भारतातील MSMEs अर्थात- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, हे देशाच्या संरक्षण क्षेत्राचा मजबूत कणा आहेत, कारण संरक्षण क्षेत्रातील नाविन्यनता, आत्मनिर्भरता आणि जागतिक स्पर्धात्मक क्षमता वाढवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ‘डिफेन्स मंत्रा’च्या या एपिसोडमध्ये, भारतशक्तीचे संस्थापक आणि मुख्य संपादक- नितीन ए. गोखले यांनी, MSMEs कशाप्रकारे भारताच्या लष्करी क्षमतेचे भविष्य घडवत आहेत, यावर प्रकाश टाकला आहे.
हाय-टेक एव्हीओनिक्स, रडार आणि शस्त्रास्त्रांसाठी महत्त्वपूर्ण घटकांचा पुरवठा करण्यापासून ते मानवरहित हवाई वाहने (UAVs), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अंतराळ तंत्रज्ञानातील अग्रगण्य प्रगतीपर्यंत, भारतीय MSMEs संरक्षण नवकल्पनामध्ये आघाडीवर आहेत. किफायतशीर उत्पादन, संशोधन आणि विकास आणि दुहेरी-वापर तंत्रज्ञानातील त्यांचे योगदान भारताला आयात अवलंबित्व कमी करण्यास आणि आत्मनिर्भर भारत उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करत आहेत.
iDEX, संरक्षण खरेदी प्रक्रिया (DPP) 2020, तंत्रज्ञान विकास निधी (TDF) आणि उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरची स्थापना..यासारख्या सरकारी उपक्रमांनी MSMEs साठी एक समृद्ध परिसंस्था निर्माण केली आहे. ही धोरणे स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देतात, निर्यात सुलभ करतात आणि संरक्षण नवकल्पनांना चालना देण्यासाठी आर्थिक सहाय्य देतात. नितीन गोखले यांनी यावेळी एरो इंडिया प्रदर्शनातील, संरक्षण प्रणालीच्या महत्वपूर्ण कामगिरीचा देखील उल्लेख केला, जिथे Alt Air Infrasec आणि Newspace Technologies सारख्या स्टार्टअप्सनी गेम चेंजिंग UAV डिझाईन्सचे सादरीकरण केले.
Alt Air ची मानवरहित हेलिकॉप्टर्स नौदलाच्या गुप्तचर क्षमतेला बळकटी देत आहेत, तर Newspace मॅनड-युनमॅन्ड टीमिंग आणि लोइटिंग म्युनिशन्समध्ये नवे मार्ग दाखवत आहेत. याव्यतिरिक्त, नव्या युगातील बॅटलफिल्ड मॅनेजमेंट सिस्टम्स (BMS) आर्मड फॉर्मेशन्ससाठी आवश्यक परिस्थितीजन्य जागरूकतेत सुधारणा आणत आहेत.
जागतिक संरक्षण क्षेत्रातील दिग्गजांनी भारताची क्षमता ओळखल्यामुळे, MSMEs तंत्रज्ञानातील अंतर कसे भरून काढत आहे आणि जागतिक संरक्षण उद्योगात भारताला महत्त्वाचा खेळाडू म्हणून कशाप्रकारे स्थान देत आहे, याविषयीची ही महत्वपूर्ण चर्चा तुम्ही अजिबात चुकवू नका!