
अमेरिकन सरकारने परदेशी मदत रोखल्यामुळे, HIV आणि मलेरिया सारख्या रोगांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेने मदत निधी गोठवल्यामुळे जगातील काही सर्वांत गरीब देशांमध्ये जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली असून, ती पुढील काही महिने अशीच राहू शकते, अशी माहिती दोन स्रोतांनी रॉयटर्सला दिली आहे.
यू.एस. एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID), दरवर्षी साधारणपणे 600 दशलक्ष डॉलर्सची मदत पुरवते. ज्यामध्ये औषधं, निदान चाचण्या आणि बेड नेट्स सारख्या उपकरणंचा पुरवठा केला जातो. एचआयव्ही, मलेरिया आणि प्रजनन आरोग्य यांसारख्या मोठ्या आरोग्य पुरवठा कराराचा एक भाग, म्हणून ही मदत केली जाते.
मात्र डोनाल्ड ट्रम्प सरकारने, ही मदत गोठवल्यामुळे काही महिने आगोदर तयार केलेल्या ऑर्डर्स होल्डवर ठेवण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य पुरवठा साखळीचे ज्ञान असलेल्या दोन स्त्रोतांच्या म्हणण्यानुसार आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर लोकांच्या अंदाजानुसार- औषधांसह अन्य उपकरणांचे वितरण, खर्च आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेवर याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय आणि स्विस कंपन्यांवर परिणाम
यू.एस. कंपनी Abbott, स्वित्झर्लंडची Roche आणि भारतीय कंपनी Cipla यासह- Hologic, Viatris, Hetero आणि Aurobindo यासारख्या इतर कंपन्यांनाही या निर्णयाचा फटका बसू शकतो, असे पहिल्या स्रोताने रॉयटर्सला सांगितले.
“आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमची सर्वोच्च प्राधान्ये म्हणजे जगभरातील रुग्णांना आमच्या निदान चाचण्या आणि उपचारांचा सतत प्रवेश सुनिश्चित करणे,” असे Roche च्या एक प्रवक्त्याने Reuters च्या प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. इतर कंपन्यांनी टिप्पणी देण्यास नकार दिला किंवा उत्तर दिले नाही. यू.एस. स्टेट डिपार्टमेंटने टिप्पणीसाठी केलेल्या विनंत्यांना तत्काळ उत्तर दिले नाही.
पहिल्या स्रोताने सांगितले की, “यू.एस. सरकारकडून दिलेल्या सवलतींनी, जी जीवनरक्षक काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी देतात, त्या सवलती फक्त जगभरातील मागण्या असलेल्या ऑर्डर्सवर लागू होत्या आणि त्याही पूर्णपणे कार्यक्षम नसल्याने USAID ची पेमेंट सिस्टीम अद्याप बंद आहे. भविष्यातील निधी आणि ऑर्डर्स अनिश्चित आहेत, अगदी त्या कंपन्यांसाठी देखील जिथे, कच्चा माल एकत्र केला गेला आहे किंवा उत्पादन सामग्री तयार आहे.”
“एचआयव्ही आणि मलेरियासाठी औषधे, निदान चाचण्यांची उपकरणे, बेड नेट्स आणि गर्भनिरोधकांसारख्या प्रतिबंधात्मक साधनांवर, मदत निधी गोठवल्याचा परिणाम होऊ शकतो,” असेही त्यांनी सांगितले.
‘बुलव्हिप’ प्रभाव
USAID च्या निलंबनाचा जागतिक पातळीवर खूप मोठा परिणाम झाला आहे, ज्यामध्ये एचआयव्ही क्लिनिक्स बंद होणे, आपत्कालीन अन्न सहाय्य अडकणे आणि संशोधन थांबवणे इ. गंभीर समस्यांचा समावेश आहे.
या फ्रीझचा परिणाम, वैद्यकीय पुरवठ्यासाठी आवश्यक किंमतीवर देखील होऊ शकतो, कारण कंपन्या त्यांना USAID कडून ऑर्डर मिळत राहतील हे जाणून अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास सक्षम आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
वैद्यकीय पुरवठा साखळी तज्ज्ञ आणि नॉनपार्टिसन काऊन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स या थिंक टँकचे सीनियर फेलो- प्रशांत यादव यांनी सांगितले की, “या उलथापालथीमुळे अगोदरच्या मागणीचे अंदाज पूर्णपणे बदलू शकतात, ज्यामुळे किंमती प्रभावित होऊ शकतात आणि अखेरीस अन्य ग्राहक, जसे की सरकार आणि जागतिक आरोग्य निधी यांच्यात बजेटच्या तुटवडीचा धोका निर्माण होऊ शकतो.”
ते म्हणाले की हे पुरवठा साखळीतील “बुलव्हीप” प्रभावाचे एक उदाहरण आहे, जेथे “कोणतेही छोटे बदल, जरी ते थोड्या कालावधीसाठी असले तरीही, सिस्टममधील प्रत्येक स्तरावर वाढवले जातात”. हा शब्द एका वैज्ञानिक संकल्पनेतून आला आहे ज्यामध्ये चाबूकच्या हालचाली मूळपासून – चाबूक फोडणारा हात – शेवटच्या बिंदूपर्यंत वाढविला जातो.
जरी 90-दिवसांच्या पुनरावलोकनानंतर मदत गोठविली गेली तरी, ट्रम्प प्रशासनाने मूलतः सुचविल्याप्रमाणे, उत्पादन पुन्हा सुरू करणे जटिल असेल आणि कायदेशीर समस्या उद्भवू शकतील, असे अनेक तज्ञांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवांमध्ये समान प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी, समर्पित नॉन-प्रॉफिट संस्था- हेल्थ रिस्पॉन्स अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम कॉटर म्हणाले की, “ही समस्या सोडवणे खूपच कठीण आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुटसह)