इंडोनेशियन नौदल प्रमुख ॲडमिरल मुहम्मद अली आणि भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आणि दोन जवळच्या सागरी शेजारी देशांमधील संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने व्यापक चर्चा केली. इंडोनेशियन नौदलाचे चीफ ऑफ स्टाफ ॲडमिरल अली हे 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा एक भाग म्हणून भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.
भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, संरक्षण उद्योगातील माहितीची देवाणघेवाण करणे, यातील क्षमता आणि सहकार्य वाढवण्याशी ही चर्चा केंद्रित होती. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘समुद्र शक्ती’ सरावासारख्या संयुक्त उपक्रमांना पुढे नेणे, परिचालन सहकार्य वाढवणे आणि सागरी चोरी तसेच समुद्रातील इतर बेकायदेशीर घटनांसारख्या सामायिक सागरी आव्हानांचा सामना करणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
या दौऱ्यात Information Fusion Centre -हिंद महासागर क्षेत्र (IFC-IOR) आणि शस्त्रे तसेच इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली अभियांत्रिकी आस्थापना ((WESEE) यांसह प्रमुख सागरी आस्थापनांचाही सहभाग होता. या संवादांमध्ये प्रादेशिक सहकार्य वाढवणे आणि सागरी क्षेत्रातील जागरूकता सुधारण्यावर भर देण्यात आला. ॲडमिरल मुहम्मद अली यांनी ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडला (BAPL) देखील भेट दिली, जिथे त्यांनी संरक्षण तंत्रज्ञान आणि धोरणातील द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यासाठी कल्पना तसेच अंतर्दृष्टीची देवाणघेवाण केली.
ॲडमिरल मुहम्मद अली यांचे भारतीय नौदल आणि इतर संरक्षण भागधारकांशी असलेले संबंध प्रादेशिक सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि शांततापूर्ण सागरी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सामायिक वचनबद्धता अधोरेखित करतात. मुहम्मद अली यांचे भारतीय नौदल आणि इतर संरक्षण भागधारकांशी असलेले संबंध प्रादेशिक सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि शांततापूर्ण सागरी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सामायिक वचनबद्धता अधोरेखित करतात.
Adm Muhammad Ali, Chief of Staff, #IndonesianNavy, was received by Adm Dinesh K Tripathi, #CNS with a ceremonial Guard of Honour at the South Block Lawns, New Delhi, on #27Jan 25.
The Principals engaged in interactions to deepen #maritimecooperation & strengthen the bond… pic.twitter.com/xSgeXpwlxX
— SpokespersonNavy (@indiannavy) January 27, 2025
दरम्यान, भारत आणि इंडोनेशिया ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांच्या निर्यातीसाठी 4 कोटी 50 लाख डॉलर्सच्या कराराला अंतिम रूप देण्यासाठी चर्चा करत आहेत. रविवारी, ॲडमिरल मुहम्मद अली यांच्या नेतृत्वाखालील इंडोनेशियाच्या वरिष्ठ संरक्षण शिष्टमंडळाला ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या क्षमतेची माहिती देण्यात आली, जे भारताच्या सशस्त्र दलांसाठी एक महत्त्वाची संपत्ती बनले आहे.
इंडोनेशियन नौदल प्रमुख मुहम्मद अली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारतातील ब्रह्मोस एरोस्पेस मुख्यालयाला भेट दिली. ब्रह्मोसच्या भारत-रशिया संयुक्त उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयतीर्थ आर. जोशी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाशी संवाद साधला. ब्रह्मोसच्या निर्यातीसाठी प्रस्तावित हा करार झाला तर फिलिपिन्सनंतर 290 किलोमीटरच्या पल्ल्याचे क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा आसियान देश ठरेल.
टीम भारतशक्ती