डोनाल्ड ट्रम्प शांत राहण्यासाठी ओळखले जात नाहीत. परंतु बायडेन यांच्याशी शुक्रवारी झालेल्या चर्चेदरम्यान, विद्यमान अध्यक्षांच्या बोलण्यात सतत व्यत्यय आणणारे आणि 2020च्या चर्चेदरम्यान त्यांना वैयक्तिक अपमानास्पद वागणूक देणाऱ्या माजी अध्यक्षांचा जसा काही मेक ओव्हर झाल्यासारखे वाटले. अंतिम कार्यक्रमापूर्वी अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात मोठा टप्पा मानला जाणाऱ्या टीव्हीवरील चर्चेदरम्यान बायडेन यांचा उडालेला गोंधळ आणि सर्वसाधारण बडबड याच्या अगदी उलट ट्रम्प शांत, तुलनेने अधिक बिनधास्त होते.
राष्ट्राध्यक्षांची ट्रम्प यांच्याविरुद्ध ‘संथ सुरुवात’
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षांची सुरुवात ‘संथ’ झाल्याचे मान्य करून बायडेन यांच्यावरील संकटाला एकप्रकारे दुजोरा दिल्याचे दिसते. डेमोक्रॅटिक पक्षाचे देणगीदार मार्क ब्युएल यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, ‘दुसऱ्या कोणाला तरी त्यात समाविष्ट करण्याची’ वेळ आली आहे का? येथे लोकशाही धोक्यात आहे आणि आम्ही सगळेजण घाबरलेले आहोत.”
या चर्चेच्यावेळी बायडेन चिंताग्रस्त दिसत होते. ‘अब्जाधीश, खरबपती’ यासारखे शब्द उच्चारताना ते अडखळले. गर्भपातासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलताना ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. डेमोक्रॅट्स जन्मानंतर आठ ते नऊ महिन्यांनी गर्भपात करतील असे चुकीचे सांगणाऱ्या ट्रम्प यांची बायडेन कोंडी करू शकले नाहीत. ट्रम्प अनेकदा मूळ मुद्द्याला बगल देत आपले म्हणणे मांडत होते. त्यावेळी त्यांना मुद्द्याकडे वळवण्यात बायडेन अयशस्वी ठरल्याचेच बघायला मिळाले. जेव्हा ट्रम्प गर्भपातापासून स्थलांतराच्या मुद्द्याकडे वळले तेव्हा तर बायडेन अधिकच गोंधळलेले दिसत होते.
ट्रम्प यांनी आपला मुद्दा मांडताना म्हटलेः “त्या वाक्याच्या शेवटी ते काय म्हणाले हे मला खरोखर कळलेले नाही, आणि त्यांनी तसे मुद्दाम केले असे मला वाटत नाही.”
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी दूरचित्रवाणीवरील डिबेट महत्त्वाची असते
दूरचित्रवाणीवरील डिबेट इतकी महत्त्वाची ठरते का? इतिहासात डोकावून बघितले तर तुम्हाला 26 सप्टेंबर 1960 या दिवसाची आठवण येईल. घामाघूम, शब्दांची उधळण करणारे रिचर्ड निक्सन चिंताग्रस्त दिसत होते. केनेडींकडून झालेल्या त्यांच्या पराभवासाठी हा एक मोठा घटक होता.
1980च्या दशकात अनेक वर्षांचा अनुभव असलेले रेगन कार्टरपेक्षा अधिक प्रभाव पाडून गेले. 2016 मधील निवडणुकांबाबत अभ्यासकांचा असा दावा आहे की ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात ट्रम्प त्यांचेच माध्यम असलेल्या क्षेत्रात (मीडिया क्षेत्रात) अधिक चमकले.
हिलरी एका प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना ट्रम्प यांनी क्लिंटन यांना मध्येच थांबवत आपले बोलणे सुरू केले आणि क्लिंटन यांना ‘वाईट स्त्री’ असे संबोधले. “भिंत बांधण्याचे” आणि मेक्सिकोला त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे वचन ट्रम्प यांनी त्यावेळी दिले. या कल्पनांनी दूरचित्रवाणीवर त्यांची चांगली छाप पडली आणि ते भ्रष्ट राजकीय स्थितीचा भाग नसलेली व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. शेवटी क्लिंटन यांनी डिबेट जिंकली असली तरी ट्रम्प यांनी मांडलेल्या कल्पना उजव्या ठरल्या होत्या.
बायडेन यांनीच केला बायडेन यांचा पराभव
नुकत्याच पार पडलेल्या चर्चेत, ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर त्यांचा मुलगा हंटरवरून ताशेरे ओढले असले तरी बायडेन यांनीच बायडेन यांचा पराभव केल्याचे चित्र दिसले. बायडेन यांच्या दृष्टीने एकमेव चांगली बातमी म्हणजे आता सप्टेंबरमध्ये या डिबेटची पुढील फेरी पार पडणार आहे. याचा निवडणूक निकालावर किती परिणाम होईल, हे सांगता येत नसले तरी बायडेन यांच्या वयाविषयी पक्ष सहकाऱ्यांना आणि डेमोक्रॅटिक मतदारांना वाटणारी भीती खरी ठरत आहे, ही बाब बायडेन यांच्यासाठी प्रतिकूल ठरू शकते.
दुसरी समस्या अशी आहे की बायडेनबद्दल आधीच चिंताग्रस्त असलेल्या राजकीय कृती समित्यांना यानंतर प्रश्न विचारण्यास भाग पाडले जाईल. हे वाईट लक्षण आहे. बायडेन यांच्यासाठी सर्वात मोठे नुकसान हे आहे की सोशल मीडियाच्या आजच्या युगातही अध्यक्ष दबावाखाली कसे काम करतात हे ठरवण्यासाठी टीव्ही हाच एक प्रमुख घटक आहे. सोशल मीडियावरील थ्रेड्नी सूचित केल्याप्रमाणे, बायडेन हे डेमोक्रॅटिक गटामध्येही आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले होते.
राष्ट्राध्यक्ष अजूनही या अपयशाशी लढू शकतात, परंतु त्यांनी त्यांचे काम कमी करत आणले आहे. अफगाणिस्तानातून चुकीच्या पद्धतीने माघार घेतल्यापासून तसेच सौदी क्राउन प्रिन्स एमबीएस – ज्यांचा त्यांनी ‘मानवाधिकार उल्लंघनां’साठी निषेध केला होता – यांच्याशी हातमिळवणी केल्यापासून बायडेन यांच्यावर काही काळापासून ‘कमकुवत अध्यक्ष’ असा ठसा उमटवला गेला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना गाझा युद्ध मागे घेण्यासाठी बायडेन असमर्थ ठरल्याचेही चित्र बघायला मिळत आहे. त्यादृष्टीने दूरचित्रवाणीवरील डिबेट ही ते चित्र पुसून टाकण्यासाठी एक उत्तम संधी होती. मात्र त्यात ते अपयशी ठरले.
अश्विन अहमद