नुकतेच सीरियाचे हुकुमशाह अध्यक्ष बशर अल-असद यांना पदच्युत केल्यानंतर सीरियातील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भारत ISIS च्या पुनरागमनाबाबत अधिक सावध आहे. अमेरिकेप्रमाणेच भारतालाही Syria मध्ये इस्लामी संघटनाचा पुन्हा उदय होण्याच्या धोक्याची चिंता आहे. इसीसच्या उदयामुळे सीरियात कट्टरतावाद तसेच अतिरेकी आणि जिहादी कारवाया वाढण्याचा धोका संभावतो.
अल- असादच्या क्रूर हुकूमशाहीचा अंत आणि 53 वर्षांच्या असद घराण्याची समाप्तीनंतर, या परिस्थीताचा फायदा उचलच सीरियातील जिहादी इस्लामी संघटना पुन्हा तिथे आपले वर्चस्व प्रस्थापित करु पाहत आहेत. परंतू यामुळे पुढे संभावणाऱ्या धोक्यांबाबत भारतीय गुप्तचर संस्थेला चिंता लागून राहिली आहे. त्यांना चिंता आहे की, सीरियामध्ये जर ‘हयात तहरीर अल-शाम’ (HTS ) या अतिरेकी संघटनेचे वर्चस्व पुन्हा वाढले तर त्यातून हिंसक जिहादी कल्पनांना पुनरुज्जीवित होण्यासाठी खत-पाणी मिळेल.
राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, राज्य टेलिव्हिजनवरील व्हिडिओ निवेदनात ज्या बंडखोर सैनिकांनी दमास्कसला मुक्त घोषित केले होते, त्यांच्या हलाचाली आता संशयास्पदरित्या बदलत आहेत. यामुळे सीरियाचे भविष्य अधिक धोक्यात येऊ शकते.
सीरिया सध्या HTS (हयात तहरीर-अल शाम) या दहशतवादी गटाच्या नियंत्रणात आहे जो एकेकाळी अल-कायदाशी (Al-Qaeda) संलग्न होता. HTS ही बंडखोर संघटना पुन्हा कार्यान्वित झाली असून, अबू मोहम्मद-अल-गोलानी (Abu Mohammad -Al-Golani) त्याचे नेतृत्व करत आहे. ज्याचे मूळ नाव अहमद अल-शरा असे आहे.
‘अबू मोहम्मद -अल-गोलानी याने 2016 मध्ये ‘अल कायदा’ या अतिरेकी संघटनेशी संबंध तोडला होता मत्र यामुळे त्याचा भूतकाळ, त्याची नियत आणि त्याचा उद्देश पुसला जाऊ शकत नाही,’ असे दिल्लीस्थित पश्चिम आशिया तज्ञ, मो. मुद्दसिर क्वामर यांनी म्हटले आहे.
2016 मध्ये अल कायदापासून विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर, गोलानीने इतर स्थानिक गटांसह एक सीरिया-केंद्रित सरकारविरोधी आघाडी तयार केली होती. या आघाडीला त्याने ‘जभत फतेह अल-शाम’ (लेव्हंटच्या विजयासाठीचा मोर्चा) असे नाव दिले. जे नंतर बदलून ‘हयात तहरीर अल शाम’ (HTS) असे झाले.
विशेष म्हणजे US, Tukey, संयुक्त राष्ट्र आणि इतर अनेक पाश्चात्य देशांनी याआधीच, HTS ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून अधोरेखित केले आहे.
अमेरिकेने 2018 मध्ये HTS ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आणि त्याचा प्रमुख गोलानीवर $10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षिसही ठेवले.
Jawaharlal Nehru विद्यापीठातील ‘वेस्ट एशियन स्टडीजचे’ असोसिएट प्रोफेसर, क्वामर म्हणतात, “आपण हे विसरता कामा नये की 2016 मध्ये अल-कायदाशी संबंध तोडल्याचा दावा करणाऱ्या गोलानीने इराकमध्ये अबू बकर अल-बगदादीसोबत खूप जवळून काम केले आहे. गोलानीचा अल-कायदासोबतचा भूतकाळ कोणालाही संशयास्पद करेल. म्हणूनच युरोप, आखाती आणि भारतातील बहुतेक देश या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याबाबत साशंक आहेत.”
JNU चे अभ्यासक काय म्हणतात?
अबू बकर अल-बगदादी विषयी बोलताना जेएनयू चे एक अभ्यासक म्हणतात की, ‘बिबट्या कधीही त्याच्या शरीरावरील डाग बदलू किंवा लपवू शकत नाही. बगदादीची नियतही तशीच आहे’
क्वामर म्हणतात की, ‘बगदादीनेच 2012 मध्ये गोलानीला असद सरकारशी लढण्यासाठी एक गट सुरू करण्यासाठी सीरियाला पाठवले होते. त्यामुळे आज कुठल्याही परिस्थीत सीरियाची अखंडितता कायम राहावी असे यांना वाटत नाही.’
स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला दिलेल्या एका खास मुलाखतीत अल-कायदा आणि HTC यांच्यातील संबंधांविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुद्दसिर म्हणाले, “एचटीएस हे अल-कायदा अतिरेकी संघटनेचेच ओझे आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही.”
8 डिसेंबर रोजी अल-असाद यांची राजवट उलथून टाकल्यानंतर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री- अँटोनी ब्लिंकन यांनी इशारा दिला होती की, ISIS या परिस्थीताचा पुरेपुर फायदा घेऊन त्यांच्या कक्षा आणि क्षमता पुन:प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय होतील. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की नवी दिल्ली आणि दमास्कसमधील 4 हजार किलोमीटरचे भौतिक अंतर, हे जिहाद पसरवण्यासाठी आणि भारतीय भूमीवर जिहादी संघटना जोपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑनलाइन जगात फारसे महत्त्वाचे नाही.’
दुसरीकडे मुद्दसिर म्हणाले की, ‘2014 आणि 2016 दरम्यान जेव्हा ISIS इराक आणि सीरियामध्ये सक्रिय होते, तेव्हा भारतीय गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांनी त्यांनी अनेक प्रकरणे उघड केली होती ज्यामध्ये भारतीयांना ऑनलाइन माध्यमातून जिहादाचे धडे शिकवले जात होते. यामध्ये प्रामुख्याने भारतातील- बिहार, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील तरूण मुलं-मुली तसेच डॉक्टर, इंजिनियर आणि आयटी व्यावसायिकांचा समावेश होता.’
‘किंबहुना, इराक आणि सीरियामध्ये या काळात ISIS च्या गटात सामील झालेले अनेक भारतीय सैनिक देखील होते आणि त्यावेळी कट्टरतावादी झालेल्या भारतीयांची संख्या तीन अंकी झाली होती’, असेही त्यांनी सांगितले.
मुद्दसिर यांनी पुढे सुचवले की, ‘सीरियात HTS द्वारे नियंत्रित सरकारच्या उदयानंतर भारतीय गुप्तचर संस्थांना त्यांची कोणत्याही प्रकारची गतिविधी शोधण्यासाठी अधिक सतर्क राहावे लागेल.’
‘’सीरियातून निर्माण होणारा कट्टरतावाद, दहशतवाद आणि जिहाद वाद हे भारतासाठी सर्वाधिक चिंतेची बाब ठरेल, भारतासाठी मोठा धोका बनू शकेल”, असे जेएनयूचे सहयोगी प्राध्यापक यावेळी म्हणाले. त्यांनी भारताला सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचा सल्लाही यावेळी दिला.
‘राष्ट्रीय तपास यंत्रणेने वेळोवेळी बिहार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये IS च्या स्लीपर सेलचा पर्दाफाश केला असून, आयएसने जम्मू-काश्मीरमध्ये शाखा स्थापन करण्याचे अनेकदा प्रयत्न केले आहेत’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारत सीरियाची मदत करणार का?
सीरियातील सद्य परिस्थितीवर भारत अमेरिकेशी चर्चा करेल का, असे विचारले असता, मुद्दस्सिर म्हणाले, की “आमच्याकडे इराण, इस्रायल, सौदी अरेबिया, यूएई आणि अमेरिका यांच्याशी दहशतवादविरोधी उपाययोजनांसाठी आधीच एक स्थापित द्विपक्षीय यंत्रणा आहे. त्यामुळे गरज पडल्यास योग्य प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत दोन्ही देशात चर्चाच होण्याची शक्यता नाकारली जात नाही.’’
ते पुढे म्हणाले की, ‘’सीरिया राष्ट्र सध्या पूर्णपणे डळमळीत आहे आणि त्याची पुनर्बांधणी करणे वाटते तितके सोपे नाहीये. भविष्यात तिथे काय होईल हा खूप जटिल प्रश्न आहे. तरी भविष्यात भारत सीरियाला मदतीचा हात देईल का हे त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल.”
सीरियाच्या पुनर्बांधणीसाठी भारत कशाप्रकारे मदत करेल या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, “जेव्हा सीरियातील परिस्थिती स्थिर होईल तेव्हा भारताकडून काही मदत मिळू शकते. सध्या, आम्ही प्रतिक्षा करा आणि पुढे काय होतंय ते पाहा, अशा परिस्थितीत अडकलो आहोत.”
यावेळी बोलताना, त्यांनी 13 वर्षांच्या गृहयुद्धात सीरियाला झालेल्या नुकसानी आणि विनाशाकडे लक्ष वेधले. “गृहयुद्धादरम्यान, सुमारे 70 लाख सीरियन लोक विस्थापित झाले आणि किमान 50 टक्के लोक हे शेजारील देश आणि युरोपमध्ये निर्वासित झाले. तसेच बहुतेक सीरियी वासीयांनी तुर्कीमध्ये आश्रय घेतला. एकेकाळी तुर्कीमध्ये सुमारे 2.5 दशलक्ष सीरियन होते,’’ अशी माहिती मुद्दस्सिर यांनी यावेळी दिली.
भारत – सीरियामध्ये चांगले संबंध
“भारताचा सीरियामध्ये कोणतेही राजकीय मतभेद नाहीत. दोन्ही देशात कोणताही प्रलंबित प्रश्न नसून त्यांच्यातील संबंध आधीपासूनच चांगले आहेत”, असे मुद्दस्सिर यावेळी म्हणाले. भारत आणि सीरियामध्ये अनेक सामंजस्य करार झाले असल्याची महितीही त्यांनी दिली. ‘’मात्र, सध्या सीरियात सुरु असलेल्या गृहयुद्धामुळे दोन्ही देशांमधील व्यवहार पूर्ववत होण्यासाठी आम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल”, असे मुद्दसिर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सीरियातील संकटाच्या परिणांमावर बोलताना ते म्हणाले, “जर सीरिया स्थिर नसेल आणि इराकमध्ये 2005 ते 2010 दरम्यान घडलेल्या घटनांप्रमाणेच याहीवेळी जर बंडखोरीचा स्फोट झाला तर शिया आणि सुन्नी यांच्यातील सांप्रदायिक गृहयुद्ध अटळ आहे. ज्याचे परिणाम नक्कीच खूप वाईट असतील. या गृहयुद्धाचा फटका इस्रायल, पॅलेस्टिनी प्रदेश, लेबनॉन, जॉर्डन, तुर्कस्तान आणि काही प्रमाणात इजिप्तलाही बसेल”, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘इराक आणि GCC (गल्फ कोऑपरेशन कौन्सिल) या देशांनाही या गृहयुद्धाचा फटका बसू शकतो’.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत नेहमीच प्रयत्नशील
जेएनयूचे शिक्षणतज्ज्ञ म्हणाले की, ‘भारताचा आखाती देशांसोबतचा संबंध खूप व्यापक आहे.
भूमध्यसागर स्थिर नसल्यास भारताला मोठ्या राजकीय आणि सामरिक आव्हानांना तोंड द्यावे लागेल.’
भारताने आपल्या नागरिकांना सीरिया किंवा अन्य देशांतून कठीण काळात सुखरुप बाहेर काढल्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, की ‘भारत आपल्या नागरिकांना संघर्ष क्षेत्रातून तसेच कोविडच्या काळात जगभरातील विविध देशांतून सुखरुप बाहेर काढण्यासाठी नेहमीच सक्रिय राहिला आहे आणि त्यात यशस्वीही झाला आहे.’
‘मध्यपूर्वेतील इतर देशांच्या तुलनेत सीरियामध्ये भारतीय नागरिकांची संख्या ९० च्या वर आहे. भारताने सीरियातील 44 यात्रेकरूंसह आपल्या 75 नागरिकांच्या सुरक्षित परतीची खात्री केली आहे.’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)
अनुवाद- वेद बर्वे