जागतिक ऊर्जा संक्रमणाला रोखणारे व्यापार अडथळे दूर करण्यावर चीनचा भर

0
व्यापार अडथळे

चीनचे उपपंतप्रधान डिंग श्यूशियांग यांनी, जागतिक ऊर्जा संक्रमणाला रोखणारे व्यापार अडथळे दूर करण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी ब्राझीलमध्ये, एका जागतिक हवामान शिखर परिषदेत बोलताना डिंग यांनी, उपस्थित देशांना “खरे बहुपक्षीय सहकार्य” करण्याचे आणि हरित तंत्रज्ञान व उद्योगांमध्ये सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.

हरित विकासासाठी जागतिक सहकार्यावर भर

“आपल्याला हरित तंत्रज्ञान आणि उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे, व्यापार अडथळे दूर करणे आणि दर्जेदार हरित उत्पादनांचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करणे गरजेचे आहे, जेणेकरून जागतिक शाश्वत विकासाच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील,” असे डिंग यांनी दुभाष्याच्या माध्यमातून सर्वांना सांगितले.

चीनच्या अधिकृत शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, डिंग यांनी विकसित राष्ट्रांना उत्सर्जन कपात करण्यामध्ये पुढाकार घेण्याचे आणि विकसनशील देशांना आर्थिक मदत करण्याबाबत दिलेले वचन पूर्ण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “विकसित देशांनी उत्सर्जन कमी करण्याची आपली जबाबदारी पूर्ण करावी, निधी पुरवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा गांभीर्याने सन्मान करावा आणि विकसनशील देशांना अधिकाधिक मदत पुरवावी.”

“चीन, हरित आणि कमी-कार्बन विकास शाश्वत आधारावर पुढे नेण्यासाठी सर्व देशांसोबत काम करण्यास तयार आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगतिले.

चीनची हवामानविषयक वचनबद्धता

अर्थव्यवस्थेतील एकूण ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन, त्याच्या सर्वोच्च पातळीपासून 7% ते 10% पर्यंत कमी करण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. तसेच, त्यांच्या राष्ट्रीय स्तरावर निर्धारित केलेल्या योगदानाच्या लक्ष्यांनुसार, त्याच वर्षापर्यंत एकूण ऊर्जा वापरापैकी 30% पेक्षा जास्त ऊर्जा बिगर जीवाश्म इंधनातून येईल याची खात्री करण्याची देशाची योजना आहे.

सध्या चीन हा जगातील सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जक देश असला, तरी तो नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा गुंतवणूकदार देखील आहे. चीनी सरकार आपल्या सौर आणि पवन ऊर्जा क्षमता वाढवत असून, इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनास आणि स्वच्छ तंत्रज्ञान निर्यातींना पाठिंबा देत आहे.

ब्राझीलमध्ये डिंग यांनी केलेली ही विधाने, हरित संक्रमण प्रक्रियेत स्वतःला जागतिक नेता म्हणून स्थान देण्याच्या आणि विकसित अर्थव्यवस्थांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानातील व्यापार अडथळे दूर करण्यासाठी दबाव आणण्याचा बीजिंगच्या प्रयत्नांना अधोरेखित करतात.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleसंरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची पायाभरणी | भारतशक्तीची दशकपूर्ती
Next articleSky Symphony Over the Brahmaputra: IAF’s First-Ever Full-Scale Air Show in the Northeast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here