दक्षिण अमेरिकेन राष्ट्राने निर्वासित स्थलांतरितांना घेऊन जाणारी लष्करी विमाने स्विकारण्यास सहमती दर्शविल्यानंतर, व्हाईट हाऊसने अधिकृतरित्या जाहीर केले, की रविवारी अमेरिका आणि कोलंबियाने व्यापार युद्ध सुरू करण्यापासून माघार घेतली आहे.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिका आणि कोलंबियामध्ये निर्वासितांबाबत करार झाला असून, रविवारी दोन्ही राष्ट्रांनी व्यापार युद्ध सुरू करण्यापासून माघार घेतली आहे. ज्या गतीने हा संपूर्ण करार झाला आहे तो उल्लेखनीय आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर, याबाबत दिलेले वचन पूर्ण करण्याच्या इच्छेला हा करार प्रतिबिंबित करतो.
युएसचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी यापूर्वी आपल्या इमिग्रेशन क्रॅकडाउनचा एक भाग म्हणून निर्वासितांना घेऊन जाणारी लष्करी उड्डाणे स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल, कोलंबियावर अतिरिक्त शुल्क आणि निर्बंध लादण्याची धमकी दिली होती.
परंतु रविवारी उशीरा, व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, कोलंबियाने स्थलांतरितांना स्विकारण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे वॉशिंग्टन कोलंबियावर लादलेल्या दंडांची अंमलबजावणी करणार नाही. दरम्यान हा करार हजारो निर्वासितांवर परिणाम करतो आणि त्यांच्यासाठी गंभीर चिंता निर्माण करू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)