Israel: बंधक जिवंत असल्याचे समजताच, कुटुंबियांनी घेतला मोकळा श्वास

0

गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आलेले काही बंधक जिवतं असल्याचे समजताच, त्यांच्या कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला.
गेल्या आठवड्यातील, हमाससोबतच्या युद्धविराम करारानंतर मुक्त करण्यात आलेले हे बंधक एका वर्षाहून अधिक काळ गाझाच्या ताब्यात होते.

युद्धविरामाच्या कराराला 19 जानेवारी रोजी अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर, आतापर्यंत 19 इस्रायली बंधकांना मुक्त करण्यात आले आहे. बंदिवासातील त्यांच्या कठोर परिस्थितीच्या वृत्तांसह, दुसरीकडे ते जिवंत असल्याचे संकेत मिळाल्यामुळे, इस्रायलमधील त्यांच्या नातेवाइकांना ते पुन्हा भेटण्याची आशा बळकट झाली आहे. 8 फेब्रुवारी रोजी सुटका करण्यात आलेल्या तीन बंधकांची क्षीण दशा पाहून, अन्य बंधकांचे नातेवाईक त्यांचा तब्येतीविषयी चिंतीत होते.

7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान, अपहरण करण्यात आलेल्या 251 बंधकांपैकी किमान 10 बंधक जिवंत असल्याचे ठोस वृत्त समोर आले आहे.

नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमधून अपहरण करण्यात आलेली, 35 वर्षीय महिला एलकाना बोहबुत ही त्यापैकीच एक आहे. अपहरणानंतर काही तासांतच तिच्या बांधलेल्या रक्तबंबाळ चेहऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

जवळजवळ 500 दिवसांनंतर, गाझामधील बोगद्यात अडकलेल्या एका बंधकाने, मुक्त झालेल्या एका बंधकाच्या माध्यमातून, आपली पत्नी रिव्काला संदेश दिला की, “वॉरियर” नावाचे इस्रायली पॉप गाणे दररोज ऐक आणि धीर सोडू नकोस.”

“बंदिवासातील 500 भयंकर दिवस आता उलटून गेले आहेत आणि या आठवड्यात आम्हाला जीवनदान मिळाले आहे, त्यामुळे तू देवाचे आभार मान. मी जिवंत आहे पण अमानवीय परिस्थितींमध्ये कष्ट भोगत आहे, लवकरच आपली भेट होईल” असेही त्याने सांगितले.

“मी तुमच्याशी वचन देते की आम्ही तुम्ही परत येईपर्यंत थांबणार नाही. आम्ही तुमच्यावर कधीही हार मानणार नाही. तुटू नकोस, माझ्या प्रिय. लवकरच तुम्ही घरी येऊ. लवकरच या भयानक स्वप्नाचा अंत होईल,” ती म्हणाली, रडत आणि हसत, तेल अवीवमधील एक साप्ताहिक बंधक रॅलीच्या मंचावर.

दुसऱ्या एका बंधकानेही संदेश पाठविला, ज्याचे नाव आहे- अलोन ओहेल. 24 वर्षांचा हा पियानो वादक, हल्ल्यादरम्यान नोवा महोत्सवाच्या जवळच असलेल्या एका बॉम्ब शेल्टरमध्ये लपला होता आणि पुढे तो बंधक बनला.

त्याची आई इडिट म्हणाली, “की त्याला जखमी करून एका बंदीगृहात बेड्या घालून ठेवले गेले आहे आणि तो अन्नाच्या एका तुकड्यावर जगतो आहे. पण तरी या परिस्थीतही तो, मुक्त झालेल्या एका बंधकाद्वारे आपल्या बहिणीसाठी वाढदिवसाचा संदेश पाठवू शकला, याचे खूप मोठे समाधान आहे.” यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

सूर्या गंगाधरन
रॉयटर्सच्या इनपुट्ससह


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here