इंडोनेशियामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी फाशीची शिक्षा मिळालेली महिली कैदी, बुधवारी फिलीपिन्स या आपल्या मायदेशी परतली. तिचे नाव मेरी जेन वेलोसो असे असून, 2015 मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दोन आग्नेय आशियाई देशांमधील अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर अखेर मेरी हिच्या घरवापसीला परवानगी मिळली. 39 वर्षीय मेरी ही दोन मुलांची आई असून ती हाऊस हेल्प म्हणून काम करत होती. जकार्ता येथे पत्रकारांशी बोलताना वेलोसो म्हणाली की, ‘आपल्या मायदेशी फिलीपिन्समध्ये जाऊन नव्याने जीवन सुरू करण्याच्या तिचा विचार आहे.’
इंडोनेशियात असताना, मेरी जवळच्या एका सुटकेसमध्ये तब्बल २.६ किलो (५.७३ पौंड) इतके ‘हेरॉईन’ (ड्रज्ग) पोलिसांना सापडले होते. त्यामुळे 2010 मध्तिये ला योग्याकार्टा येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर 5 वर्ष या केससंदर्भातील खटला चालू राहिला आणि शेवटी 2015 मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
त्यावेळी मेरीने ती निर्दोष असल्याचं सांगत, ‘ही ड्रग्ज मी अनावधानाने वाहून नेली होती आणि त्या बॅगेत काय आहे याविषयी मला काहीच कल्पना नव्हती’, असा जबाब नोंदवला होता. मात्र न्यायालयाने याप्रकरणी तिला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान या प्रकरणाच्या पुढील तपासात, “बाली नाइन” या ड्रग चेनमधील उर्वरित पाच सदस्यांना इंडोनेशियामधून पकडून ऑस्ट्रेलियाला आणले गेले आणि त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये या प्रकरणात मेरी वेलोसोचा काहीही हात नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे तिची फाशीच्या शिक्षेतून सुटका करण्यात आली.
मनिलाच्या विमानतळावर येताच वेलोसोला कडक सुरक्षा व्यवस्थेत थेट तेथाल खास महिलांसाठी असलेल्या तुरुंगात नेण्यात आले. यामुळे टर्मिनलच्या बाहेर वेलोसाची वाट पाहणारे तिचे कुटुंबीय परिचीत यांच्याशी तिची भेट होऊ शकली नाही.
“माझी मुलगी निर्दोष असली तरीही त्यांनी तिला गुन्हेगार बनवले. त्यांनी आम्हाला तिला भेटू दिले नाही. आम्हाला तिला मिठी मारायची होती,”… अशा शब्दांत पत्रकारांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना, वेलोसाचे वडील सीझर वेलोसो यांना अश्रू अनावर झाले.
मेरीची आई सेलिया वेलोसो यावेळी म्हणाली की, “माझी मुलगी फिलीपिन्स मध्ये परतली याचेच मला समाधान आहे”
फिलिपाइन्समधील वेलोसोचे वकील एडरे ओलालिया यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी तिच्या कुटुंबियांना तिच्यासोबत तुरुंगात खाजगी वेळ दिला होता.
मेरीला कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेचा आणि कैदी म्हणून तिच्या स्थितीचा आदर करणाऱ्या, फिलीपिन्ससोबतच्या करारामध्ये इंडोनेशियन सरकारने मेरीला मनिला येथे हस्तांतरित करण्यासाठी अखेर सहमती दर्शवली. तिच्या क्षमायाचनाबाबतचा पुढील कोणताही निर्णय आता फिलिपाइन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस जूनियर यांच्यावर अवलंबून असेल, असे या करारात नमूद करण्यात आले आहे.
फिलिपिन्सचे कार्यकारी सचिव लुकास बर्सामिन यांनी सांगितले की, मार्कोस याप्रकरणी काय निर्णय घेतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. येणारी वेळच याचे उत्तर देईल.”
दुसरीकडे इंडोनेशियाने याप्रकरणी झालेल्या करारात मान्य केले आहे की, यापुढे मेरी वेलोसोबाबत फिलिपिन्स जो काही निर्णय घेईल, त्या निर्णयाचा इंडोनेशियन सरकार आदर करेल. मग त्यांनी मेरीची निर्दोष मुक्तता केली तरीही.
फिलिपाइन्सचे परराष्ट्र मंत्री एनरिक मॅनालो यांनी, इंडोनेशियाच्या या “प्रामाणिक आणि निर्णायक कृती” साठी त्यांचे आभार मानले आहेत. ‘इंडोनेशियन सरकराने मेरी वेलोसोला ख्रिसमसच्या सुट्टीसाठी तिच्या घरी, तिच्या देशात परत पाठवले आहे’, असे मॅनालो यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
(रॉयटर्स)