तटरक्षकदलाकडून प्रदूषण नियंत्रण सरावाचे आयोजन

0
Indian Coast Guard-Pollution

समुद्रावर पसरणाऱ्या तेल तवंगाच्या समस्येबाबत चर्चा

दि. २४ मे: भारताच्या किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबरच मदत आणि बचाव, तसेच सागरी प्रदुषणाविरोधात सामना करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय तटरक्षक दलाने पश्चिम बंगालमध्ये हल्दीया येथील तटरक्षक दलाच्या जिल्हा क्रमांक आठ मुख्यालयात एका प्रदूषण प्रतिसाद चर्चासत्राचे आणि सागरी प्रदूषण नियंत्रण सरावाचे आयोजन करण्यात आले होते. समुद्रावर पसरणाऱ्या तेल तवंगाच्या अतिशय गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी, तेल तवंगाची हाताळणी करणाऱ्या संस्थांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते.

चर्चासत्रात सहभागी होताना या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष आपत्तींच्या आभासी परिस्थितीची हाताळणी करताना आपल्या क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी आणि या सरावामध्ये सहभागी झालेल्या सर्वांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी प्रदूषण प्रतिसादकारक अत्याधुनिक सामग्रीच्या उपयुक्ततेचे सादरीकरण करण्यात आले. या मुळे अशा पर्यावरणविषयक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपल्या सज्जतेमध्ये सुधारणा करण्याचा अनुभव प्रतिनिधींना घेता आला.

तटरक्षक दलाच्या जिल्हा क्रमांक आठ मुख्यालयाच्या प्रमुखांनी ताळमेळ आणि राष्ट्रीय तेल तवंग आपत्ती आकस्मिकता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. सागरी संसाधनांचे संरक्षण करण्याची सामूहिक जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली आणि सुरक्षित समुद्र आणि स्वच्छ किनारपट्ट्यांविषयीच्या तटरक्षक दलाच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

विनय चाटी


Spread the love
Previous article‘युद्धाच्या पारंपरिक स्वरूपाला तंत्रज्ञानामुळे बदलता आयाम’
Next articleForeign Students Flee Kyrgyzstan After Mob Attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here