इस्रायलची गाझा नागरिकांना स्थलांतरित करण्याची योजना, हमासकडून निषेध

0
स्थलांतरित
जॉर्डनचे लष्करी कर्मचारी 17 ऑगस्ट 2025 रोजी गाझावर विमानातून पार्सल सोडतात. (रॉयटर्स/अला अल सुखनी)
गाझा शहरातील नागरिकांना स्थलांतरित करण्याची इस्रायलची योजना “नरसंहार आणि विस्थापनाची एक नवीन लाट” दर्शवणारी असून ती लाखो नागरिकांना प्रभावित करणारी असल्याचे पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने रविवारी जाहीर केले.

या गटाने म्हटले आहे की दक्षिण गाझामध्ये इस्रायलने तंबू आणि इतर निवारा उपकरणे तैनात करण्याची नियोजित योजना ही “उघडपणे फसवणूक” आहे.

स्थलांतर योजना

इस्रायली लष्कराने म्हटले आहे की ते रविवारपासून तंबू आणि इतर उपकरणे पुरवण्याची तयारी करत आहेत, कारण रविवारपासून रहिवाशांना “त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी” एन्क्लेव्हच्या दक्षिणेकडे स्थलांतरित करण्याची त्यांची योजना आहे.

इस्रायलने एन्क्लेव्हचे सर्वात मोठे शहरी केंद्र असलेल्या उत्तर गाझा शहरावर ताबा मिळविण्यासाठी नवीन आक्रमण सुरू करण्याचा मानस असल्याचे म्हटल्यानंतर काही दिवसांनी या घडामोडी घडल्या. या योजनेमुळे सुमारे 2.2  दशलक्ष नागरिक राहत असलेल्या उद्ध्वस्त पट्टीच्या भवितव्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली आहे.

हमासचा शेवटचा बालेकिल्ला

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गेल्या रविवारी सांगितले की, आक्रमण सुरू करण्यापूर्वी, गाझा शहरातील नागरिकांना “सुरक्षित क्षेत्र” म्हणून वर्णन केलेल्या ठिकाणी हलवले जाईल, ज्याला त्यांनी हमासचा शेवटचा बालेकिल्ला म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संस्थांकडून दक्षिण गाझामधील केरेम शालोम क्रॉसिंगद्वारे निवारा उपकरणे हस्तांतरित केली जातील, असे लष्कराने सांगितले.

‘पद्धतशीर फसवणूक’

हमासने एका निवेदनात म्हटले आहे की मानवतावादी उद्देशांच्या नावाखाली तंबूंची तैनाती करणे ही एक उघड फसवणूक आहे ज्याचा उद्देश “कब्जा करणाऱ्या सैन्याने अंमलात आणण्याची तयारी केली आहे अशा क्रूर गुन्ह्यावर पांघरूण घालणे” आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केल्यामुळे युद्धाला सुरूवात झाली, ज्यामध्ये बाराशे जण मारले गेले तर 251 जणांना ओलिस ठेवले गेले. गाझामधील उर्वरित 50 ओलिसांपैकी सुमारे 20 जण अजूनही जिवंत असल्याचे मानले जाते.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की हमासवर इस्रायलने केलेल्या त्यानंतरच्या लष्करी हल्ल्यात 61 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे, गाझाची बहुतेक लोकसंख्या अंतर्गतरित्या विस्थापित झाली असून एन्क्लेव्हचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअमेरिका-पाक व्यापार करार आणि अनाकलनीय ट्रम्प
Next articleJaishankar to Wang Yi: LAC Troop De-escalation Must Move Forward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here