KPMG Report 2025: एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील 10 ‘गेम चेंजिंग’ ट्रेण्ड्स

0

KPMG International च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या- “एरोस्पेस आणि डिफेन्स मधील उदयोन्मुख परिवर्तन 2025” या अहवलानुसार, जागतिक एरोस्पेस आणि संरक्षण (A&D) क्षेत्र एका निर्णायक बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे. भू-राजकीय तणाव, तांत्रिक क्रांती आणि बदलत्या बाजार मागण्यांच्या पार्श्वभूमीवर, या क्षेत्राला आकार देणाऱ्या दहा महत्त्वपूर्ण निर्णयांचा (ट्रेंड्सचा) अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.

इतिहासात संरक्षण क्षेत्रावर सरकारच्या खर्चाचे व दीर्घकालीन धोरणांचे वर्चस्व राहिले असले तरी, आज हे क्षेत्र वेग, सहकार्य आणि अनुकूलतेने परिभाषित होत आहे. KPMG चा हा अहवाल क्षेत्रातील दिग्गज, धोरणकर्ते आणि जागतिक एरोस्पेस नेटवर्ककडून मिळालेल्या अंतर्दृष्टीवर आधारित असून, येणाऱ्या संधी आणि आव्हानांसाठी एक स्ट्रॅटेजिक रोडमॅप तयार करतो.

दहा वर्षांचा बदल दहा ट्रेण्ड्समध्ये संकलित

अहवालात नमूद करण्यात आलेले दहा निर्णायक ट्रेण्ड्स, एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्राच्या रूपांतरणामागे प्रमुख असतील:

भू-राजकीय अस्थिरता: जागतिक सत्ता-संतुलनात होणाऱ्या बदलात नवकल्पना आणि जलद प्रतिसाद देण्याची क्षमता राष्ट्रांसाठी महत्त्वाची ठरेल.

पुरवठा साखळीची लवचिकता: अलीकडील जागतिक अडथळ्यांमुळे लवचिक आणि पर्यायी पुरवठा नेटवर्क तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

शाश्वततेची गरज: हवामान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हरित तंत्रज्ञान आणि ऊर्जा-कार्यक्षम उपायांत क्षेत्रातील सहकार्य आवश्यक आहे.

स्टार्टअप स्केल-अप: संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढत असली तरी, नवकल्पनांना उत्पादनयोग्य स्वरूप देणे हे मुख्य आव्हान आहे.

जलद R&D सायकल्स: तांत्रिक प्रगतीच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी सार्वजनिक संरक्षण संस्थांना खरेदी प्रक्रिया गतीमान करावी लागेल.

डिजिटल वेग: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स आता अनिवार्य घटक बनले आहेत.

स्मार्ट M&A (विलिनीकरण आणि अधिग्रहण): वाढत्या बाजारमूल्यांच्या पार्श्वभूमीवर M&A चे उद्दिष्ट केवळ संकलन नव्हे, तर मूल्यनिर्मिती आहे.

वर्कफोर्स ट्रान्सफॉर्मेशन: उच्च-विशिष्ट उद्योगात कुशलतेची कमतरता भरून काढण्यासाठी नवीन प्रतिभा धोरण आवश्यक आहे.

एकत्रित संरक्षण डोमेन: भविष्यातील संघर्षात जमीन, समुद्र, आकाश, सायबर आणि अंतराळ या सर्व क्षेत्रांची एकात्मिक क्षमता निर्णायक ठरेल.

व्यावसायिक स्पेस शर्यत: अंतराळ ही आता केवळ अंतिम सीमारेषा राहिलेली नसून, ती आर्थिक संधी आणि तांत्रिक नेतृत्वाचे मैदान बनली आहे.

जागतिक A&D मध्ये भारताची वाढती भूमिका

KPMG इंडियाचे एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्राचे इंडस्ट्री लीडर- गौरव मेहंदीरत्ता यांनी, या अहवालावर भाष्य करताना सांगितले की: “भू-राजकीय अस्थिरता, वेगवान तांत्रिक बदल आणि लवचिक पुरवठा साखळीची गरज असलेल्या युगात, एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्र एका निर्णायक वळणावर उभे आहे. जागतिक संरक्षण खर्च 40 वर्षांत सर्वोच्च पातळीवर पोहोचलेला असताना, राष्ट्रांनी औद्योगिक स्वायत्ततेच्या दिशेने पावले टाकली आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “भारताने स्वदेशी संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि शाश्वत नवप्रवर्तनात नेतृत्व मिळवण्यासाठी, एक भविष्यकालीन धोरणात्मक चौकट तयार करणे आवश्यक आहे. आगामी संरक्षण खरेदी धोरण राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यापक उद्दिष्टांशी संरेखित करणे आणि खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणे हे महत्त्वाचे आहे.”

खासगी क्षेत्राचे वाढते महत्त्व

अहवालात आणखी एक महत्त्वपूर्ण बाब अधोरेखित केली आहे, ती म्हणजे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अंतर कमी होणे. संरक्षण तंत्रज्ञानातील स्टार्टअप्सना भांडवली पाठिंबा मिळत असताना, बहुराष्ट्रीय कंपन्याही डिजिटल संरक्षणात गुंतवणूक वाढवत आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्रातील खेळाडूही आता राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणांत केंद्रस्थानी येत आहेत.

अहवालात इशारा दिला आहे की, ‘वाढते भू-राजकीय संघर्ष, सायबर हल्ल्यांचे धोके, हवामान संबंधित संकटे आणि संसाधनांवरील स्पर्धा हे जागतिक पुरवठा साखळीवर सतत दडपण आणतील. संरक्षण कंपन्यांनी स्टार्टअप्सच्या लवचिकतेला औद्योगिक उत्पादनाच्या प्रमाणात जोडलेले मिश्रित धोरण स्वीकारणे गरजेचे आहे.’

ठहा अहवाल उद्योग नेत्यांसाठी एक रणनीतिक दिशादर्शक ठरतो, जो जागतिक क्षेत्रातील पायोनियर्सच्या अंतर्दृष्टीसह केपीएमजीच्या सखोल क्षेत्रीय ज्ञानाचे एकत्रीकरण करतो,” असे KPMG चे म्हणणे आहे.

डिजिटल डिफेन्स, स्वायत्त पुरवठा साखळी आणि व्यावसायिक अंतराळ उपक्रमांमधील प्रगतीमुळे, आज भारत या जागतिक घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleTaiwan Displays New US Tanks Amid Annual War Games
Next articleभारत–नामिबिया यांची SACU सोबत जलद व्यापार करार करण्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here