अमेरिकेचे टिकटॉकवरील मत ही ‘लुटारूंची मानसिकता’ – चीनचा दावा

0

अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची शक्यता असलेल्या विधेयकासाठी अमेरिकेने ‘लुटारूं’सारखे अन्यायकारक वर्तन केल्याचा आरोप चीनने केला आहे.

अमेरिका कॉंग्रेसच्या खालच्या सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे, ज्यामुळे टिकटॉकच्या मूळ कंपनी म्हणजे बाईटडान्सला कंपनीतून बाहेर पडण्यासाठी किंवा ॲपवर बंदी घालण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळाली आहे. आपल्या अमेरिकन मालमत्तेसाठी (टिकटॉकसाठी) खरेदीदार शोधण्यासाठी बाईटडान्सला मिळालेली सहा महिन्यांची मुदत अतिशय कमी आणि महत्त्वाकांक्षी वाटते.
अर्थात या विधेयकाला सिनेटमध्ये मंजूरी मिळणे अद्याप बाकी आहे. ते एकदा मंजूर झाल्यावर या विधेयकावर आपण स्वाक्षरी करू असे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले आहे.

टिकटॉकची मालकी चिनी कंपनी बाईटडान्सकडे आहे. बीजिंगमधील या कंपनीची नोंदणी केमन बेटांवर झाली आहे.
टिकटॉकवरील यूजर्सच्या खासगी डेटाशी संबंधित गोपनीयतेचे अनेक प्रश्न आहेत असे म्हणत खासदारांनी वारंवार या ॲपबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

बुधवारी प्रतिनिधी सभागृहाने हे विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान केले ज्यामध्ये 352 प्रतिनिधींनी बंदीच्या बाजूने तर 65 प्रतिनिधींनी विरोधात मतदान केले.

“निष्पक्ष स्पर्धा आणि न्याय तत्त्वांच्या विरोधात जाऊन” हे विधेयक मंजूर केल्याचा आरोप चीनने केला आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे असलेली एखादी चांगली गोष्ट पाहतो आणि ती स्वतःसाठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती पूर्णपणे लुटारूंची मानसिकता असते, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात आपल्या हितसंबंध जपण्यासाठी “आवश्यक उपाययोजना” करण्याचे वचन चीनने दिले आहे.

टिकटॉकवर बंदी घातल्याने अमेरिका मेटाला अधिक सशक्त करत असयाचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच केला आहे.

सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, “टिकटॉकवरील बंदीमुळे तुम्ही फेसबुकला मोठे बनवू शकता आणि मी फेसबुकला लोकांचा शत्रू मानतो.”

अर्थात सिनेटमध्ये मंजूर होण्यासाठी या विधेयकाला पुरेसा पाठिंबा आहे की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे. हे विधेयक मतदानासाठी कधीही येऊ नये अशीही एक शक्यता आहे.

खुद्द चीनमध्ये टिकटॉकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आहे. चिनी यूजर्स डुयिन नावाचे टिकटॉकसारखेच ॲप वापरतात, जे केवळ चीनमध्ये उपलब्ध आहे आणि सरकारद्वारे सेन्सॉर केलेले आहे.

पिनाकी चक्रवर्ती


Spread the love
Previous articleरशियाच्या स्वप्नाला ‘ॲमका’मुळे धक्का
Next articleयुक्रेनच्या प्रदेशात रशियाच्या होणाऱ्या निवडणुका ‘बेकायदेशीर’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here