निज्जर प्रकरणी क्लीन चिट, आता भारत-कॅनडा संबंध सुधारण्याची शक्यता

0
ट्रुडो

“निज्जर हत्येत इतर कोणत्याही देशाचा कसलाही निश्चित संबंध नाही,” असा निष्कर्ष उच्चस्तरीय कॅनेडियन फेडरल कमिशनने काढला होता. जून 2023 मध्ये खलिस्तानी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याच्या ट्रुडो सरकारच्या आरोपांची चौकशी करण्याचे काम कमिशनवर सोपवण्यात आले होते. कमिशनच्या अहवालात असेही म्हटले आहे की भारताने ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांबद्दल चुकीची माहिती पसरवली असली तरी त्या संदर्भातही कोणताही निश्चित पुरावा नाही.

हा आरोप ‘हास्यास्पद आणि ‘विशिष्ट घटकांनी प्रेरित’ म्हणून भारताने आधीच फेटाळून लावला आहे. कॅनडातील माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले की, कॅनडासारख्या लांबच्या देशांमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याची इच्छाशक्ती किंवा क्षमता भारताकडे नाही.

या समस्येची सुरूवात अशी आहे की कॅनडाने 2023 मध्ये Foreign Interference Commissionची  स्थापना केली. पुराणमतवादी विरोधी पक्ष आणि इतरांच्या आरोपांना ट्रुडो सरकारचा राजकीय प्रतिसाद म्हणून या आयोगाची स्थापना करण्यात आली. अर्थात चीनने कॅनडाच्या दोन निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला तेव्हा सरकार झोपले होते. त्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या चिनी लोकांविरुद्ध हे गंभीर आरोप होते, असे मला वाटते,” असे बिसारिया म्हणाले.

त्यांच्या मते, भारत-कॅनडातील वादाचे मुद्दे संपुष्टात येतील कारण या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत आणि मार्चमध्ये सत्ताधारी पक्षात नेतृत्व बदल होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हाईट हाऊसमध्ये परतणे हे भारतीयांपेक्षा कॅनडाच्या लोकांसाठी अधिक महत्त्वाचे आहे, असा संशय बिसारिया यांना आहे.

त्यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे, “जर या क्षणी कोणता देश कॅनडाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करताना दिसत असेल, तर तो दक्षिणेकडील शेजारी देश अमेरिका आहे, कारण ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील आगमनाने ट्रुडो यांच्या राजकीय निवृत्तीला गती मिळाली हे सर्वश्रुत आहे.”

दुसरीकडे कॅनडाकडेही चघळण्यासाठी बरेच मोठे विषय आहेत-विशेषतः ट्रम्प यांचे जकात दर, आर्थिक अनिश्चितता, स्थलांतरितांचा धोका इत्यादी.

या सगळ्यात भारत-कॅनडा संबंधांचे काय? बिसारिया म्हणतात की, जरी सध्या राजकीय संबंध खराब झाले असले तरी, भारतीय डायस्पोराचा आकार पाहता, ज्याने लोकांमधील परस्पर संबंध आणि आर्थिक संबंधांसाठी (9 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार) हातभार लावला आहे. त्यामुळे संबंधांमध्ये निर्माण झालेला ताण स्पष्टपणे दुरुस्त करता येईल. तणावपूर्ण संबंधांच्या काळातही व्यापार आणि व्यवसाय पूर्वीप्रमाणेच चालू राहिला.

ट्रुडो पदावरून पायउतार झाल्यावर, ओट्टावामधील नवीन नेते कदाचित भूतकाळात होऊन गेलेल्या घटना विसरून भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंध पुन्हा निर्माण करणे पसंत करतील.

ऐश्वर्या पारीख


Spread the love
Previous articleINSV तारिणीने पार केला, सर्वात दुर्गम सागरी बिंदू Point Nemo
Next articleपॅलेस्टिनी अतिरेक्यांकडून 3 इस्रायली ओलीसांना सोडण्यास सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here