सरकारद्वारे ATAGS, हाय मोबिलिटी वाहनांसाठी 6,900 कोटींचे करार

0

संरक्षण मंत्रालयाने (MoD), भारत फोर्ज लिमिटेड आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडसोबत – 155mm/52 कॅलिबरच्या ‘अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टिम्स’ (ATAGS) आणि ‘हाय मोबिलिटी 6×6 गन टोव्हिंग व्हेइकल्स’ खरेदी करण्याबाबत करार केले, ज्यांचे मूल्य अंदाजे 6,900 कोटी रुपये इतके आहे. भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल क्षमतांना वाढवणे आणि लष्करातील तोफखान्याच्या क्षमतांचे आधुनिकीकरण करणे, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.

कराराची औपचारिकता संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत दक्षिण ब्लॉक, नवी दिल्ली येथे पार पडली. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने गेल्या बुधवाराला या कराराला मंजुरी दिली, ज्यामुळे भारतीय सैन्याला 307 ATAGS युनिट्स मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला.

या स्वाक्षरीसह, चालू आर्थिक वर्षात (2024-25) संरक्षण मंत्रालयाने केलेल्या एकूण भांडवली खरेदी करारांची किंमत 1.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या कार्यक्रमादरम्यान, संरक्षण सचिव यांनी DRDO च्या आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE), पुणे येथील ATAGS प्रकल्प संचालकांचे त्याच्या प्रकल्पाच्या वास्तविकतेत महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कौतुक केले, असे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले.

भारतीय लष्कराच्या तोफखाना क्षमतांचे आधुनिकीकरण

नवीन 155mm/52 कॅलिबरचे ATAGS, हे जुन्या आणि लहान कॅलिबरच्या तोफखाना प्रणालींची जागा घेत, लष्कराची ताकद लक्षणीयरित्या वाढवेल. ही खरेदी तोफखान्याच्या आधुनिकीकरणामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, ज्यामुळे सैन्याला अत्याधुनिक प्रणालीसह लांबवर अचूक हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होईल. उच्च कार्यक्षमता आणि विस्तारित श्रेणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ATAGS मुळे, भारताच्या सीमा सुरक्षा- विशेषतः चीन आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा अधिक मजबूत होतील.

ही खरेदी, खाजगी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर होत असलेली पहिली  towed artillery खरेदी आहे, जी भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देते.

“हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताचा अभिमान आहे, जो ‘मेक-इन-इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने रोजगार निर्मिती आणि आर्थिक वृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

स्वदेशी उत्पादन आणि भविष्यातील विस्तार

ATAGS करार कळ्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (KSSL) आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांच्यात 60:40 च्या प्रमाणात लागू होईल. पुण्यातील भारत फोर्ज, KSSL अंतर्गत 60% तोफांची निर्मिती करेल, तर दुसऱ्या सर्वात कमी बोली करणाऱ्या TASL ने उर्वरित 40% तयार करणे अपेक्षित आहे, असे MoD स्रोतांनी सांगितले.

या करारापलीकडे, भारतीय सैन्याने अतिरिक्त 400 हाविटझर्ससाठी एक निविदा जारी केली आहे. भारत फोर्ज, L&T, अदानी डिफेन्स आणि ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड अशा प्रमुख संरक्षण कंपन्या या ऑर्डरसाठी स्पर्धा करत आहेत.

जागतिक ओळख आणि कार्यक्षमता

ATAGS प्रोग्रामला 2023 मध्ये, संरक्षण मंत्रालयाची आवश्यक स्वीकृती (AoN) प्राप्त झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारत फोर्ज आणि टाटा गटाच्या सहकार्याने ATAGS विकसित केले असून, हा प्रकल्प भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील स्वावलंबनाचा पाया आहे.

भारत फोर्जने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमठवला आहे, 2022 मध्ये आर्मेनियाकडून ATAGS साठी एक निर्यात ऑर्डर सुरक्षित केली आहे. त्याच्या कार्यक्षमतेच्या कामगिरीने प्रेरित होऊन, आर्मेनिया कथितपणे अधिक मोठ्या प्रमाणावर एक पुढील ऑर्डर देण्याच्या विचारात आहे.

अत्याधुनिक क्षमता

ATAGS ची प्रभावी फायरिंग रेंज- 35 ते 45 किलोमीटर पर्यंतची असून, चाचणीदरम्यान त्याने 47 किलोमीटरचा विक्रमही रचला आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये विकसित झालेल्या या अत्याधुनिक तोफखाना गन्स आता भारतीय सैन्याची आगीची शक्ती वाढविण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामुळे ती आधुनिक तोफखाना युद्धात अग्रस्थानी येईल.

रवी शंकर


Spread the love
Previous articleजागतिक घडामोडींचा थोडक्यात आढावा…
Next articleIndian Army Conducts Tri-Service Multi-Domain War Game Near China Borders

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here