INSV तारिणीने पार केला, सर्वात दुर्गम सागरी बिंदू Point Nemo

0
INSV
लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए., यांनी आयएनएसव्ही तारिणीवर 30 जानेवारीला पॉइंट निमो यशस्वीपणे पार केला.

सागरी शोधातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडत, लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए, यांनी INSV तारिणीवर, 30 जानेवारी रोजी-भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ००:३० वाजता, ‘पॉइंट निमो’ हा सर्वात दुर्गम सागरी बिंदू  यशस्वीपणे पार केला. भारतीय नौदलाच्या सांगण्यानुसार, फॉकलंड बेटांमधील लिटेल्टन- न्यूझीलंड ते पोर्ट स्टॅनली पर्यंतच्या त्यांच्या, नेव्हिका सागर परिक्रमा II च्या, तिसऱ्या टप्प्यादरम्यान ही मोहिम पार पडली.

पॉइंट नीमो, ज्याचे स्थान 48°53′S 123°24′W या निर्देशांकावर आहे, त्याला दुर्गमतेचा महासागरीय ध्रुव अर्थात पृथ्वीवरील सर्वात दुर्गम स्थान म्हणून ओळखले जाते. दक्षिण प्रशांत महासागरातील या बिंदूच्या जवळपासचा भूभाग देखील 2,688 किलोमीटर दूर आहे. त्याची दुर्गमता इतकी तीव्र आहे की, येथून सर्वात जवळची मानवी उपस्थिती म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या अंतराळवीरांची उपस्थिती, जे वरून या ठिकाणाच्या आसपास कक्षेत फिरत असतात.

याविषयची रंजक बाब म्हणजे, पॉइंट नीमो हे ठिकाण अंतराळयानाचे कबरिस्तान म्हणूनही ओळखले जाते, जिथे वापरात न आलेले उपग्रह आणि अंतराळ स्थानके, इन्फॉर्मॅटिक पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात पुनः प्रवेश करण्यासाठी तसेच महासागरात पाडण्यासाठी मार्गदर्शित केली जातात, यामुळे मानवी वस्तीवर संकट ओढवत नाही.

पॉईंट निमो, पृथ्वीवरील सर्वात दुर्गम सागरी ध्रुवपॉइंट निमो, पृथ्वीवरील सर्वात दुर्गम सागरी ध्रुव

स्पॅनिश संशोधन जहाज Hespérides हे, 1999 मध्ये पहिल्यांदा पॉइंट नीमोवरून पार गेले होते. त्यानंतर, फक्त काहीच जहाजांनी या दुर्गम ठिकाणावरून प्रवास केला आहे. INSV तारिणीने या विशेष यादीत आपले स्थान पटकावले असून, विशेष म्हणजे केवळ पवनशक्तीच्या जोरावर त्याने हा पराक्रम साधला आहे, जो त्यांच्या क्रू सदस्यांच्या कौशल्य आणि ठाम निर्धाराचे प्रतिक आहे.

भारतीय नौदलाने एका निवेदनात सांगितले की, अधिकाऱ्यांनी पॉइंट नीमो पार करत असताना तेथे पाण्याचे काही महत्वपूर्ण नमुने संकलित केले. हे नमुने राष्ट्रीय महासागरीय संस्था (NIO) द्वारे तपासले केले जातील. पाण्याचे हे नमुने महासागरातील परिस्थितीवर, समुद्री जैवविविधता आणि रासायनिक संरचना यावर सखोल माहिती प्रदान करण्याच्या उद्देशाने घेतले गेले आहेत, जे जागतिक महासागरी संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देतील.

नेव्हिका सागर परिक्रमा II, ही भारताच्या महिला नौदल अधिकाऱ्यांची असिम आत्मशक्ती आणि वैज्ञानिक सहकार्य व महासागरी अन्वेषणात प्रगती करण्यासाठीची वचनबद्धता दर्शवते. या अद्वितीय टप्प्यानंतर, क्रू आपला पुढील गंतव्य—पोर्ट स्टॅनली—कडे मार्गक्रमण करत आहे, असे अधिकृत निवेदनात नमूद केले आहे.

INSV तारिणीने, पृथ्वीचा सर्वात दुर्गम सागरी बिंदू यशस्वीरित्या पार केलाINSV तारिणीने, पृथ्वीचा सर्वात दुर्गम सागरी बिंदू यशस्वीरित्या पार केला

‘नाविका सागर परिक्रमा II’, ही भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी सुरू केलेली एक ऐतिहासिक पृथ्वीच्या संपूर्ण गोलाची परिक्रमा आहे. याच्या आधीच्या आवृत्तीसोबत (ज्यामध्ये सहा महिलांचे दल होते) तुलना केली असता, या असाधारण परिक्रमेमध्ये यावेळी फक्त दोन महिला सहभागी आहेत.

ही परिक्रमा औपचारिकपणे २ ऑक्टोबर २०२४ रोजी, गोव्याच्या पणजी येथील नौदल महासागरी प्रवास केंद्र, INS मंडोवी येथे, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करत सुरु करण्यात आली. अधिकारी INSV तारिणी या जहाजावर, अंदाजे आठ महिन्यांच्या समुद्रप्रवास करत आहेत, ज्यात सुमारे २३,४०० नौटिकल माईल्स पार केली जाणार आहेत. या मोहिमेची समाप्ती मे २०२५ मध्ये होण्याची अपेक्षा आहे.

केवळ प्रतिकात्मक महत्त्वापलीकडे, नेव्हिका सागर परिक्रमा II ही वैज्ञानिक संशोधनासाठीही महत्त्वपूर्ण ठरू इच्छिते. या मोहिमेद्वारे भारताच्या नौदल अधिकाऱ्यांच्या असिम आत्मविश्वासाची आणि महासागरी अन्वेषण सीमेच्या पलीकडे जाण्याच्या वचनबद्धतेची प्रचिती दिली जात आहे, तसेच जागतिक वैज्ञानिक सहकार्याच्या प्रगतीसाठी योगदान दिले जात आहे.


Spread the love
Previous articleINSV Tarini Crosses Earth’s Most Remote Oceanic Point, Collects Crucial Ocean Data At Point Nemo
Next articleनिज्जर प्रकरणी क्लीन चिट, आता भारत-कॅनडा संबंध सुधारण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here