एमडीएलच्या नव्या संचालकांनी (पाणबुडी) पदभार स्वीकारला

0

भारतीय नौदलाचे निवृत्त पाणबुडीचालक कमोडोर शैलेश भालचंद्र जामगावकर यांनी 25 मार्च 2025 पासून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे संचालक (पाणबुडी आणि अवजड अभियांत्रिकी) म्हणून पदभार स्वीकारला. एमडीएलने भारतीय नौदलाच्या स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्यांसाठी पहिल्या एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन (एआयपी) प्रणालीचे उत्पादन सुरू केल्यानंतर आठवडाभरातच कमोडर जामगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाणबुडीविषयक कार्यक्रमांचा व्यापक अनुभव

पी75 अतिरिक्त पाणबुडी प्रकल्प, स्कॉर्पीन पाणबुड्यांवर एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन (एआयपी) प्रणालीची स्थापना आणि महत्त्वपूर्ण पाणबुडी उपकरणांचे स्वदेशीकरण यासह महत्त्वपूर्ण उपक्रमांचे नेतृत्व करत, कमोडर जामगावकर यांनी एमडीएलच्या पाणबुडी कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्याचे पद स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एमडीएलच्या ईस्ट यार्डमध्ये कार्यकारी संचालक (सेवा) म्हणून काम केले. भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये ते कार्यकारी संचालक (तांत्रिक-ईवाय) म्हणून शिपयार्डमध्ये रुजू झाले. त्यांचा व्यापक अनुभव आणि नेतृत्व, संस्थेची धोरणात्मक क्षमता वाढवण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.

नौदल आणि तांत्रिक पार्श्वभूमी

कमोडोर जामगावकर यांनी गुजरातच्या बिर्ला विश्वकर्मा महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून भारतीय नौदलात रुजू झाल्यानंतर बीएआरसी, मुंबई येथून अणु तंत्रज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

भारतीय नौदलाच्या पाणबुडी शाखेत 29 वर्षांच्या सेवेसह त्यांनी समुद्रात आणि किनाऱ्यावर विविध परिचालन आणि तांत्रिक भूमिका पार पाडल्या आहेत. भारतीय नौदलासाठी अपारंपरिक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आणि कार्यान्वित करण्यातही ते सक्रियपणे सहभागी होते.

कार्यकाळ आणि धोरणात्मक परिणाम

एमडीएलने म्हटले आहे की कमोडोर जामगावकर हे 30 एप्रिल 2027 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर राहतील.

एमडीएलने एआयपी प्लग बांधकामाची प्रगती करत असतानाच्या निर्णायक वेळी त्यांचे नेतृत्व अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. एआयपी प्रणाली त्यांच्या नियोजित दुरुस्ती दरम्यान प्रकल्प 75 पाणबुड्यांमध्ये समाकलित केली जाईल. यामुळे पाणबुडीची सहनशक्ती आणि परिचालन क्षमता लक्षणीयरीत्या वाढून भारताचे सागरी संरक्षण बळकट होईल अशी अपेक्षा आहे.

डिसेंबर 2024 मध्ये, संरक्षण मंत्रालयाने डीआरडीओने विकसित केलेल्या एआयपी प्लगला पारंपरिक पाणबुड्यांमध्ये बसवणे आणि एकात्मिक करणे यासाठी एमडीएलसोबत 1 हजार 990 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, जो भारताच्या स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

टीम भारतशक्ती

 


Spread the love
Previous articleरशिया-युक्रेनची Black Sea संघर्षविरामाला सहमती, अमेरिकेची विशेष मागणी
Next articleचीन हा अमेरिकेसाठी सर्वोच्च लष्करी आणि सायबर धोका: इंटेलचा अहवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here