युरोपियन युनियनने (ईयु) युक्रेनला लष्करी मदत देण्याच्या उद्देशाने केंद्रीय निधीला 5 अब्ज युरोची (5.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स) आर्थिक वाढ देण्यास सहमती दर्शविली आहे . बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे युरोपियन युनियन सदस्य देशांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रशियाबरोबर सुरू असणाऱ्या संघर्षात युक्रेनला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असून अमेरिकेकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.
2022ला रशियाने केलेल्या आक्रमणाच्या सुरुवातीपासून, युरोपियन युनियनकडून युक्रेनला पाठवलेल्या शस्त्रास्त्रांच्या पैशांची सदस्य देशांना परतफेड करण्यासाठी त्याच्या मध्य युरोपियन शांतता फंडातून 6.1अब्ज युरो देण्याचे वचन दिले आहे. आता या अतिरिक्त निधीचा वापर 2024 मध्ये कीवला पुरवण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांसाठी केला जाईल. युरोपीय महासंघाच्या निधीमध्ये अतिरिक्त 5 अब्ज युरोची वाढ करण्याच्या प्रयत्नांना जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील मतभेदांमुळे विलंब झाला.
जर्मनीने आता ब्रुसेल्सशी तडजोड केल्याने, त्याच्या द्वैपाक्षिक पाठिंब्याची टक्केवारी निधीविरुद्ध भरून काढली जाऊ शकते. फ्रान्सने युरोपियन संरक्षण कंपन्यांकडून खरेदीला प्राधान्य देण्यास सहमती दर्शविली आहे परंतु विशिष्ट दारूगोळा किंवा सुविधा सहज उपलब्ध नसल्यास युरोपियन युनियनच्या बाहेरील देशांकडे यासंदर्भात चाचपणी करता येईल.
युद्ध सुरू झाल्यापासून युरोपियन युनियन आणि त्याच्या सदस्य देशांनी युक्रेनच्या लष्करी खर्चाला पाठिंबा देत अंदाजे 28 अब्ज युरो खर्च केले आहेत. युक्रेनसाठी आवश्यक असणारा नवा निधी त्याच्या सैन्याकडून येतो, मात्र दारूगोळ्याच्या कमतरतेमुळे आघाडीवर काहीशा दबावाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेने अलीकडेच युक्रेनसाठी 300 दशलक्ष डॉलर्सचे नवीन शस्त्रास्त्र पॅकेज जाहीर केले खरे पण कॉंग्रेसने आणखी 60 अब्ज डॉलर्सचा निधी रोखून धरला आहे.
युरोपीय महासंघाचे नेते पुढील आठवड्यात ब्रुसेल्स येथे होणाऱ्या शिखर परिषदेत युरोपच्या उद्योग व्यसायाला चालना देणे आणि युक्रेनला यानंतरही पाठिंबा देणे सुरू ठेवण्याबाबत चर्चा करणार आहेत. उत्पादन वाढवण्याच्या सध्याच्या आव्हानाला तोंड देत असतानाच आपल्या संरक्षण उद्योगाद्वारे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांचेही उत्पादन वाढवणे हे या समूहाचे उद्दिष्ट आहे. युरोपीय महासंघाकडून मिळणारा हा सर्वसमावेशक पाठिंबा युक्रेनला रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात मदत करण्यासाठी आणि या प्रदेशात स्थैर्य राखण्यासाठी तो वचनबद्ध असल्याचे दिसून येते.
टीम भारतशक्ती