या आठवड्याच्या ‘Defence Mantra’ च्या एपिसोडमध्ये, मुख्य संपादक नितीन ए. गोखले यांनी, बंगळुरूच्या Aero India 2025 मध्ये घेतलेला अनुभव, कार्यक्रमात सहभागी कंपन्यांबद्दलचे त्यांचे विचार तसेच यादरम्यान झालेले महत्त्वपूर्ण करार आणि भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाच्या ‘दमदार कामगिरी’ विषयी सांगितले. ज्यामुळे भारत ‘मेक इंडिया या’ संरक्षण उत्पादन उपक्रमांतर्गत, आत्मनिर्भर होण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
स्वदेशी तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित करत, या कार्यक्रमाने जागतिक आणि देशातील प्रमुख एरोस्पेस कंपन्यांना एकत्र आणले, ज्यांनी भारताच्या संरक्षण उत्पादन आणि निर्यात क्षमतेतील प्रगतीचे दर्शन घडवले.
एरो इंडिया कार्यक्रमातील एक प्रमुख आकर्षण होते ‘भारत पॅव्हिलियन’, जिथे झालेल्या 275 हून अधिक प्रदर्शनांनी लष्करी विमानांच्या निर्मीतीतील प्रगती दर्शविली, ज्यात प्रगत मध्यम लढाऊ विमानांचा (AMCA) समावेश होता. हा प्रकल्प पुढील पिढीतील लढाऊ विमाने विकसित करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व करतो. यावेळी स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (LCA) ने अनेक हवाई प्रदर्शने केली, ज्यामध्ये त्यांनी चपळतेचे आणि आपल्या युद्ध तयारीचे दर्शन घडवले.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), भारताच्या एरोस्पेस उद्योगातील एक प्रमुख खेळाडू, डिलिव्हरी टाइमलाइनच्या चिंतेमुळे विमान उत्पादनाला गती देण्यास वचनबद्ध आहे. या कार्यक्रमात भारतातील आघाडीच्या संरक्षण कंपन्या देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करण्यावर चर्चा करताना दिसल्या.
कार्यक्रमातील आंतरराष्ट्रीय सहभाग देखील मजबूत होता. अमेरिकेन एअर फोर्सचे F-35 जेट फायटर आणि रशियाचे Su-57 स्टेल्थ फायटर यांनी यावेळी आपले शक्तीसामर्थ्य सादर केले. मात्र, कार्यक्रमाचा मुख्य फोकस हा भारताची स्वदेशी क्षमता मजबूत करण्यावरच होता. यावेळी रशियाने भारतात Su-57 सह-निर्मित करण्याची ऑफर दिली, ज्यामुळे भारताच्या जागतिक संरक्षण सहकार्यांतील क्षमता विकसित होणाऱ्या भूमिकेचे दर्शन झाले. तरीही, नितीन यांचे मत आहे की, ‘भारत ना Su-57 विकत घेईल, ना F-35 फायटर विकत घेईल.’
त्यांनी, iDEX (इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स) कंपन्यांविषयी देखील चर्चा केली आणि iDEX च्या रोमांचक संशोधनाविषयी आणि विकासाविषयीचे आपले विचार मांडले.
एरो इंडिया 2025 ने, वाढत्या संरक्षण पॉवरहाऊसच्या रूपात भारताचे स्थान भक्कम केले आहे आणि हे सिद्ध केले आहे की. स्वदेशी तंत्रज्ञान आणि नावीन्य हे भारताच्या भविष्यातील लष्करी धोरणांचे केंद्रस्थान आहे. या कार्यक्रमाने एक प्रमुख संरक्षण निर्यातदार बनण्याच्या भारताच्या दृष्टीला बळकटी दिली आणि स्वावलंबनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले.