भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) कॅनडाच्या ग्लोब अँड मेल वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तावर टीका करत एक धाडसी पाऊल उचलले आहे.
‘कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की मोदींना शीख कार्यकर्त्याच्या हत्येचा कट माहीत होता,” असे चिथावणीपूर्ण शीर्षक असलेल्या या बातमीत ‘नवी दिल्लीच्या गुप्तचर विभागातील कॅनडाशी संबंधित परदेशी हस्तक्षेप मोहिमेच्या मूल्यमापनावर काम करणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याचा’ उल्लेख आहे.
कॅनडा आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी या हत्येच्या कारवाईचा संबंध गृहमंत्री अमित शहा यांच्याशी जोडला असल्याचे बातमीत म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर हे देखील या कटात सहभागी झाले असल्याचा दावा यात करण्यात आला आहे.
संबंधित कॅनेडियन अधिकाऱ्याकडे मोदींना याबद्दल माहिती असल्याचा कोणताही थेट पुरावा नव्हता मात्र “भारतातील तीन वरिष्ठ राजकीय व्यक्तींनी पुढे जाण्यापूर्वी श्री. मोदी यांच्याशी या हत्येबद्दल चर्चा केली नसेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही,” असेही या वृत्तात नमूद केले आहे.
या वृत्तपत्राने पुढे म्हटले की, “भारताच्या परदेशी हस्तक्षेप मोहिमांशी जयशंकर यांचा संबंध येण्याची ही पहिलीच वेळ आहे.”
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही सामान्यतः प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर भाष्य करत नाही. मात्र, कॅनडाच्या सरकारी स्त्रोतांनी वर्तमानपत्रात केलेली अशी हास्यास्पद विधाने अवमान करत असल्याने फेटाळली पाहिजेत. अशा बदनामीच्या मोहिमा केवळ आपल्या आधीच ताणलेल्या संबंधांना आणखी नुकसान पोहोचवतात.”
कॅनडाची सहानुभूती असलेल्या खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत आमचा सहभाग असल्याच्या तुमच्या आरोपांसंदर्भात ठोस पुरावे घेऊन पुढे यावे, असे भारताने वारंवार म्हटले आहे. पण कॅनडाच्या लोकांनीही कबूल केले आहे की त्यांच्याकडे फक्त यासंदर्भातील गुप्तचर संघटनेने दिलेली माहिती होती, पुरावे नव्हते.
ग्लोब अँड मेलमधील बातमी भारताच्या या मताला दुजोरा देते की पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे सरकार पूर्णपणे देशांतर्गत असलेल्या आणि कदाचित त्यांच्या पदावर टिकून राहण्याशी संबंधित असलेल्या शक्तींद्वारे चालवले जात आहे.
अशा परिस्थितीत, परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात भारताबरोबरचे संबंध दुय्यम आहेत हे दिसते असा जो स्पष्टपणे उल्लेख केला आहे त्याचा प्रत्यय येतो. ग्लोब अँड मेलची बातमी कॅनडाच्या भारताविरुद्धच्या आरोपांमधील विश्वासार्हता वाढवत नाही किंवा द्विपक्षीय संबंधांना मदतही करत नाही.
सूर्या गंगाधर
(रॉयटर्स)