भारतीय नौदलात ‘निलगिरी’ आणि ‘सूरत’, या दोन प्रगत युद्धनौका दाखल

0
भारतीय
मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक जहाज- 'INS सूरत'

भारतीय नौदलात नुकत्याच दोन प्रगत युद्धनौका दाखल झाल्या असून,  ‘स्टेल्थ फ्रिगेट- INS निलगिरी (प्रोजेक्ट 17A)’ आणि ‘गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर- INS सूरत (प्रोजेक्ट 15B)’ अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ (MDL) ने, या युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केल्या. Indian Navy च्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने या जहाजांचे डिझाइन केले असून, मुंबईतील वॉरशिप ओव्हरसिंग टीमच्या देखरेखीखाली त्या बांधल्या गेल्या आहेत. या अत्याधुनिक जहाजांच्या येण्यामुळे, भारतीय नौदलाच्या युद्ध क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे.

INS सुरत: प्रकल्प 15B चे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक

INS सूरत (यार्ड 12707) हे जहाज, विशाखापट्टणम-क्लास डिस्ट्रॉयरचे चौथे आणि अंतिम स्टेल्थ-मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक (प्रोजेक्ट 15B) आहे. विशाखापट्टणम, मुरमुगाव आणि इम्फाळच्या आधी, 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात दिल्ली-श्रेणीच्या विनाशकांपासून सुरू झालेल्या नौदलाच्या स्वदेशी विनाशक-बिल्डिंग प्रवासाचा ‘कळस’ – म्हणजे ‘सुरत’ युद्धनौका.

7,400 टन विस्थापन आणि 164 मीटर लांबीसह, ‘सूरत’ युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्ससह सुसज्ज आहे. ज्यात पृष्ठभागावरून हवेत सोडली जाणारी क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि जलद-अग्नी प्रणाली यांचा समावेश आहे. चार गॅस टर्बाइन्स असलेल्या संयुक्त वायू आणि वायू (COGAG) प्रोपल्शन प्रणालीद्वारे समर्थित असलेले हे जहाज, 30 नॉट्स (56 किलोमीटर/ताशी) पेक्षा जास्त वेगाने मार्गक्रमण करु शकते. याव्यतिरिक्त, ‘सूरत’ जहाजाची ऑपरेशनल कार्यक्षमता वाढविण्यासाठी, प्रगत AI-तंत्कज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे ‘सूरत’ ही भारतीय नौदलातील पहिली AI-सक्षम युद्धनौका ठरली आहे.

भारतीय नौदलाच्या अहवालानुसार, जहाजाच्या बांधकामातील टप्पे पुढीलप्रमाणे: 7 नोव्हेंबर 2019 रोजी पायाभरणी, 17 मे 2022 ला लॉन्चिंग आणि विक्रमी 31 महिन्यांच्या कालावधीत जहाजाचे वितरण. विशेष बाब म्हणजे नियोजीत वेळेत काम पूर्ण झाल्यामुळे, ‘सूरत युद्धनौकेने आतापर्यंत तयार केलेल्या ‘सर्वात जलद स्वदेशी विनाशकाचे’ शीर्षक पटकावले आहे.

INS निलगिरी: प्रकल्प 17A चे पहिले स्टेल्थ फ्रिगेट

INS निलगिरी (यार्ड 12651) हे सात नियोजित प्रोजेक्ट, 17A स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी पहिले जहाज आहे, जे शिवालिक क्लास जहाजाचे उत्तराधिकारी आहे. “इंटीग्रेटेड कन्स्ट्रक्शन” तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले हे जहाज, ‘ब्लू वॉटर’ वातावरणात कार्य करू शकते आणि भारताच्या समुद्री सीमांचे, ज्ञात असलेल्या तसेच अप्रत्यक्ष धोक्यांपासून संरक्षण करु शकते.

संयुक्त डिझेल किंवा गॅस (CODOG) प्रोपल्शन प्रणालीने समर्थित, या जहाजात, कार्यक्षमतेसाठी एक अत्याधुनिक इंटीग्रेटेड प्लेटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम (IPMS) बसवण्यात आली आहे. हे जहाज सुपरसोनिक ते पृष्ठभागावरील क्षेपणास्त्रे, मिडियम रेंज पृष्ठभागापासून ते हवेतील क्षेपणास्त्रे आणि प्रगत क्लोज-इन वेपन सिस्टिम्सने सुसज्ज आहे.

निलगिरी जहाजाची पायाभरणी, 28 डिसेंबर 2017 रोजी झाली होती. 28 सप्टेंबर 2019 रोजी हे जहाज लॉन्च करण्यात आले आणि ऑगस्ट 2024 पासून झालेल्या अनेक शिपयार्ड आणि समुद्री चाचण्यांनंतर, अखेर हे जहाज आता कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाले आहे.

आत्मनिर्भरतेचे प्रमाण

ही दोन्ही जहाजे, 75 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीने बनली असून, या युद्धनौकांचे डिझाईन आणि त्याचे बांधकाम भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे प्रमाण देतात. BHEL, BEL, L&T, आणि Mahindra सारख्या प्रमुख भारतीय संरक्षण कंपन्यांच्या योगदनासह, 200 हून अधिक MSME (Micro, Small and Medium Enterprises) चा सहभाग, देशाच्या मजबूत औद्योगिक आणि तांत्रिक क्षमतांचे प्रमाण आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रकल्प 17A आणि प्रकल्प 15B या दोन उपक्रमांमुळे, भारतातील रोजगार, आर्थिक विस्तार आणि संरक्षण उत्पादन परिसंस्थेला चालना मिळाली आहे. उर्वरित सहा प्रोजेक्ट हे, ’17A फ्रिगेट्स MDL, मुंबई’ आणि ‘GRSE, कोलकाता’ येथे निर्मीती प्रक्रियेत असून, 2025 आणि 2026 मध्ये त्यांचे वितरण अपेक्षित आहे.

भारतीय नौदलामध्ये झालेला, ‘सूरत’ आणि ‘निलगिरी’ युद्धनौकांचा दुहेरी समावेश, भारताच्या सागरी सामर्थ्यातील एक महत्त्वपूर्ण झेप आहे. या सोबतच या द्विपक्षीय सहभागामुळे, भारतीय नौदलातील ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याची वचनबद्धता देखील अधोरेखित झाली आहे.

 


Spread the love
Previous articleU.S. To Announce New Military Aid Package For Ukraine Soon
Next article100 अतिरिक्त K9 Vajra-T तोफांसाठी, 7,629 कोटींच्या करारावर स्वाक्षरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here