न्यूझीलंड सरकारने काही स्थलांतरितांसाठी निवासी नियम शिथिल केले

0

न्यूझीलंड सरकारने मंगळवारी जाहीर केले की, आर्थिक वाढीला चालना देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ते स्थलांतरितांसाठी आणखी 2 निवासी मार्ग तयार करणार आहेत.

आर्थिक विकास मंत्री निकोला विलिस, यांनी एका निवेदनात म्हटले आहे की: “कुशल आणि अनुभवी स्थलांतरित कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यात आणि व्यवसाय वृद्धीला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.”

“व्यवसायिकांनी आम्हाला सांगितले की, काही स्थलांतरितांकडे महत्त्वाची कौशल्ये आणि पुरेसा अनुभव असूनही त्यांना निवास मिळवणे खूप कठीण जाते आहे, त्यामुळे आम्ही ही समस्या दूर करण्यावर काम करत आहोत,” असे त्या म्हणाल्या.

2026 च्या मध्यापासून, सरकार दोन वेगळे प्रवाह सुरू करेल: कौशल्यपूर्ण कामाचा अनुभव मार्ग (Skilled Work Experience pathway) आणि व्यापार आणि तंत्रज्ञ मार्ग (Trades and Technician pathway).

पहिला मार्ग- ANZSCO स्तर 1-3 अंतर्गत वर्गीकृत केलेल्या भूमिकांमधील स्थलांतरितांसाठी आहे, ज्यांच्याकडे संबंधित नोकरीचा किमान 5 वर्षांचा अनुभव (त्यापैकी किमान 2 वर्षे न्युझीलंडमध्ये काम केलेले असावे) आणि सध्याच्या सरासरी वेतनापेक्षा किमान 1.1 पट जास्त कमाई असावी.

दुसरा निवासी मार्ग- विशिष्ट व्यापार किंवा तांत्रिक व्यवसायातील लोकांसाठी आहे, ज्यांच्याकडे स्तर 4 किंवा त्याहून अधिक पात्रता आहे, आणि पात्रतेनंतर 4 वर्षांचा अनुभव आहे, ज्यामध्ये न्यूझीलंडमध्ये किमान 18 महिने सरासरी वेतनावर किंवा त्याहून अधिक काम केलेले असणे आवश्यक आहे.

नवीन मार्ग

निवेदनात म्हटले आहे की, “हे नवीन मार्ग कुशल कामगार, व्यापारी आणि तंत्रज्ञांसाठी आहेत, आणि त्यांना परदेशात तसेच न्यूझीलंडमध्ये संबंधित अनुभव असणे आणि पगाराच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.”

व्यवसाय समूहांनी या बदलाचे स्वागत केले आहे, त्यांचे म्हणणे आहे की. ‘यामुळे कामगारांची कमतरता भरून काढण्यास मदत होईल आणि कंपन्यांना दीर्घकाळासाठी योजना आखण्याचा आत्मविश्वास मिळेल.’

न्यूझीलंडची अर्थव्यवस्था, गेल्या 5 तिमाहीपैकी 3 तिमाहीत नकारात्मक वाढ नोंदवल्याने संघर्ष करत आहे आणि सरकारने देशात परदेशी गुंतवणूक वाढवण्यासह तिला समर्थन देण्यासाठी अनेक धोरणे आणली आहेत.

देशाचे एकूण स्थलांतर सकारात्मक असले तरी, 2022 मध्ये सीमा पुन्हा उघडल्यानंतर उच्च पातळीवर पोहोचलेली संख्या आता कमी झाली आहे, कारण मोठ्या संख्येने न्युझीलंडचे नागरिक देश सोडून जात आहेत.

सरकारचा मित्रपक्ष न्यूझीलंड फर्स्टने स्पष्ट सांगितले की, ‘ते या धोरणाचे समर्थन करत नाहीत.’

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleहाँगकाँगजवळ Ragasa चक्रीवादळाची धडक; विमानसेवा, व्यवसाय विस्कळीत
Next articleZen Technologies Unveils Fast Attack Craft AI Simulator for Naval Training

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here