लॉस एंजेलिसच्या जंगलातील वणव्याने -जो अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्ती ठरण्याची शक्यता आहे – आतापर्यंत 24 जणांचा बळी घेतला आहे, अग्निशमन दल सलग सहाव्या दिवशी म्हणजे रविवारीही जळत असलेल्या दोन जंगलातील वणवे आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
जोरदार वाऱ्यांमुळे पुन्हा आगीच्या ज्वाळा पेटण्यापूर्वी बचावकर्त्यांनी धोकादायक परिस्थितीत थोड्याशा विश्रांतीचा फायदा घेतला.
जंगलातील या वणव्यांनी हजारो घरे उद्ध्वस्त केली असून 1लाख लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले आहे.
या अग्नितांडवाने संपूर्ण परिसरात धगधगते अवशेष बघायला मिळत आहेत. श्रीमंत आणि सेलिब्रिटीज् तसेच सर्वसामान्य लोकांची घरे हा भेद सम पातळीवर आला असून सर्वत्र सर्वविनाशकारी दृश्य दिसत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की 12 हजार इमारतींचे नुकसान झाले आहे किंवा त्या नष्ट झाल्या आहेत. लॉस एंजेलिस काउंटीचे पर्यवेक्षक लिंडसे होर्वाथ म्हणाले, “एलए काउंटीची ही आणखी एक अकल्पनीय भीतीदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी रात्र होती.”
अग्निशमन दलाचे यश
हवाई अग्निशमन दलांपैकी काही पॅसिफिक महासागरातून पाणी काढत त्याचा आणिअग्नि मंदावणारे पदार्थ यांचा मारा केला, तर जमिनीवरील कर्मचाऱ्यांनी त्यांची नेहमीची साधने आणि पाण्याचे पाईप्स यांच्या साहाय्याने पॅलिसेड्स वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला कारण लॉस एंजेलिसच्या उच्चभ्रू ब्रेंटवुड विभाग आणि इतर नागरी भागात याचे स्वरूप अनियंत्रित झाले होते. शहराच्या पश्चिमेकडील या आगीने 23 हजार 713 एकर (96 चौरस किमी) किंवा 37 चौरस मैल व्यापले आहेत आणि आतापर्यंत केवळ 11 टक्केच आग आटोक्यात आणता आली आहे
या आकडेवारीवरून अग्निशमन दलाच्या तिथली परिस्दिती नियंत्रणाखाली असून आगीच्या परिघाची टक्केवारी दर्शवते.
लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ईटन वणव्यात आणखी 14 हजार 117 एकर (57 चौरस किमी) किंवा 22 चौरस मैल-जो जवळजवळ मॅनहॅटनच्या आकाराचा परिसर होता-जळून खाक झाला. अग्निशमन दलाने त्यावर 27 टक्क्यांपर्यंत नियंत्रण मिळवले असून, एका दिवसापूर्वी ते 15 टक्के इतकेच होते.
शहराच्या उत्तरेस, हर्स्ट वणवा 89 टक्के आटोक्यात आला असून काउंटीच्या इतर भागांना उद्ध्वस्त करणारे इतर तीन वणवे आता आटोक्यात आल्याचे कॅलिफोर्नियाच्या वन आणि अग्नि संरक्षण विभागाने (कॅल फायर) नोंदवले आहे, मात्र नियंत्रण मिळवलेल्यांपैकी काही भाग अजूनही धुमसत आहेत.
वाऱ्यांची तीव्रता वाढली
या आठवड्याच्या शेवटी अग्निशमन दलाला त्यांच्या कामातून तात्पुरती विश्रांती मिळाली कारण आठवड्याच्या सुरुवातीला चक्रीवादळापर्यंत पोहोचलेले सांता आनाच्या वाऱ्यांचा जोर अखेरीस कमी झाला. देशांतर्गत वाळवंटातून उगम पावलेल्या कोरड्या वाऱ्यांमुळे ज्वाला आणखी पेटत गेल्या आणि पुढे 2 मैल (3 किमी) पर्यंत त्याच्या ठिणग्या उडत होत्या
मात्र, ज्या भागात एप्रिलपासून कोणताही पाऊस पडलेला नाही, त्या भागात रविवारी रात्री 50 ते 70 मैल प्रतितास (80 ते 112 किमी प्रतितास) वेगाने वारे वाहू लागतील आणि बुधवारपर्यंत त्यांचा जोर कायम राहील असा राष्ट्रीय हवामान सेवेचा अंदाज आहे.
अधिकाऱ्यांनी लॉस एंजेलिस काउंटीच्या सुमारे 10 दशलक्ष रहिवाशांना चेतावणी दिली की कोणत्याही क्षणी त्यांना परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. रविवारपर्यंत, लॉस एंजेलिस काउंटीमधील 1लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तर आणखी 87 हजार नागरिकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा देण्यात आला होता.
लॉस एंजेलिस काउंटीचे अग्निशमन प्रमुख अँथनी मॅरोन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “कमी सापेक्ष आर्द्रतेसह वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे संपूर्ण लॉस एंजेलिस काउंटीमध्ये आगीचा धोका खूप जास्त वाढला आहे,” लाल बावट्याचा इशारा जोवर मागे घेतला जात नाही तोपर्यंत रिकामे करण्यात आलेले भाग पुन्हा उघडले जाणार नाहीत.
अब्जावधींचे नुकसान, पुनर्बांधणीला प्राधान्य
न्यूजमने एनबीसी न्यूजला सांगितले की “फक्त त्याच्याशी संबंधित खर्चाच्या बाबतीत” विचार केला तर हे वणवे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती असण्याची शक्यता आहे. लॉस एंजेलिस काउंटीच्या वैद्यकीय परीक्षकाने आगीत 24 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.
खासगी हवामान अंदाज वर्तवण्यात AccuWeather ने 135 अब्ज ते 150 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके नुकसान आणि आर्थिक फटका बसल्याचा अंदाज लावला आहे.
आगीत भस्मसात झालेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी, न्यूजमने रविवारी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे नष्ट झालेली घरे आणि व्यवसायांच्या बांधणीसाठी पर्यावरणीय नियम तात्पुरते शिथिल केले गेले.
कर्तव्यावर असणारे लष्करी कर्मचारी अग्निशमन दलांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत, FEMA प्रशासक डीन क्रिसवेल यांनी रविवारी टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितले की, एजन्सीने रहिवाशांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यभरातील अग्निशमन विभागांना मदत करण्यासाठी सात राज्ये, कॅनडा आणि मेक्सिकोची अग्निशमन दले याआधीच लॉस एंजेलिस परिसरात एकत्र आले आहेत.
तीव्र घालमेल
ईटन वणव्याच्या काठावरील अल्टाडेनामध्ये, आग टेकडीवरून खाली जात असताना ते रिकामे करण्याच्या पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करत, ट्रिस्टिन पेरेझ याने कधीही आपले घर सोडले नाही, असे तो म्हणाला.
त्याऐवजी, पेरेझने त्याची मालमत्ता, त्याच्या शेजाऱ्यांची घरे वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा आग्रह धरला.
“तुमच्या समोरच्या अंगणात आग लागली आहे, खजुराची झाडे पेटली आहेत-ते एखाद्या चित्रपटातील काहीतरी असल्यासारखे दिसत होते,” पेरेझने त्याच्या एका मुलाखतीत रॉयटर्सला सांगितले.
“मी आग थांबवण्यासाठी, माझे घर वाचवण्यासाठी, त्यांची घरे वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.”
त्यामुळे त्याचा एक मजली पिवळा डुप्लेक्स बचावला. तसेच शेजारची आणखी दोन घरे वाचली.
रस्त्याच्या कडेने, संपूर्ण घरे जळून खाक झाली. “यापैकी बऱ्याच भागात अजूनही आगीचा मोठा फटका बसल्याचे दिसते. तेथे विजेच्या लाईव्ह वायर, गॅस लाईन्स आणि इतर असे अनेक धोके आहेत,” असे लॉस एंजेलिस काउंटीचे शेरीफ रॉबर्ट लुना यांनी सांगितले.
झुझाना कोर्डा हिची लॉस एंजेलिसच्या वायव्येस टोपांगा येथील फर्नवुड शेजारच्या तिच्या घरातून सुखरूप सुटका करण्यात आली. वेस्ट हॉलीवूड पब्लिक लायब्ररीमधील तात्पुरत्या सहाय्य कार्यालयाबाहेर बोलताना तिने सांगितले की तिच्या घरमालकाने तिला सांगितले की तिच्या कुटुंबाचे घर या आगीतून वाचले असून ते उभे आहे, मात्र तरीही ती चिंताग्रस्त होती.
“आम्ही सर्व काही मागे सोडून आलो आहोत. आमच्याकडे विमाही नाही,” असे कोर्डा म्हणाली. “आम्ही सर्व काही गमावण्यासाठी उभे आहोत.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)