भविष्यातील युद्धांसाठी एकात्मता आणि नवोन्मेष आवश्यक – CDS चौहान

0

संरक्षण दलाचे प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान, यांनी भारताच्या ‘थिएटरायझेशन’च्या प्रवासासंदर्भात एक अंतर्गत दृष्टीकोन मांडला, ज्यात त्यांनी संयुक्त कारवाया, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि धोरणात्मक एकात्मता कशाप्रकारे देशाच्या लष्करी सज्जतेला आकार देत आहेत, याचा आढावा घेतला.

मुख्य संपादक नितीन गोखले यांच्याशी संवाद साधतेवेळी, जनरल चौहान म्हणाले की, “थिएटर कमांड्स भारताच्या सशस्त्र दलांसाठी एक ‘गेम-चेंजर’ ठरणार आहे. विशेष म्हणजे, हे कमांड्स देशाच्या अद्वितीय सामरिक आणि भौगोलिक गरजांनुसार तयार केले जात आहेत.” मंगळवारी, नवी दिल्ली येथे आयोजित ‘भारतीय संरक्षण परिषद 2025’ मध्ये ते बोलत होते.

थेट ऑपरेशन्स नाही, तर धोरणात्मक समन्वय

जनरल चौहान यांनी आपले कार्य स्पष्ट करताना सांगितले की, “CDS हे लष्करी दलांना थेट आदेश देत नाहीत. तर, तीनही सेवा दलांमध्ये समन्वय साधणे, त्यांचे धोरणात्मक मार्गदर्शन देणे, आणि संयुक्त नियोजन सुनिश्चित करणे, यावर त्यांचे लक्ष केंद्रित असते. ऑपरेशनल जबाबदारी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सकडेच राहते, परंतु CDS स्तरावरचा समन्वय विविध क्षेत्रांमध्ये सुसंगती आणि एकात्मता सुनिश्चित करतात.

अनुभवातून शिकवण

CDS यांनी सांगितले की, अलीकडच्या लष्करा ऑपरेशन्समध्ये मिळालेले यश हे कुठल्याही एका घटकावर अवलंबून नसून, धोरणात्मक स्पष्टता, सेवा युनिट्समधील सहकार्य आणि वेळेवर झालेली अंमलबजावणी या गोष्टींवर आधारित आहे. अशा मोहिमांमधून मिळालेली शिकवण, वेळोवेळी थिएटरायझेशनमध्ये लागू केली जात आहेत, ज्यामुळे कमांड संरचना आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रिया अधिक परिपूर्ण होत आहेत.

थिएटर कमांड्स आणि भविष्यातील युद्ध

जनरल चौहान यांनी जाहीर केले की, थिएटर कमांड्सच्या नियोजनातील सुमारे 90% काम पूर्ण झाले असून, उर्वरित सुधारणा ऑपरेशनल अनुभवावर आधारित आहेत. त्यांनी सायबर आणि संज्ञानात्मक युद्ध यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांच्या वाढत्या महत्त्वावरही भर दिला. तसेच, तंत्रज्ञानाचा वेगाने अवलंब करण्यासाठी विविध उद्योग आणि स्टार्टअप्ससह सहकार्य वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, व्यावहारिक परिणाम आणि कृतीयोग्य रणनीतींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, लष्करी सेमिनार्सचे रि-डिझाईन केले जात असल्याचेही ते म्हणाले.

संभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • संयुक्त एकात्मता ही ऑपरेशनल यशासाठी अत्यावश्यक आहे.
  • तंत्रज्ञानातील वेगवान बदलांना चपळता आणि नवकल्पना यांची जोड देणे आवश्यक आहे.
  • थिएटर कमांड्स भारताच्या धोरणात्मक वास्तवानुसार तयार केल्या जात आहेत.
  • सध्याच्या कारवायांतून मिळालेली शिकवण, भविष्यातील नियोजनाला दिशा देत आहेत.

चौहान यांनी अखेरीस असा निष्कर्ष काढला की, “थिएटरायझेशन हा केवळ संस्थात्मक बदल नाही, तर ती एक धोरणात्मक झेप आहे, जी भारताच्या लष्करी दलांना चपळ, एकात्मिक आणि आधुनिक युद्धाच्या आव्हानांसाठी सज्ज ठेवते.”

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleजागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारताचा संरक्षण उद्योग निर्णायक टप्प्यावर
Next articleमीडिया उद्योजक म्हणून गेल्या 10 वर्षांमध्ये मी शिकलेल्या 10 गोष्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here