मालदीव चीन संरक्षण संबंध सुधारण्यासाठी दोनही देशांकडून प्रयत्न

0
Maldives
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू 10 जानेवारी 2024 रोजी बीजिंग, चीनमधील ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे स्वागत समारंभात उपस्थित होते. (रॉयटर्स/फाईल फोटो)

मालदीवच्या सांगण्यावरून एकीकडे भारताने आपले सैन्य मागे घेतले आहे तर दुसरीकडे मालदीव चीनबरोबर आपले लष्करी सहकार्य वाढवत आहे. अलीकडच्या काळात मालदीवमधील चिनी राजदूत वांग लिक्सिन यांनी देशाचे संरक्षण मंत्री घसन मौमून यांची भेट घेतली. मालदीव आणि चीन या दोन्ही देशांच्या संयुक्त सुरक्षसुरक्षेबाबत वाटणारी चिंता तसेच लष्करी संबंध मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर या दोघांनी चर्चा केली. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनीही या वर्षी मार्चमध्ये त्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्याचे मान्य केले होते. त्या करारानुसार, बीजिंगने मालदीवला लष्करी उपकरणांचा पुरवठा करणे आणि त्यांच्या सैनिकांना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. मुइझ्झू हे त्यांच्या चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जातात. याशिवाय त्यांनी त्यांच्या निवडणूक मोहीमेत भारतविरोधाचा नारा दिला होता.

दोन्ही देशांनी ‘चीन-मालदीव सर्वसमावेशक धोरणात्मक सहकारी भागीदारी’ संदर्भातील आराखडा तयार केला आहे. मालदीव हा चीनसाठी महत्त्वाचा आहे कारण चीनची तेल आयात मालदीव बेटांच्या साखळीतून किंवा त्याच्या अगदी उत्तरेकडून होते. मालदीवमध्ये मैत्रीपूर्ण सरकार असण्याने चीनला मोठीच मदत होत आहे. बीजिंगने मालदीवच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात मुख्यतः कर्जाद्वारे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.  याशिवाय तो मालदीवचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय कर्जदार आहे. चीनने मालदीवला आतापर्यंत 1.4 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. याशिवाय यंदाच चीनने मालदीवला गृहनिर्माण प्रकल्पासाठी 12.7 कोटी डॉलर दिले असल्याचे म्हटले जाते. भारतानेही ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणांतर्गत मालदीवला 2022 मध्ये 10 कोटी डॉलरचे कर्ज तर त्याआधी 2021 मध्ये 50 कोटी डॉलरचे कर्ज दिले होते.

राष्ट्रपती मुइझ्झू, ज्यांनी ‘इंडिया आउट’ ठेवण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिले होते, त्यांनी भारताला मालदीवमधील लष्करी जवानांना माघारी बोलवून त्यांच्या जागी नागरी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यास भारताला सांगितले होते. त्यानुसार भारताने 78 लष्करी कर्मचाऱ्यांच्या जागी हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडचे (एचएएल) नागरी कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी भारताने मालदीवला भेट दिलेल्या दोन प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स (एएलएच) ध्रुव आणि डोर्नियर-228 या विमानांची देखभाल करतील. ही तीन विमाने मालदीवच्या 9 लाख चौरस किलोमीटरच्या विशेष आर्थिक क्षेत्रावर (ईईझेड) गस्त घालणार आहेत. याशिवाय हवाई-वैद्यकीय उड्डाणासाठी मदत करणार आहेत. भारतीय सैन्याला परत पाठवण्यात आले तेव्हा मालदीवच्या सैन्यात प्रशिक्षित विमानचालक नव्हते.

ध्रुव यादव


Spread the love
Previous articleMaldives To Increase Defence Ties With China
Next articleISRO Chairman Inaugurates HAL Facilities, Boosting Rocket Manufacturing Capacity

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here