दि. ३० मे: देशांतर्गत निर्मित सहाव्या ‘अम्युनेशन कम टॉरपॅडो कम मिसाईल बार्ज’चे (एसीटीसीएम-एलएसएएम-२०) बुधवारी नौदलाकडे हस्तांतर करण्यात आले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील सुर्यादिप्त प्रोजेक्ट्स या ठाण्यातील कंपनीने या बार्जची निर्मिती केली आहे. नौदलाच्या ११ ‘एसीटीसीएम-एलएसएएम-२०’ बार्ज उत्पादनाच्या प्रकल्पातील हा सहावा बार्ज आहे. नौदलाच्या मुमाबी येथील डॉकयार्डवर झालेल्या कार्यक्रमात हा बार्ज नौदलाकडे सोपविण्यात आला. कमोडोर नादेल्ला रामन हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी होते. हा बार्ज नौदल आर्मामेंट डेपो कारंजाकडे सोपविण्यात आला आहे.
Sixth ‘Ammunition Cum Torpedo Cum Missile Barge, LSAM 20′ built by #MSME Shipyard, M/s Suryadipta Projects Pvt Ltd, Thane delivered to #IndianNavy on #29May 24 at Naval Dockyard, Mumbai. The Ceremony was presided over by Cmde Nadella Ramana, GMR, ND(Mbi).@SpokespersonMoD pic.twitter.com/b1e1bEz8Yd
— SpokespersonNavy (@indiannavy) May 30, 2024
नौदलाच्या युद्धनौकांच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी या बार्जचा मोठा उपयोग होतो. खोल समुद्रात उभ्या असलेल्या नौदलाच्या नौकांना रसद पुरवठा करण्यासठी हे बार्ज वापरले जातात. या नौका बंदरावर आल्यास त्यांचा समुद्रातील वेळ वाया जातो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होण्याची शक्यता असते. हे बार्ज खोल समुद्रात उभ्या असलेल्या या युद्धनौकांना दारुगोळा, अन्न, पाणी आणि इतर रसद पुरवतात. त्यामुळे या युद्धनौकांना किनाऱ्यावर येण्याची गरज उरत नाही. युद्धनौकांवर रसद चढविणे आणि उतरविण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
हे बार्ज स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने देशांतर्गत उत्पादित करण्यात आले आहेत. त्याचे उत्पादन करताना नौदलाचे नियम आणि भारतीय जहाज नियंत्रक यांच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. निर्मिती प्रक्रियेत असताना या बार्जची विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली होती. सरकारच्या स्वदेशी, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणाचे हे बार्ज फलित असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
विनय चाटी
(पीआयबी इनपुट्ससह)