संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते जोधपूर येथे आयडॅक्सचे उद्घाटन

0
संरक्षणमंत्र्यांच्या
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारतीय हवाई दलाकडून तरंग शक्ती-24 या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय हवाई कवायतींचे आयोजन जोधपुरात करण्यात आले आहे. या कवायतींबरोबरच हवाई दलाच्या वतीने भारतीय संरक्षण हवाई वाहतूक प्रदर्शन आयडॅक्स-24 भरवण्यात येत असून आज 12 सप्टेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

जोधपूरमध्ये आजपासून शनिवारपर्यंत (12 ते 14 सप्टेंबर) आयोजित आयडॅक्स-24 च्या आवृत्तीत उद्योगांचा मोठा सहभाग असेल आणि विविध उत्पादने, तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडली जातील. भारतीय प्रेक्षकांसह मित्रराष्ट्रांमधील प्रेक्षकांसाठीही भारतीय हवाई वाहतूक उद्योग जगतातील – डीपीएसयू, डीआरडीओ, खाजगी उद्योग (स्तर-I, II, III) आणि उच्च दर्जाच्या स्टार्टअप्सची उत्पादने पाहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तरंग शक्ती 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या जागतिक हवाई दलांसह विविध स्तरांवरील मान्यवरांना आणि उपस्थितांना भारतीय हवाई वाहतूक उद्योगाच्या दुर्दम्य चैतन्य आणि स्वदेशी कौशल्याचे दर्शन घडविणे हे आयडॅक्सचे उद्दीष्ट आहे. मित्रराष्ट्रांचा या प्रदर्शनातील सहभाग भारताच्या हवाई उद्योगाला निर्यातीच्या संधी मिळवून देण्यासाठी, परदेशी ओईएम्सच्या पुरवठा साखळ्यांशी जोडून घेण्याच्या आणि भारतीय संरक्षणाच्या गरजेनुसार उत्पादन व विकासात सहयोगाच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल.

भारतीय हवाई दलाचे एअरोस्पेस डिझाईन संचालनालय (डीएडी) आपल्या भागीदार स्टार्टअप्ससह या प्रदर्शनात सहभागी होणार आहे. मानवरहित हवाई यानांपासून असणारा धोका नष्ट करण्यासाठी, हाय अल्टिट्यूड स्युडो सॅटेलाईट्स (एचएपीएस), आरएफ गन, इतर हवाई शस्त्रास्त्रे व दारूगोळा, ऑगमेंटेड किंवा व्हर्च्युअल रिॲलिटी (एआर/व्हीआर) स्मार्ट चष्मे आदी प्रशिक्षणाचे तंत्रज्ञानाधारित साहित्य, विस्तारक्षम सक्रिय प्रलोभने, हवाई दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष, थेट लक्ष ठेवण्याची प्रणालीपासून ते धावपट्टीच्या झटपट दुरुस्तीसाठीचे उपाय आदी विविध ठराविक स्थानीय तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे प्रदर्शन हे स्टार्टअप उद्योग घडवतील अशी अपेक्षा आहे. त्यातून भारतीय एअरोस्पेस क्षेत्राची वाढती ताकद आणि सुप्तावस्थेतील क्षमता दिसून येईल.

नवकल्पनावादी (इनोव्हेटर्स), स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनासाठी नवनवीन उपाययोजना शोधून काढणे, त्या विकसित करणे आणि अंमलात आणण्यासाठी प्रोत्साहन देणे यात भारतीय हवाई दलाचा वाटा लक्षणीय आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सल्ल्याद्वारे ‘डीएडी’ या उद्योगांना भारतीय हवाई दलाच्या भविष्यातील गरजा जाणून घेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारे त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन देत असून त्यातून सरकारला अपेक्षित ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने नेत आहे.

हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रातील उद्योगांमधील भागीदारांना भारतीय हवाई दलाचे नवोन्मेषी संचालनालय, निर्णायक पदांवरील व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी हे प्रदर्शन उत्तम व्यासपीठ आहे. तसेच, स्वदेशी बनावटीची उत्पादनेही या मंचावर पाहता येणार आहेत.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleRevealed: Identities Of Wagner Mercenaries Lost In A Mali Ambush
Next articleSpaceX-Polaris Crew Set To Undertake First Private Spacewalk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here