भारताच्या पहिल्या लष्करी अंतराळ सरावाला सुरूवात

0
अंतराळात
सीडीएस जनरल अनिल चौहान

भारताच्या अंतराळातील राष्ट्रीय धोरणात्मक उद्दिष्टांचे रक्षण करण्यासाठी लष्कराने आपला पहिलाच अंतराळ सराव सुरू केला आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी ‘प्रमुख सक्षमकर्ता’ म्हणून अंतराळाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, “अंतरक्षा अभ्यास 2024” नावाचा हा सराव संरक्षण अंतराळ संस्थेद्वारे 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयांतर्गत आयोजित करण्यात आला आहे.
या अभ्यासाचा उद्देश अंतराळ-आधारित मालमत्तेसंदर्भात वाढत असलेल्या धोक्यांचा अभ्यास करणे आणि त्यानुसार रणनीती आखणे हा आहे, कारण अंतराळातील जागा मोठ्या प्रमाणात “गर्दीने भरलेली, स्पर्धात्मक आणि व्यावसायिक” होत आहे, असे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी नमूद केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून अंतराळात राष्ट्रीय हितसंबंधांना प्राधान्य देण्याचे आवाहन जनरल चौहान यांनी लष्करी नेतृत्वाला केले.
अंतराळातील भारताची धोरणात्मक उद्दिष्टे बळकट करण्यात आणि लष्करी मोहिमांमध्ये अंतराळ क्षमता एकत्रित करण्यात अंतराळ अभ्यास 2024 महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. आपल्या उद्घाटनपर भाषणात, सीडीएस जनरल चौहान सरावावर भर देत म्हटले की, “एकेकाळी अंतिम सीमा मानले जाणारे अंतराळ आता भारताच्या संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणेचे महत्त्वपूर्ण प्रवर्तक आहे.
संरक्षण अंतराळ संस्थेला या अभ्यासाद्वारे अंतराळ-आधारित मालमत्तांची सखोल समज, भागधारकांमध्ये समन्वय वाढवणे आणि अंतराळ प्रणालींवरील परिचालन अवलंबित्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

टीम भारतशक्ती

 

 


Spread the love
Previous articleIndia, Sri Lanka Coast Guards Review Regional Maritime Threats
Next articleNorth Korea Ratifies Defence Pact With Russia Amid Intensifying Ukraine Conflict

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here