इस्रायल सध्या सीरियातील ‘गोलान हाईट्स’ या प्रदेशात आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्लॅनिंग करत आहे. एका आठवड्यापूर्वी Syria चे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना पदच्युत करणाऱ्या बंडखोर नेत्यांची हालचाल थोडीशी मंदावली असली, तरी सीरियाकडून इस्रायलला धमक्या येणं अजूनही सुरु असल्याचे सांगत, इस्रायलने सीरियातील ‘Golan Heights’ या त्यांनी स्वत: व्यापलेल्या प्रदेशातील लोकसंख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
“गोलान हाईट्स हा प्रदेश बळकट करणे, म्हणजे इस्रायलची ताकद बळकट करण्यासारखे आहे आणि सीरियातील सद्य परिस्थीत हे करणे आवश्यक असून, आम्ही आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या निर्णयावर ठाम राहू, असे इस्रायलचे् पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
इस्रायलने 1967 मध्ये चाललेल्या सहा दिवसांच्या युद्धात, सीरियाकडून गोलान हाइट्सवरील बहुतेक मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवला होता आणि त्यानंतर 1981 मध्ये ही सर्व ठिकाणं एकत्रितरित्या जोडली गेली.
तर 2019 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, गोलानवरील इस्रायली सार्वभौमत्वासाठी अमेरिकेचे समर्थन घोषित केले होते. मात्र त्यावेळी बहुतांश देशांनी या विलनीकरणाला मान्यता दिली नव्हती. त्यावेळी सीरियाने इस्रायलकडे माघार घेण्याची विनंती देखील केली होती, मात्र सुरक्षेचे कारण देत इस्रायलने माघार घ्यायला नकार दिला होता. त्यावेळी केले गेलेले शांततेचे विविध प्रयत्न देखील अयशस्वी ठरले.
दरम्यान सद्य स्थितीवर बोलताना पंतप्रझान नेतन्याहू म्हणाले की, त्यांनी शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सीरियातील सुरक्षा घडामोडींबद्दल चर्चा केली आहे.
“आम्हाला सीरियाशी संघर्ष करण्यात जराही रस नाही,” असे नेतान्याहू यांनी एका निवेदनात म्हटले आहे. सीरियातील इस्रायली कारवाया, सीरियातील संभाव्य धोक्यांना आळा घालण्यासाठी आणि सीमेजवळील दहशतवादी घटकांच्या कारवाया रोखण्याच्या उद्देशाने आम्ही आमचे सैनिक तैनात ठेवल्याचे, ते रविवारी म्हणाले.
दरम्यान, संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सीरियात सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे इस्रायलचा भविष्यातील धोका वाढला आहे आणि म्हणून त्यांच्या या सर्व हालचाली सुरु आहेत.
दुसरीकडे नेतन्याहू यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या एका पत्रकात असे नमूद आहे की, गोलानमधील लोकसंख्या वाढीच्या प्रस्तावाला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने ’40-दशलक्ष-शेकेल’ (40-million-shekel) पेक्षा जास्त रकमेच्या एका सर्वव्यापी योजनेला एकमताने मंजुरी दिली आहे.
नेतन्याहू यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, “सीरियातील सध्याच्या आणि भविष्यातील वाढत्या बंडखोरीला तसेच युद्धजन्य परिस्थीतीला तोंड देण्याकरता आणि आमची तेथील पकड अधिक मजबूत करण्याकरता आम्ही काही नवीन योजना आखत असून, त्यातीलच एक योजना म्हणून गोलानची लोकसंख्या दुप्पट करण्याच्या इच्छेने” आम्ही हा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे.
सीरियात सुमारे 31 हजार इस्रायली नागरिक स्थायिक आहेत., असे ‘अल्मा रिसर्च अँड एज्युकेशन सेंटरचे’ विश्लेषक- अव्राहम लेव्हिन यांनी सांगितले आहे. लेव्हिन हे इस्रायलच्या उत्तर सीमेवरील सुरक्षा आव्हानांसंबधित अभ्यासक आणि विशेषज्ञ आहेत.
सीरियात स्थायिक असलेल्या इस्रायली नागरिकांपैकी अनेक लोक हे द्राक्षबागांसह अन्य प्रकारची शेती करतात, तसेच पर्यटन क्षेत्रातही अनेक इस्रायली लोक कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सीरियाच्या गोलानमध्ये असलेला ’24 हजार द्रुझ, अरब’ हा अल्पसंख्याक गट हा इस्रायलची एक शाखा आहे, असंही लेव्हिन यांनी सांगितले.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)