सध्या Syria मध्ये देशांतर्गत समस्यांऐवजी अधिक इतर देशांच्या हस्तक्षेपामुळे रणांगण सदृश परिस्थीती निर्माण झाली आहे. सीरियातील लढाईला पुन्हा एकदा नव्याने तोंड फुटले असून, त्याबाबतच्या परदेशी शक्तींच्या भूमिकांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सीरियातील दहशतवादी गटांच्या सैन्याव्यतिरिक्त बाहेरील अन्य काही राष्ट्रांचे सैन्यही तिथे बऱ्याच काळापासून तैनात आहे. २०११ सालापासूनच अमेरिका, तुर्की, इराण, रशिया या देशांनी सीरियामध्ये आपले सैन्य तैनात केले आहे. अशातच इस्रायलचे सीरियाच्या हद्दीतील हवाई हल्ले हे वारंवार सुरच आहेत.
सीरियात परकीय सैन्यांचा प्रभाव तपशीलवार:
तुर्की
सीरियन बंडखोर गटांनी २०११ मध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात बंड पुकारले होते. तेव्हापासून त्यांच्या ताब्यात असेलेल्या प्रदेशांमध्ये म्हणजेच उत्तर-पश्चिम सीरियामध्ये तुर्कीने आपले सैन्य तैनात केले आहे. २०११ चा उठाव करणाऱ्या काही बंडखोर गटांना तुर्कीने खंबीरपणे पाठिंबा दिला आहे.
सीरियन कुर्दिश सशस्त्र गटांना कमकुवत करणे, हे तुर्कीच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. या गटांनी गृहयुद्धादरम्यान तुर्कीच्या सीमेवर स्वायत्त एन्क्लेव्ह तयार केले होते. तुर्कीची राजधानी असलेलं Ankara शहर, हे सीरियन कुर्दीश गटांना कुर्दिश वर्कर्स पार्टी (PKK) चा विस्तार मानतं. हे गटांनी १९८४ पासून तुर्कीमध्ये बंडखोरी करत आहे. मागील युद्धाच्यावेळी तुर्कीला पळून गेलेल्या सुमारे ३० लाख सीरियन लोकांना सुखरुप मायदेशी परत आणणं हे देखील तुर्कीचा आणखी एक महत्वाचं उद्दिष्टं आहे. २०१६ पासून आजवर तुर्कीने सीरियात चार कारवाया केल्या आहेत.
२०१७ मध्ये तुर्कीने रशिया आणि इराणशी एक करार केला ज्यानंतर तुर्की सैन्याने बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य इदलिब प्रदेशात एकूण १२ वेगवेगळ्या ठिकाणांवर आपले सैन्य तैनात केले. त्यानंतर २०१८ मध्ये तुर्कीने SDF-नियंत्रित आफ्रीनला आपले लक्ष्य बनवून त्यांच्यावर आक्रमण केले आणि २०१९ मध्ये रस-अल-ऐन आणि तेल अब्याद या सीमावर्ती शहरांमध्ये तुर्कीती आणखी एक घुसखोरी यशस्वी झाली. त्याच्या पुढील वर्षी तुर्कीने, सीरियन सैन्याने रशियाच्या पाठिंबा घेत बंडखोरांविरोधात जो हल्ला केला तो रोखण्यासाठी इडलिब नावाच्या प्रदेशात हजारोंच्या संख्येने आपले सैन पाठवले.
सिरीयाची राजधानी असलेले Damascus शहर, याच कारवयांमुळे तुर्कीला कब्जा करु पाहणारी एक हुकुमशाही शक्ती मानते.
रशिया
रशियाने २०१५ साली असदच्या बाजूने लष्करी हस्तक्षेप केला होता. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा हल्ला होता. सोव्हिएत युनियनने इराणशी समन्वय साधून, टार्टसच्या सीरियन भूमध्य बंदरावर आपले नौदल तळ स्थापन केले. त्यावेळी शीतयुद्धाच्या काळात रशियन लष्करी हस्तक्षेपाचा अधिक विस्तार झाला.
त्यावेळी रशियन सैन्याने देखील सीरिया सरकारच्या ताब्यात असलेल्या काही भागांवार आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आजही युद्धाचा तणाव कमी करण्याच्या हेतूने रशियन लष्करी पोलिस त्या भागांत तैनात आहेत. रशिया खुलेआमपणे असद यांना पाठिंबा देत असल्याची टीका, मॉस्कोच्या क्रेमलिननी त्यावेळी केली होती.
इराण आणि मित्र राष्ट्रे
इराणने २०१२ च्या सुरुवातीला, असदला मदत करण्यासाठी आपले रिव्होल्युशनरी गार्ड सीरियामध्ये तैनात केले होते. इराणचा पाठिंबा असलेल्या लेबनॉनच्या हिजबुल्लाहने त्यावेळी यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली होती. इराणसाठी, असद हा एक महत्त्वपूर्ण सहयोगी होता आणि आहे कारण मध्य पूर्वेतील इस्रायल आणि युएसमध्ये त्याचा दबदबा कायम आहे.
इराणला त्याच्या तेहरानच्या दमास्कसशी असलेल्या संबंधांमुळे, पश्चिम सीमेवरून लँड कॉरिडॉरद्वारे इराकमार्गे लेबनॉनपर्यंत आपला प्रभाव पसरवण्याची संधी मिळाली आहे. ३ डिसेंबर रोजी, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘दमास्कसने विचारणा केल्यास तेहरान सीरियात सैन्य पाठवण्याचा विचार करेल. तेहरानने नेहमीच दमास्कस सरकारच्या आमंत्रणावर सल्लागार भूमिका बजावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले’.
इराणी आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाच्या बरोबरीने, तेहरान समर्थित इतर शिया इस्लामी गटांनी महत्त्वपूर्ण लढाऊ भूमिका बजावली आहे. त्यात अफगाणिस्तान आणि इराकमधील गटांचा देखील समावेश आहे. इस्रायलसोबतचे युद्ध ऑक्टोबरच्या मध्यापासून अधिक तीव्र झाल्यामुळे, हिजबुल्लाहने सीरियातील सैनिकांना परत लेबनॉनकडे खेचले, असे वृत्त रॉयटर्सने जाहीर केले आहे. गेल्या आठवड्यात या दोन्ही देशात युद्धविराम झाला असून, सीरियन सैन्याला पाठिंबा देण्याचा हिजबुल्लाचा सध्या चरी इरादा नाही, असेही रॉयटर्सने सांगितले आहे.
सीरियामध्ये इराण आणि इराण-समर्थित सैन्याची उपस्थिती हा इस्रायलसाठी एक मोठा चिंतेचा विषय बनली आहे.
युनायटेड स्टेट्स (अमेरिका)
२०१४ मध्येच सीरियात अमेरिकन लष्करी हस्तक्षेपाची सुरुवात झाली होती. इस्लामिक राज्यांतील जिहादी गटांवर हवाई हल्ले करून, अमेरिकन लक्षराने सीरियात आपला दबदबा निर्माण केला होता. ज्यानंतर त्यांनी सीरिया आणि इराकच्या एक तृतीयांश भागांवर आपले वर्चस्व घोषित केले होते.
सध्या सीरियामध्ये तैनात असलेल्या US Special Force ची एक छोटी तुकडी, इस्लामिक गटांना सीरियाच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागातून बाहेर काढण्यासाठी SDF सोबत हातमिळवणी करुन लढत आहे.
२०१८ मध्येच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी इस्लामिक गटांविरुद्धची ही लढाई आम्ही जवळपास जिंकलो आहोत, असं घोषित करत अमेरिकन सैन्य तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबत जगभरातून अमेरिकेवर टीका झाली ज्यामुळे हा निर्णय वर्षभराच्या आत मागे घेण्यात आला होता. आजही US फोर्सेस सीरियामध्ये तैनात आहेत आणि SDF ला पाठिंबा देखील देत आहेत.
३ डिसेंबर रोजी, अमेरिकेचे राजदूत- रॉबर्ट वुड यांनी सुरक्षा परिषदेला दिलेल्या माहितीनुसार, ‘सीरियातील इस्लामिक गट पुन्हा कधीच कारवाई करणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी ईशान्य सीरियामध्ये अमेरिकन लष्करी तळ आणि सैन्य तैनात ठेवणे आवश्यक आहे.’
अमेरिकेचे सैन्य हे जॉर्डन आणि इराक यांच्यातील सीमेनजीक असलेल्या सीरियाच्या टॅन्फ गॅरिसनमध्ये तैनात आहे. या प्रदेशात इस्लामिक गटांचा सामना करण्यासाठी ते सीरियन बंडखोर सैन्याला पाठिंबा देत आहेत. असदचे सरकार अमेरिकन सैन्याकडे देखील कब्जा करणारे सैन्य म्हणून पाहते. सध्याच्या घडीला सीरियाच्या ईशान्य भागात सुमारे ९०० अमेरिकन सैनिक तैनात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे