चिनी हॅकर्सनी अमेरिकेच्या ब्रॉडबँड प्रोव्हायडर्सच्या नेटवर्कमध्ये प्रवेश करत न्यायालयीन अधिकृत वायर टॅपिंगसाठी फेडरल सरकार वापरत असलेल्या सिस्टीममधून माहिती मिळवल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने शनिवारी सांगितले.
व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स व्हीझेडएन, एटी अँड टीटीएन तसेच लुमेन टेक्नॉलॉजीज LUMN.N या दूरसंचार कंपन्यांचे नेटवर्क अलीकडेच सापडलेल्या हॅकिंगमुळे विस्कळीत झाल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने यासगळ्या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या हवाल्याने म्हटले आहे.
कम्युनिकेशन डेटासाठी कंपन्या वापरत असलेल्या नेटवर्कच्या पायाभूत सुविधांमध्ये हॅकर्सनी कित्येक महिने आधीच प्रवेश केला असावा, असे जर्नलने म्हटले आहे. हॅकर्सनी इंटरनेट ट्रॅफिकिंगच्या इतर भागांमध्येही प्रवेश केला होता.
चीनकडून इन्कार
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी यासगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की वृत्तात वर्णन केलेल्या हल्ल्याची त्यांना माहिती नाही, मात्र अमेरिकेने चीनला “फसवण्यासाठी” अशी चुकीची कथा तयार केली आहे.
जगभरातील सर्व देशांसाठी सायबर सुरक्षा हे एक समान आव्हान बनलेले असताना, हा चुकीचा दृष्टीकोन, संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून संयुक्तपणे या आव्हानाचा सामना करण्याच्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणेल, असे मंत्रालयाने रॉयटर्सला दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
परदेशी कॉम्प्युटर सिस्टीममध्ये घुसखोरी करण्यासाठी हॅकर्सचा वापर केल्याचा अमेरिकी सरकार आणि इतरांचा दावा बीजिंगने यापूर्वीच नाकारला आहे.
संवेदनशील आणि गुप्त माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने चिनी हॅकिंग गटाने हा हल्ला केल्याचे जर्नलने म्हटले आहे. अमेरिकेच्या तपासकर्त्यांनी याला ‘सॉल्ट टायफून’ असे नाव दिले आहे.
याआधीच्या घटना
या वर्षाच्या सुरुवातीला, ‘व्होल्ट टायफून’ नावाच्या मोहिमेअंतर्गत सायबर हेरगिरीबद्दल बीजिंगची कानउघाडणी केल्यानंतर काही महिन्यांनी, अमेरिकेच्या कायदा अंमलबजावणी संस्थेने ‘फ्लॅक्स टायफून’ हे टोपणनाव असलेल्या एका मोठ्या चिनी हॅकिंग गटाच्या कार्यशैलीत व्यत्यय निर्माण केला होता.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बीजिंगच्या सायबर सुरक्षा यंत्रणांनी व्होल्ट टायफून “एका आंतरराष्ट्रीय रॅन्समवेअर संघटनेने” केल्याचे पुरावे शोधून ते प्रकाशित केले आहेत.
अनुकृती
(रॉयटर्स)