भारतीय नौदलासाठी एल अँड टीकडून बहुउद्देशीय जहाज ‘उत्कर्ष’ची निर्मिती

0
भारतीय
एल अँड टीने 13 जानेवारी रोजी चेन्नईजवळील कट्टुपल्ली शिपयार्ड येथे 'उत्कर्ष' या एमपीव्हीचे अनावरण केले

 

भारतीय नौदलाने 13 जानेवारी रोजी ‘उत्कर्ष’ या दुसऱ्या बहुउद्देशीय जहाजाच्या (एमपीव्ही) अनावरणामुळे स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रयत्नात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हे अनावरण चेन्नईजवळील कट्टुपल्ली शिपयार्ड येथे करण्यात आले. भारताच्या सागरी क्षमता वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

एल अँड टी शिपबिल्डिंग लिमिटेडने बांधलेल्या या जहाजाचे नाव उत्कर्ष-ज्याचा अर्थ ‘आचरणात उत्कृष्ट’ असा आहे-हे नौदलाच्या उत्कृष्टतेच्या दृष्टिकोनाचे मूर्त स्वरूप आहे. ‘आयएनएस समर्थक‘ या पहिल्या एमपीव्हीच्या प्रक्षेपणानंतर केवळ तीन महिन्यांच्या आत हे यश संपादन करता आले आहे. त्यामुळे एल अँड टीची कार्यक्षमता आणि वितरण कालमर्यादेसाठी असणारी वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.

अष्टपैलू क्षमता

3 हजार 750 टनांहून अधिक अपसारण (displacement) आणि 15 नॉट्सचा सर्वोच्च वेग असलेले, 106 मीटर लांबीचे, 18.6 मीटर रुंदीचे हे जहाज अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. उत्कर्ष हे जहाज खेचणे, विविध लक्ष्ये तयार करणे आणि पुनर्प्राप्त करणे, मानवरहित स्वायत्त वाहने चालवणे आणि स्वदेशी शस्त्रे तसेच सेन्सर्सच्या चाचण्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करण्यासाठी सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, हे जहाज सागरी पाळत ठेवणे, गस्त घालणे आणि आपत्ती निवारण कार्यात नौदलाच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करेल.

उत्कर्षचे अनावरण संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी भारतीय नौदलाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. एका निवेदनात संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, “हा प्रयत्न स्वदेशी जहाज बांधणीच्या दिशेने भारतीय नौदलाच्या प्रयत्नांच्या निमित्ताने आहे आणि खासगी भारतीय शिपयार्डद्वारे या जहाजाचे अनावरण हे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत, स्वदेशी जहाज बांधणीतील देशाची प्रगती दर्शवणारे आहे.

याप्रसंगी बोलताना, एल अँड टी प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टीम्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख ए. टी. रामचंदानी यांनी भारताच्या सागरी क्षमता पुढे नेण्यासाठी कंपनीच्या बांधिलकीवर प्रकाश टाकला.

नियोजित वेळेपूर्वी दुसऱ्या एमपीव्हीचे यशस्वी अनावरण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी एल. अँड. टीची असणारी अतूट बांधिलकी अधोरेखित करते. अतुलनीय अंतर्गत रचना आणि अंमलबजावणी कौशल्याने आम्ही भारतीय नौदलाच्या ताफ्याच्या विस्ताराच्या गरजांना पाठिंबा देण्यासाठी अत्याधुनिक संरक्षण मंच प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत,” असे रामचंदानी म्हणाले.

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग, युद्धनौकेचे उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक व्हाईस एडमिरल बी. शिवकुमार आणि भारतीय नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी या अनावरण समारंभाला उपस्थित होते. एल अँड टीच्या सीएमडीचे सल्लागार जयंत दामोदर पाटील आणि एल अँड टी प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टीम्सचे प्रमुख अरुण रामचंदानी यांची विशेष उपस्थिती होती.

उत्कर्षचे प्रक्षेपण भारताच्या नौदलाचे सामर्थ्य बळकट करून संरक्षण उत्पादनात देशाच्या वाढत्या क्षमतेचा पुरावा म्हणून काम करते. अशा उपक्रमांसह, भारत आत्मनिर्भरता आणि जागतिक सागरी नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articlePM Modi To Dedicate Three Cutting-Edge Naval Warships To The Nation
Next articleMassive Drone And Missile Strike From Ukraine Targets Russia

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here