इस्रायल-इराण संघर्ष: भारतीय नागरिकांचे तेहरानमधून स्थलांतर सुरू

0

 

इस्रायल-इराण संघर्ष लष्करी युद्धात रूपांतरित होत असताना, दुसरीकडे भारताने या प्रदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न वाढवले ​​आहेत.

आज, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या अर्मेनियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली.‌ वेगाने बिघडत चाललेल्या परिस्थितीबद्दल आणि भारताच्या नागरिकांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी शेजारील देशांशी जवळून समन्वय साधण्याच्या दृष्टीने चर्चा केली.

भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांना, व्हिसाची काळजी न करता, ताबडतोब तेहरान सोडण्याचे आवाहन करणारे एक निवेदन जारी केले आहे. इराणी हवाई क्षेत्र सततच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे बंद असल्याने, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हवाई मार्गाने बाहेर पडणे हा सध्या पर्याय नाही. त्यामुळे रस्तामार्गे बाहेर पडण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

स्पष्ट निर्देशांद्वारे , भारतीय अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले आहे की कोणत्याही परदेशी इतर व्यक्तीला – नातेसंबंध किंवा वैवाहिक स्थिती काहीही असो – स्थलांतर प्रक्रियेदरम्यान भारतीय नागरिकांसोबत बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. तेहरानने नवी दिल्लीला आश्वासन दिले आहे की विमानतळ बंद असले तरी, भूभागावरील सीमा खुल्या आणि स्थलांतरासाठी सुरक्षित राहतील.

तेहरानमधून विद्यार्थ्यांचे स्थलांतर सुरू

तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने भारतीय विद्यार्थ्यांना राजधानीतून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. पुढील ठिकाणांहून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बसेस आधीच तैनात करण्यात आल्या आहेत:

  • तेहरान मेडिकल सायन्सेस विद्यापीठ
  • इराण मेडिकल सायन्सेस विद्यापीठ
  • इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी तेहरान मेडिकल सायन्सेस

स्थलांतराच्या या  प्रयत्नांमध्ये लवकरच ताजरीशमधील शाहिद बेहेश्ती मेडिकल सायन्सेस विद्यापीठ आणि उर्मिया मेडिकल सायन्सेस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. ही दोन्ही विद्यापीठे इराणच्या पश्चिम आणि वायव्य सीमेजवळ आहेत.

भारतीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना राजधानीतील बिघडत्या सुरक्षा परिस्थितीला अधोरेखित करून ताबडतोब बसमध्ये चढण्याचा सल्ला दिला आहे. कोम शहरातूनही स्थलांतर सुरू झाले आहे.

जमीन, समुद्रामार्गे बाहेर काढण्याच्या योजनांचा आढावा घेतला जात आहे

हवाई क्षेत्रावरील निर्बंध अजूनही लागू असल्याने, भारतीय अधिकारी सक्रियपणे पर्यायी स्थलांतर पर्यायांचा शोध घेत आहेत:

  • बंदर अब्बासच्या दक्षिणेकडील बंदरातून संभाव्य सागरी स्थलांतर
  • अझरबैजान, आर्मेनिया आणि संभाव्य अफगाणिस्तानमधून जाणारे भूपृष्ठ मार्ग

इराणी अधिकाऱ्यांनी समन्वय आणि सुरक्षिततेसाठी पासपोर्ट क्रमांक, वाहनांचे तपशील आणि सीमा निर्गमन बिंदूंसह आगाऊ तपशील मागितले आहेत.

या घडामोडींशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले: “विद्यार्थी आणि व्यावसायिकांना इराणमधील सुरक्षित क्षेत्रात हलवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे, तर शेजारील देशांच्या सहकार्याने आकस्मिक स्थलांतर योजना आखल्या जात आहेत.”

तेहरानचा सकारात्मक प्रतिसाद

भारताच्या औपचारिक स्थलांतर विनंतीला प्रतिसाद म्हणून, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून पाठिंबा दर्शविला. “सध्याची परिस्थिती आणि विमानतळ बंद असल्याने, आम्ही याची हमी देतो की सर्व भूसीमा खुल्या राहतील. भारतासह राजनैतिक मिशन नियुक्त क्रॉसिंगद्वारे सुरक्षित बाहेर पडण्यासाठी समन्वय साधू शकतात.”

भारतीय राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांच्या स्थलांतरासाठी इराणने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. फक्त त्यांची माहिती मंजुरीसाठी आगाऊ सादर केलेली असावी.

हजारो विद्यार्थी अडकले

अंदाजे दीड हजार भारतीय विद्यार्थी, ज्यात बहुतेकजण जम्मू आणि काश्मीरचे आहेत, इराणच्या विविध शहरांमध्ये अडकले आहेत. मानवतावादी स्थलांतराचे प्रयत्न सुरक्षितपणे सुरू राहावेत यासाठी युद्धात तात्पुरता विराम देण्याची मागणी वाढत आहे.

भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की काही सीमेवरील पर्यायांचे मूल्यांकन केले जात असले तरी, तात्काळ प्राधान्यांमध्ये इराणमधील सुरक्षित भागात स्थलांतर करणे आणि त्यानंतर भूभागावरील परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने बाहेर पडणे समाविष्ट आहे.

“दूतावास सुरक्षा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. काही विद्यार्थ्यांना आधीच स्थलांतरित करण्यात आले आहे आणि इतर व्यवहार्य पर्यायांची तपासणी केली जात आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

दूतावासाकडून नवीन सूचना जारी

तेहरानमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना असे आवाहन केले आहे की:

  • घरातच राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा
  • ऑनलाइन गुगल फॉर्म वापरून नोंदणी करा
  • सत्य परिस्थितीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी अधिकृत टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा
  • दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात रहा

“कृपया घाबरू नका. शांत रहा आणि आमच्याशी संपर्कात रहा. आम्ही तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत,” असे दूतावासाच्या सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे.

इस्रायल-इराण संघर्ष: तणाव वाढला

इस्रायलने शुक्रवारी इराणच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्व आणि आण्विक पायाभूत सुविधांना लक्ष्य करत अचानक हवाई हल्ला करून ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले. त्या पार्श्वभूमीवर हे स्थलांतराचे प्रयत्न सुरू आहेत. इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या लाटेने प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामुळे हा प्रदेश गेल्या काही वर्षांतील सर्वात अस्थिर संकटात सापडला आहे.

संयमासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आवाहन वाढत असताना, दोन्ही राष्ट्रांनी पुढील लष्करी कारवाईची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleOver 6,000 North Korean Casualties in Ukraine War, Says UK Intelligence
Next articleGoa Shipyard Launches Fifth Fast Patrol Vessel ‘Achal’ for Indian Coast Guard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here