रासायनिक चौकशीमुळे चीन-जपानमधील व्यापार तणाव अधिक वाढला

0
चीन-जपानमधील

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी जपानमधून आयात होणाऱ्या डायक्लोरोसिलेनवर अँटी-डम्पिंग चौकशी सुरू केल्याची घोषणा केली, असे मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डायक्लोरोसिलेन हे एक पूर्वद्रव्य (प्रिकर्सर) रसायन असून ते प्रामुख्याने चिप निर्मितीतील थिन-फिल्म डिपॉझिशन प्रक्रियेत वापरले जाते आणि इंटिग्रेटेड सर्किट उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

चीन-जपानमधील संबंध ताणले गेलेले असतानाच, चीनने जपानच्या ‘दुहेरी-वापराच्या’ (dual-use) वस्तूंवर निर्यात बंदी जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर ही चौकशी समोर आली आहे.

व्याप्ती आणि उद्योगाची चिंता

चीनने म्हटले आहे की, ही चौकशी त्यांच्या देशांतर्गत डायक्लोरोसिलेन उत्पादकांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आली आहे. या उत्पादकांचा असा दावा आहे की, जपानमधून आयात होणाऱ्या मालाचे प्रमाण 2022 ते 2024 या काळात एकूणच वाढले आहे, तर किमतींमध्ये एकत्रितपणे 31% घसरण झाली आहे, ज्यामुळे स्थानिक उद्योगाच्या उत्पादन आणि कार्यक्षमतेचे नुकसान झाले आहे.

निवेदनानुसार, या चौकशीमध्ये 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 दरम्यानच्या कथित डम्पिंगचा आढावा घेण्यात येणार असून, 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2025 या कालावधीत देशांतर्गत उत्पादकांना झालेल्या संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका स्वतंत्र दस्तऐवजात, उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका कंपनीने या संयुगाच्या उत्पादक, निर्यातदार आणि आयातदारांची यादी दिली आहे. या यादीत शिन-एत्सु केमिकल, एअर लिक्विड जपान जी.के. आणि मित्सुबिशी केमिकल ग्रुप कॉर्पोरेशन या तीन जपानी कंपन्यांचा समावेश आहे.

भू-राजकीय संदर्भ

ही चौकशी साधारणपणे 7 जानेवारी 2027 पूर्वी पूर्ण केली जाईल, आणि आवश्यकता भासल्यास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, संबंधित अधिकारी कायद्यानुसार प्रकरणाची चौकशी करून, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ निर्णय देतील, असेही त्यात नमूद केले आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीस, जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाइची यांनी “लोकशाही पद्धतीने शासित तैवान बेटावर चीनने केलेला हल्ला, हा जपानसाठी अस्तित्वाचा धोका मानला जाऊ शकतो” असे विधान केले होते, हे विधान ‘प्रक्षोभक’ असल्याचे बीजिंगने म्हटले होते. तेव्हापासूनच, या दोन आशियाई शेजाऱ्यांमधील संबंध बिघडले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनकडून अमेरिकन संसदीय समितीच्या कर्मचाऱ्यांचे ई-मेल्स हॅक
Next articleWhen Doctrine Turns Kinetic: How Trump’s National Security Strategy Went Live in Venezuela

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here