ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या आवाहनानंतरही, इस्रायलचा गाझावर भीषण हल्ला

0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी इस्रायलला गाझावरील हल्ले थांबवण्याची विनंती केल्यानंतरही, शनिवारी इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यांत डझनभर लोक मारले गेले, अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगतिले.  

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असेले गाझा युद्ध संपवण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेनुसार, हमासने गाझामधील ओलिसांना मुक्त करण्याची तयारी दर्शवल्यानंतर, ट्रम्प यांनी इस्रायलकडे ही मागणी केली होती.

पुढील आठवड्यात इजिप्तमध्ये युद्धविराम चर्चेला प्रारंभ होणार असून, त्याआधी ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवरुन जाहीर केले की, “इस्रायलने गाझामधील “माघाराच्या प्रारंभिक प्रस्तावावर” सहमती दर्शविली असून, जेव्हा हमास याची पुष्टी करेल, तेव्हा तात्काळ युद्धविराम लागू केला जाईल.”

“डझनभर लोक ठार”

शुक्रवारी उशिरा, ट्रम्प यांनी इस्रायलला त्यांचे हल्ले थांबवण्यास सांगितले, तेव्हापासूनच उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये बॉम्बींग आणि हवाई हल्ल्यांना सुरुवात झाली, ज्यामध्ये 36 लोक मारले गेले.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “मरण पावलेल्यांपैकी 18 लोकांचा मृत्यू तुरळक घटनांमध्ये झाला, तर गाझा शहराच्या तुफ्फाह परिसरात एका घरावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात लहान मुलांसह 18 लोक मारले गेले आणि अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यात जवळपासच्या अनेक इमारतींचे देखील नुकसान झाले.”

इस्रायलच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हमासच्या एका दहशतवाद्याला लक्ष्य करून हे हल्ले केले होते, जो या भागातील त्यांच्या सैन्यासाठी धोका निर्माण करत होता. दरम्यान, हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या अहवालांचा आढावा घेतला जात असल्याचेही इस्रायलने सांगितले.

इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, “ते निरपराध नागरिकांना झालेल्या हानीबद्दल खेद व्यक्त करतात आणि निरपराध लोकांचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी प्रयत्नही करत आहेत”

तर, हमासने त्यांच्या एका निवेदनात इस्रायली पंतप्रधानांचा उल्लेख करत म्हटले आहे की: “इस्रायलकडून होणारे हल्ले आणि नरसंहार अजूनही सुरूच असल्यामुळे, सामान्य नागरिकांच्या लष्करी कारवाया कमी केल्याबाबतचा नेतान्याहू यांचा खोटेपणा उघड होतो.”

जलद हालचाल करण्यासाठी ट्रम्प यांचा हमासवर दबाव

शनिवारी पहाटे, ट्रम्प यांनी “इस्रायलने तात्पुरते बॉम्बिंग थांबवल्याबद्दल ते त्यांचे कौतुक केले आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला, अमेरिकेच्या योजनेवर लवकरात लवकर काम करण्याचे आवाहन केले, अथवा सर्व काही संपेल,” असा इशारा दिला.

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरून जाहीर केले की, “अनेकांना असे वाटते की, या प्रक्रियेत विलंब होईल मात्र मी विलंब सहन करणार नाही, गाझा पुन्हा धोका निर्माण करेल अशा कोणत्याही परिणामांना मी बधणार नाही. हे काम जलद गतीने पूर्ण करूया. प्रत्येकाला योग्य वागणूक दिली जाईल.”

शुक्रवारी, हमासने ट्रम्प यांच्या 20 कलमी शांतता प्रस्तावातील काही प्रमुख अटी स्विकारल्याचे जाहीर केले होते, ज्यामध्ये- युद्ध समाप्ती, इस्रायलची माघार आणि गाझातील इस्रायली ओलिसांची तसेच पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणे या अटींचा समावेश होता.

परंतु, हमासने काही मुद्दे पुढील वाटाघाटीसाठी प्रलंबित ठेवले आहेत. तसेच, युद्ध संपवण्यासाठी इस्रायलने केलेल्या निश:स्त्रीकरण प्रमुख मागणासाठी त्यांची तयारी आहे की नाही, यासारख्या काही प्रश्नांची उत्तरे अद्याप दिलेली नाहीत.

शनिवारी, ट्रम्प यांनी पोस्ट करत सांगितले की: “वाटाघाटीनंतर, इस्रायलने प्रारंभिक माघारीच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली आहे, जी मान्य करण्यासाठी हमासनेही काही अंशी तयारी दाखवली आहे, एकदा हमासने त्याला पूर्ण सहमती दिली का युद्धविरामाची तात्काळ अंमलबजावणी होईल. ओलिसांची आणि कैद्यांची देवाणघेवाण सुरू होईल आणि आम्ही माघार घेण्याच्या पुढील टप्प्यासाठी हालचाल सुरू करु.” यााबबत ट्रम्प यांनी, अधिक स्पष्टीकरण दिले नाही.

याबाबत इस्रायलकडून त्वरित कोणतीही पुष्टी करण्याल आलेली नाही, हमासने पुढील टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीलाही त्यांनी त्वरित प्रतिसाद दिलेला नाही.

ट्रम्प यांच्या पोस्टपूर्वी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरचित्रवाणीवरील निवेदनात सांगितले की, “योजनेच्या पहिल्या टप्प्यात हमासने ओलिसांना मुक्त करणे आणि इस्रायली सैन्याने “गाझा पट्टीच्या आत खोलवर असलेल्या सर्व नियंत्रण क्षेत्रांवर ताबा ठेवणे” आवश्यक आहे.”

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ओलिसांच्या सुटकेचे तांत्रिक तपशील निश्चित करण्यासाठी आणि दीर्घकालीन शांतता करारावर चर्चा करण्यासाठी ट्रम्प त्यांचे दूत, स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनेर यांना इजिप्तला पाठवणार आहेत. इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयच्या म्हणण्यानुसा, “सोमवारी इजिप्तमध्ये इस्रायल आणि हमासचे शिष्टमंडळ देखील उपस्थित राहील.”

“या वाटाघाटी काही दिवसांपुरत्या मर्यादित ठेवण्याचा, इस्रायल आणि अमेरिकेचा हेतू आहे. 6 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या ‘सुकोत’ या ज्यू सणादरम्यान, कैद्यांच्या परतीची घोषणा करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली असून, इस्रायली सैन्य गाझामध्ये खोलवर राहील,” असे नेतान्याहू म्हणाले.

ट्रम्प यांच्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात, हमासचे नि:शस्त्रीकरण आणि गाझाचे असैनिकीकरण केले जाईल, असेही नेतन्याहू म्हणाले,. हे राजकीय किंवा लष्करी मार्गाने होईल असा इशारा त्यांनी दिला. ट्रम्प यांच्या योजनेनुसार, लष्कर अखेरीस गाझाच्या परिघापर्यंत माघार घेताना दिसते, परंतु यासाठी त्यांनी वेळेची कोणतीही मर्यादा दिलेली नाही.

युद्ध संमाप्तीच्या कराराच्या समर्थनार्थ, तेल अवीवच्या रस्त्यावर हजारो लोक उतरले असताना पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले.

हामासच्या या योजनेवरील प्रतिसादामुळे जागतिक नेत्यांकडून आशादायक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. ज्यांनी 1948 मध्ये, इस्रायलच्या स्थापनेनंतर घडलेल्या सर्वात प्राणघातक संघर्षाच्या समाप्तीचे आवाहन केले होते, त्यांनी गाझा पट्ट्यात अद्यापही बंदिवासात असलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेची मागणी केली आहे.

शांततेच्या प्रयत्नांना संभाव्य चालना देणारे, इराण-समर्थित एका पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद गटाकडून आणखी एक समर्थनात्मक विधान आले आहे, हा गट हमासपेक्षा लहान आहे मात्र याकडे अधिक कट्टरपंथीगट म्हणून पाहिले जाते. नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या या गटाने, शनिवारी हमासच्या प्रतिसादाल समर्थन दिले.

हमासच्या या भूमिकेमुळे गाझावासीयांचा उत्साह वाढू शकतो, कारण गेल्या दोन वर्षांत झालेल्या इस्रायली हल्ल्यांदरम्यान, एकामागून एक युद्धबंदीचे प्रयत्न अयशस्वी झाले होते, ज्यामुळे मानवतावादी संकट निर्माण झाले होते आणि लाखो लोक विस्थापित झाले होते.

दरम्यान, काही पॅलेस्टिनी नागरिकांनी भीती व्यक्त केली की, इस्रायलच्या इतिहासातील सर्वात उजव्या विचारसरणीच्या सरकारचे नेतृत्व करणारे नेतान्याहू, युद्ध संपवण्याच्या कोणत्याही योजनेतून आयत्यावेळीस माघार घेऊ शकतात.

जेरुसलेमचे रहिवासी जमाल शिहादा म्हणाले की, “हमास आता शांततेच्या मागण्यांवर सहमत झाला आहे, मात्र नेतान्याहू यांनी आयच्यावेळी यातून माघार घेऊ नये किंवा यात कोणतेही फेरबदल करु नयेत.”

हे ‘भयानक युद्ध’ थांबवण्यासाठी जगभरातून समर्थन

इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या राजकीय नेत्यांनी गाझामधील आक्रमक कारवाया कमी करण्याचे निर्देश लष्कराला दिले आहेत.

या युद्धाचा अंत करण्यासाठी ट्रम्प यांनी मोठे राजकीय प्रयत्न केले आहेत, ज्यामुळे अमेरिकेचा मित्र असलेला इस्रायल आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक एकटा पडत आहे.

ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, “हमासने दीर्घकालीन शांततेसाठी तयारी दर्शवली आहे आणि त्यांनी नेतन्याहू यांच्या सरकारला गाझामधील हवाई हल्ले थांबवण्याचे आवाहन केले.”

आता स्थानिक पातळीवरही, नेतान्याहू यांच्यावरील युद्ध संपविण्यासाठीचा दबाव वाढतो आहे. ओलिस ठेवण्यात आलेल्या लोकांचे कुटुंबीय आणि युद्धाने त्रासलेली जनता, गाझामधील इस्रायलच्या मोहिमेत कोणतीही घट होऊ नये, असा आग्रह धरणाऱ्या त्यांच्या उजव्या आघाडीच्या कट्टरपंथी सदस्यांच्या मागण्यांचे समर्थन करत आहेत.

इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमासच्या नेतृत्वाखाली इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर गाझाने आक्रमण सुरू केले, ज्यामध्ये सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 251 जणांना गाझाला परत आणले गेले, असे इस्रायलच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. यावर इस्रायलचे म्हणणे आहे की, “अजूनही 48 ओलिस तिथेच आहेत, ज्यापैकी 20 जण जिवंत आहेत.”

गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायलच्या मोहिमेत गाझामध्ये 67,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक सर्वसामान्य, निष्पाप नागरिक आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअण्वस्त्र मर्यादा राखण्याच्या पुतिन यांच्या प्रस्तावाचे ट्रम्प यांच्याकडून स्वागत
Next articleपाणबुडीविरोधी जहाज Androth चे कमिशनिंग, नौदलाला मोठी चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here