पूर्व फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर ॲडमिरल राजेश धनखड यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, शक्ती आणि किल्टनसह इतर भारतीय नौदलाच्या युद्धनौका सोमवारी दक्षिण चीन समुद्रात तैनात होण्यासाठी सिंगापूरला पोहोचल्या. नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सिंगापूर प्रजासत्ताकाचे नौदल कर्मचारी आणि सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तांनी आगमनानंतर जहाजांचे मनापासून स्वागत केले, जे दोन्ही देशांमध्ये असलेल्या दृढ संबंधांचे प्रतीक होते.
दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या पूर्व फ्लीटच्या ऑपरेशनल डिप्लॉयमेंटचा हा एक भाग आहे. नौदलाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दोन्ही सागरी देशांमध्ये दीर्घकाळापासून चालत आलेली मैत्री आणि सहकार्य या अशा अनेक घडामोडी आणि उपक्रमांद्वारे आणखी मजबूत करण्यासाठी सज्ज झालो आहोत.
Indian Naval ships #INSDelhi, #INSShakti & #INSKiltan led by RAdm Rajesh Dhankhar, #FOCEF arrived #Singapore on #06May to a warm welcome by personnel of Republic of Singapore Navy, #RSN & the @HCI_Singapore staff.
The visit is part of the Op Deployment of #IndianNavy‘s… pic.twitter.com/stdsQAoC0T— SpokespersonNavy (@indiannavy) May 7, 2024
जहाजे बंदरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या काळात विविध उपक्रम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय उच्चायुक्तांशी संवाद, सिंगापूर प्रजासत्ताकाच्या नौदलाशी व्यावसायिक संबंध, तसेच शैक्षणिक आणि कम्युनिटी संपर्क यांचा समावेश आहे. दोन्ही नौदलांची सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करणारे हे उपक्रम भारतीय नौदल आणि सिंगापूर प्रजासत्ताक नौदल यांच्यातील दृढ संबंधांचा पुरावा आहेत.
भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांसाठी त्यांच्या लष्करी गुंतवणुकीचा विस्तार, सखोलता आणि सुरक्षा सल्लामसलत, युद्धखोर चीनच्या तोंडावर त्यांच्या लष्करी आणि राजनैतिक डावपेचांचा एक भाग आहे.
या व्यतिरिक्त सिंगापूर-भारत सागरी द्विपक्षीय सराव (SIMBEX) हा जवळपास 1994 पासून सुरू करण्यात आला असून भारतीय नौदलाने अन्य कोणत्याही देशांसोबत केलेला हा सर्वात लांब आणि सतत चालणारा सराव असल्याचा उल्लेख केला जातो.
चीनची दक्षिण चीन समुद्रात वाढलेल्या दादागिरीच्या पार्श्वभूमीवर एक समान आणि सामायिक धोक्याची धारण एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा तसेच प्रादेशिक अखंडतेचा आदर करणारी प्रादेशिक चौकट निर्माण करण्याची गरज यामुळे भारतासह व्हिएतनाम, फिलीपिन्स, सिंगापूर आणि इंडोनेशियासह अनेक आसियान देशांसोबत संरक्षण विषयक जवळची भागीदारी निर्माण करण्यास प्रवृत्त केले आहे. अशा संबंधांमध्ये लष्करी ते लष्करी सराव, लष्करी देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामायिक समज गाठण्यासाठी राजकीय संवाद यांचा समावेश करण्यात आला आहे.
टीम भारतशक्ती