सहामाहीत निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात. दरम्यान निर्देषित मतदार यादीत “सुधारणांची” मागणी होत असली तरी, विद्यार्थ्यांच्या श्रेणीतील मतभेद हे सूचित करतात की, निवडणुकीची कालमर्यादा केवळ BNP सारख्या राजकीय पक्षांनी प्रस्थापित केलेल्या विद्यार्थी शाखांच्या फायद्यासाठी असू शकते.
‘एसएडी’ने सोमवारी आपल्या नेतृत्वाची घोषणा करणे अपेक्षित आहे, जे राजकीय परिदृश्य बदलू शकेल अशा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील राजकीय पक्षावर आधारित असावे, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय राजकारणाला सध्याच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी एसएडीच्या मनात काय आहे. हे समजण्यासाठी तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.
देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी, राबवावे लागणारे कार्यक्रम आणि योजना पुरेसे मूलगामी असतील, अशी एसएडीला अपेक्षा आहे.
सूर्या गंगाधरन
(स्ट्रॅटन्यूज)