नवी दिल्ली येथे, 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान ‘आर्मी कमांडर्स’ कॉन्फरन्स’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्फरन्सदरम्यान, भारतीय लष्कराचे वरिष्ठ नेतृत्व सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या सर्व पैलूंचा सखोलपणे विचार करत आहेत, ज्यामध्ये सीमा परिस्थिती, अंतर्गत मुद्दे आणि सध्याच्या सुरक्षा आराखड्याला सामोरे जाणाऱ्या आव्हानांचा समावेश आहे. या कॉन्फरन्समध्ये संघटनात्मक पुनर्रचना, लॉजिस्टिक्स, प्रशासन, मानव संसाधन व्यवस्थापन, स्वदेशीकरणाद्वारे आधुनिकीकरण, विशिष्ट तंत्रज्ञानाची ओळख आणि विविध जागतिक परिस्थितींचा परिणाम यावर देखील चर्चा केली जात आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाला उद्देशून केलेले भाषण, हे कॉन्फरन्सच्या तिसऱ्या दिवशीचे मुख्य आकर्षण होते, ज्यापूर्वी सिंह यांनी, ‘सुधारणांचे वर्ष’ (Year of Reforms) वर प्रकाश टाकला.
सिंह यांनी, भारतीय लष्कराच्या नेतृत्वाचे कौतुक केले, ज्यांनी देशाच्या ‘संरक्षण आणि सुरक्षा’ दृष्टिकोनाला नव्या उंचीवर नेले आहे. त्यांनी भारतीय लष्कराच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टिकोनाचेही कौतुक केले. सध्याच्या भू-रणनीतिमधील अनिश्चितता आणि संपूर्ण जगावर त्याचे होणारे परिणाम, याचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
“अपारंपरिक आणि असममित युद्ध, ज्यामध्ये हायब्रिड युद्धाचा समावेश आहे, ती भविष्यातील पारंपारिक युद्धांचा भाग असतील. सायबर, माहिती, दळणवळण, व्यापार आणि वित्त हे सर्व भविष्यातील संघर्षांचे अविभाज्य भाग बनले आहेत. यामुळे सशस्त्र दलांना आगामी आव्हानांसाठी रणनीती आखताना आणि योजना तयार करताना, हे सर्व पैलू विचारात घेऊन, अधिक गतिमान दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
संरक्षण मंत्र्यांनी सशस्त्र दलांना सध्याच्या भू-रणनीतिक बदल आणि जागतिक सुरक्षा अनिश्चिततेच्या संदर्भात डायनॅमिक पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या नियोजनात दीर्घकालीन आणि तात्काळ आव्हानांचा समावेश असावा, असेही त्यांनी सुचवले. आजच्या जगात लष्करी गुप्तचरतेचे महत्त्व, विशेषतः जेव्हा ते आधुनिक तंत्रज्ञानाने वृद्धिंगत केले जाते, तेव्हा त्याला कमी लेखता कामा नये, असे सिंह यावेळी म्हणाले.
चीनच्या उत्तरेकडील सीमांवरील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना, सिंह यांनी जवानांवरील आपला पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि सशस्त्र दलांचे कौतुक केले, ज्यांनी ठामपणे आणि जागरूकतेने कार्य केले. हे कार्य यापुढेही असेच सुरु ठेवावे लागेल, असे सिंह म्हणाले.
आव्हानात्मक परिस्थितीत काम करताना, पश्चिम आणि उत्तरेकडील सीमेवर रस्ते दळणवळणात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणणाऱ्या, बीआरओच्या (BRO- The Border Roads Organisation) प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा संदर्भ देत, त्यांनी सीमापार दहशतवादाला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले, तथापि, शत्रूचे छुपे युद्ध सुरूच आहे.
“जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाच्या धोक्याला तोंड देण्यासाठी सीएपीएफ/पोलिस दल आणि लष्कर यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे मी कौतुक करतो. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील समन्वयित कारवाया या प्रदेशात स्थिरता वाढविण्यात योगदान देत आहेत आणि तेच राहिले पाहिजे,” असे ते म्हणाले.
परदेशी सैन्यांसोबत शाश्वत सहकारी संबंध निर्माण करून आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांना बळकटी देण्यासाठी, लष्कराने राजनैतिक कूटनीतिमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचेही त्यांनी कौतुक केले आणि ते साध्य करण्यात संरक्षण संलग्नकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.
“संघटनात्मक उद्दिष्टाच्या अनुषंगाने संरक्षण संलग्नकांच्या भूमिकेचे पुनर्निर्देशन करण्यावर आपण विचारमंथन केले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला.
सिंह यांनी, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानातील प्रगतीवर जोर दिला आणि सशस्त्र दलांनी आपल्या रणनीतिमध्ये या प्रगतीचा प्रभावीपणे समावेश केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी लष्कराच्या नागरिक क्षेत्राबरोबर, विशेषतः प्रमुख शैक्षणिक संस्थांसोबत, विशेष तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. हा सहकार्याचा उपक्रम “स्वदेशीकरणाद्वारे आधुनिकीकरण” किंवा “आत्मनिर्भर भारत” सारखे मिशन साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
सिंह यांनी आपल्या भाषणात यावर जोर दिला की, ‘सशस्त्र दलांनी नियमितपणे नवीन तंत्रज्ञानाशी संवाद साधत राहणे आवश्यक आहे.’ “विकसित भारत” हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी नीति आयोगासोबत चर्चा करण्याच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले, जी या आर्मी कमांडर कॉन्फरन्स दरम्यान झाली.
टीम भारतशक्ती