या कृतीचा अर्थ असा होईल की, जागतिक व्यापार युद्ध होईल, कोट्यवधी ग्राहकांसाठी वस्तू अधिक महाग होतील आणि जगभरातील अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत ढकलल्या जातील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीच्या काळात चीन आणि कॅनडासह युरोपियन युनियनही अमेरिकेवर सूडबुद्धीने व्यापारशुल्क लादण्यात सामील होईल.27 देशांच्या गटाला बुधवारपासून पोलाद आणि ॲल्युमिनियम तसेच कारवर 25 टक्के आयात शुल्क आणि इतर सर्व वस्तूंवर 20 टक्के परस्पर शुल्क आकारले जाणार आहे.
ट्रम्प यांच्या शुल्कांमध्ये युरोपियन युनियनचा अमेरिकेच्या निर्यातीच्या सुमारे 70 टक्के भागाचा समावेश आहे-ज्याचे मूल्य गेल्या वर्षी एकूण 532 अब्ज युरो (585 अब्ज अमेरिकन डॉलर्स) होते. तरीही तांबे, फार्मास्युटिकल्स, सेमीकंडक्टर्स आणि लाकडावरील संभाव्य शुल्क अद्याप येणे बाकी आहे.
युरोपियन आयोगाचा प्रस्ताव
युरोपीय महासंघ व्यापार धोरणाचे समन्वय करणारे युरोपीय आयोग सोमवारी उशिरा सदस्य देशांना व्यापक परस्पर शुल्कापेक्षा ट्रम्प यांच्या पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या शुल्काला प्रतिसाद म्हणून अतिरिक्त शुल्क आकारण्यासाठी अमेरिकी उत्पादनांची यादी प्रस्तावित करेल.
यात अमेरिकन मांस, तृणधान्ये, वाइन, लाकूड आणि कपडे तसेच च्युइंग गम, डेंटल फ्लॉस, व्हॅक्यूम क्लिनर आणि टॉयलेट पेपर यांचा समावेश असेल.
एक उत्पादन ज्यावर अधिक लक्ष वेधले गेले आहे आणि गटातील देशांमधील मतभेद उघड झाले आहेत ते म्हणजे बोर्बन. आयोगाने 50 टक्के शुल्क राखून ठेवले आहे, ज्यामुळे गट पुढे गेल्यास ट्रम्प यांनी ईयूच्या मादक पेयांवर प्रति-शुल्क लावण्याची धमकी दिली आहे.
फ्रान्स आणि इटली या दोन्ही मद्य निर्यातदारांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. युरोपीय संघ, ज्याची अर्थव्यवस्था मुक्त व्यापारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, कोणत्याही प्रतिसादासाठी त्याला व्यापक पाठिंबा आहे याची खात्री करण्यासाठी उत्सुक आहे जेणेकरून शेवटी वाटाघाटी करण्यासाठी ट्रम्पवर दबाव आणता येईल.
लक्झेंबर्ग येथे सोमवारी ट्रम्प यांच्या स्वीपिंग टॅरिफच्या घोषणेनंतर पहिल्या ईयूव्यापी राजकीय बैठकीचे आयोजन केले गेले असून 27 ईयू सदस्यांमधील व्यापारासाठी जबाबदार असणारे मंत्री या शुल्काचा प्रभाव आणि प्रतिसाद कसा असावा याबद्दल विचारांची देवाणघेवाण करतील.
ईयूच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी सांगितले की बैठकीचे मुख्य उद्दिष्ट वॉशिंग्टनशी शुल्क रद्द करण्यासाठी वाटाघाटी करण्याचा ह़ोता मात्र त्यात अपयश आले तर आपला प्रतिसाद कसा असावा याची तयारी करण्याचा होता.
ब्रेक्सिटनंतरची आमची सर्वात मोठी भीती म्हणजे द्विपक्षीय सौदे आणि एकात्मतेचा होणारा भंग, परंतु तीन किंवा चार वर्षांच्या वाटाघाटीतून ती झाली नाही. अर्थात, येथे तुमची एक वेगळी कथा आहे, परंतु प्रत्येकजण समान व्यावसायिक धोरणात स्वारस्य पाहू शकतो,” असे युरोपियन युनियनच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले.
प्रतिशुल्क
युरोपीय महासंघाच्या सदस्यांमध्ये, प्रतिसाद कसा द्यायचा यावर एकमत नाही. फ्रान्सने म्हटले आहे की युरोपीय महासंघाने शुल्कांच्या पलीकडे जाणाऱ्या पॅकेजवर काम केले पाहिजे आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुचवले आहे की युरोपीय कंपन्यांनी “गोष्टी स्पष्ट होईपर्यंत” अमेरिकेतील गुंतवणूक स्थगित करावी.
आयर्लंड, ज्याची जवळजवळ एक तृतीयांश निर्यात अमेरिकेला जाते, त्याने “विचारपूर्वक आणि मोजूनमापून” प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे, तर अमेरिकेतील ईयूचा तिसरा सर्वात मोठ्या निर्यातदार असलेल्या इटलीने ईयूने प्रतिकार करावा का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
“याचे संतुलन राखणे कठीण आहे. अमेरिकेला चर्चेच्या टेबलवर आणण्यासाठी केले जाणारे उपाय खूप सोपे, साधे असू शकत नाहीत, परंतु तणाव वाढवण्यासाठी फार कठीणही असून चालणार नाहीत,” असे युरोपियन युनियनच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले.
आजतागायत वॉशिंग्टनशी झालेल्या कोणत्याही चर्चेतून नेमके उत्तर मिळालेले नाही. युरोपीय महासंघाचे व्यापार प्रमुख मारोस सेफकोव्हिक यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या समकक्षांशी झालेल्या त्यांच्या दोन तासांच्या बैठकीचे वर्णन ‘अतिस्पष्ट’ असे केले कारण त्यांनी त्यांना सांगितले की अमेरिकेचे शुल्क ‘हानीकारक, अन्यायकारक’ आहेत.
प्रारंभिक ईयू प्रति-शुल्कावरील निर्णयासाठी कोणत्याही परिस्थितीत बुधवारी मतदानासाठी घेतले जाणार असून आणि ईयूच्या 65 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 15 ईयू सदस्यांच्या पात्र बहुमताने त्याला विरोध केला असण्याची शक्यता नसेल तर प्रति शुल्काला मंजुरी दिली जाईल.
ते दोन टप्प्यात लागू होतील, पहिला लहान भाग 15 एप्रिल रोजी आणि उर्वरित एक महिन्यानंतर.
शुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पुढे काय करावे हे ठरवण्यासाठी आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन सोमवारी आणि मंगळवारी पोलाद, वाहन आणि औषधनिर्माण क्षेत्रातील मुख्य अधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा करणार आहेत.
(1 अमेरिकन डॉलर = 0.9102 युरो)
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)