इस्रायलकडून आता लष्करी हल्ल्याची तयारी तर लेबनॉन सैन्याची माघार

0
इस्रायलकडून
30 सप्टेंबर 2024 रोजी इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून इस्रायल लिमिटेड ग्राउंड ऑपरेशन्सची योजना आखत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर इस्रायली सैनिक आणि चिलखती रणगाडे लेबनॉनच्या सीमेजवळचे दिसून आले. (जिम उर्कहार्ट/रॉयटर्स)

इस्रायलकडून आता लेबनॉनमध्ये लष्कर पाठवण्याची तयारी सुरू असल्याची चिन्हे सोमवारी दिसून आली. इराण समर्थित हिजबुल्लाहवर गेले दोन आठवडे करण्यात आलेल्या हल्ल्यांची परिणती त्याचा नेता सय्यद हसन नरसल्लाहच्या हत्येमध्ये झाली.

इस्रायलला लागून असलेल्या दक्षिण सीमेवरील ठाण्यांवरून लेबनॉनच्या सैन्याने सीमेच्या उत्तरेस किमान पाच किलोमीटर अंतरापर्यंत माघार घेतल्याचे लेबनॉनच्या सुरक्षा सूत्रांनी सोमवारी रॉयटर्सला सांगितले.

इस्रायली माध्यमांनी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांचा हवाला देत लेबनॉनच्या सीमेजवळ चिलखती तुकड्यांच्या सैनिकांना सांगितले की, “नरसल्लाहचा मृत्यू हे एक महत्त्वाचे पाऊल आहे परंतु हा शेवट नाही-उत्तरेकडील रहिवाशांना तुमच्यासह सुरक्षितपणे त्यांच्या घरी परत आणण्यासाठी आम्ही आमच्या सर्व क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेऊ.”

इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या सीमेजवळील उत्तर इस्रायलमधील मेटुला, मिसगाव अम आणि कफर गिलाडी या समुदायांच्या आसपासचे भाग आता बंद करण्यात आलेले लष्करी क्षेत्र म्हणून घोषित केले असून या भागात प्रवेश करण्यास मनाई असल्याचे सांगितले.

दक्षिण लेबनॉनमध्ये जमिनीवरून घुसखोरीची शक्यता वाढत असल्याने घोषित केलेला हा निर्णय एकूण परिस्थितीच्या अंदाजानंतर घेण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.
इस्रायलच्या सीमेजवळ लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून लिमिटेड ग्राउंड ऑपरेशन्स करत असल्याची कल्पना इस्रायलने अमेरिकेला दिली असल्याचे परराष्ट्र विभागाने वॉशिंग्टनमध्ये सांगितले.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, “त्यांनी आम्हाला सांगितले आहे की ते सध्या सीमेजवळ हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून लहान स्वरूपात मोहिमा राबवत आहेत.”

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अमेरिकी अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की इस्रायली सैन्याच्या सध्याच्या हालचालींवरून असे सूचित होते की जमिनीवरून करण्यात येणारा हल्ला आता अटळ असेल.”

दोन आठवडे सातत्याने करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, हिजबुल्लाहच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या हत्यासत्रानंतर इस्रायलने  जमिनीवरील आक्रमण लवकरच सुरू होईल हे आणखी जोरकसपणे सूचित केले आहे.

मिलर म्हणाले की इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्धबंदीला अमेरिकेचा पाठिंबा आहेच, मात्र लष्करी दबावामुळे काही वेळा मुत्सद्देगिरी अधिक सक्षम होऊ शकतो. अर्थात लष्करी दबावामुळे काहीवेळा चुकीचा अंदाज वर्तवला जाणे किंवा अनपेक्षित परिणाम देखील होऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)

 


Spread the love
Previous articleIndia, Iran To Hold Joint Naval Drill In Persian Gulf
Next articleNew IAF Chief To Preside Over A Force At The Cusp Of Major Changes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here