नवी दिल्लीत UNTCC प्रमुखांच्या परिषदेत 30 हून अधिक देश सहभागी होणार

0
सामूहिक सुरक्षेसाठी जागतिक वचनबद्धतेचा एक शक्तिशाली पुनरुच्चार म्हणून, UN मध्ये योगदान देणाऱ्या देशांच्या (UNTCC) सैन्य प्रमुखांच्या भारताने आयोजित केलेल्या परिषदेसाठी 30 हून अधिक राष्ट्रे नवी दिल्लीत 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान एकत्र येतील. वरिष्ठ लष्करी नेते आणि संरक्षण अधिकाऱ्यांचा हा तीन दिवसांचा मेळावा UN च्या शांतता राखण्यात भारताच्या चिरस्थायी नेतृत्व भूमिकेवर आणि जागतिक शांतता कार्यात अधिक समानता आणि प्रभावीपणासाठीच्या त्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणारा ठरेल.

जागतिक स्तरावरील प्रतिनिधित्व, सामायिक वचनबद्धता

या परिषदेत अल्जेरिया, इथिओपिया, श्रीलंका, मलेशिया, घाना, फ्रान्स, नेपाळ, नायजेरिया, व्हिएतनाम, इटली आणि ब्राझीलपासून बांगलादेश, केनिया, उरुग्वे, मोरोक्को, भूतान आणि कंबोडियापर्यंत विविध देश एकत्र येतील. हे सहभागी देश प्रत्येक खंडाचे आणि शांतता राखण्याच्या अनुभवाच्या संपूर्ण श्रेणीचे प्रतिनिधित्व करतील.

अनेक देशांचे प्रमुख किंवा संरक्षण मंत्री उच्चस्तरीय राजकीय आणि कार्यात्मक वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतील.

त्यापैकी, उरुग्वे शांतता राखण्याचा लॅटिन अमेरिकेचा आधारस्तंभ म्हणून उभा आहे, राजदूत अल्बर्टो गुआनी यांनी दुजोरा दिला की लेफ्टनंट जनरल मारियो स्टेव्हानाझी नवी दिल्लीला येणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. उरुग्वेची लोकसंख्या कमी असूनही, उरुग्वेने डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो ((MONUSCO) आणि लेबनॉनमधील UNIFILसह आठ मोहिमांमध्ये 900 हून अधिक सैनिक तैनात केले आहेत-एक असा वारसा ज्याने 1952 पासून 23 आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये 55 हजारांहून अधिक उरुग्वेयन सैनिकांना सेवा देताना पाहिले आहे.

UN शांती मोहिमेत भारताचे योगदान

भारत हा सर्वात मोठा आणि सैन्यात सातत्याने योगदान देणारा देश आहे, सध्या संयुक्त राष्ट्रांच्या 9 मोहिमांमध्ये भारताकडून 5 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात आहेत. भारतीय शांती सैनिकांनी नेपाळ, घाना, बांगलादेश, इथिओपिया, केनिया, नायजेरिया आणि उरुग्वे येथील सैन्यांसोबत जगात उद्भवलेल्या काही संघर्षमय परिस्थितीत – दक्षिण सुदान आणि काँगोपासून लेबनॉनपर्यंत – काम केले आहे, ज्यामुळे दशकांपासून ऑपरेशनल सहकार्य आणि परस्पर विश्वास निर्माण झाला आहे.

आपल्या सेंटर फॉर युनायटेड नेशन्स पीसकीपिंगद्वारे (CUNPK)  भारत ग्लोबल साउथमधील महिला शांती सैनिकांवरील परिषदेसह (फेब्रुवारी 2025) भविष्यकालीन उपक्रम देखील चालवत आहे, जिथे शांती मोहिमेसाठी आवश्यक लिंग समावेशकता आणि नेतृत्व पुढे नेत आहे.

धोरणात्मक अजेंडा: सुधारणा, तंत्रज्ञान आणि प्रतिनिधित्व

UNTCC प्रमुखांची परिषद 2025 ही शांतता मोहिमेच्या भविष्याची पुनर्कल्पना करण्यासाठी एक धोरणात्मक मंच म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाईल:

  • बहुराष्ट्रीय सैन्यांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे;
  • किफायतशीर मोहीमेच्या समर्थनासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे;
  • संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेत सैन्याचे योगदान देणाऱ्या राष्ट्रांचे अधिक प्रतिनिधित्व आणि आवाज सुनिश्चित करणे; आणि
  • नागरिक आणि शांतता सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे.

अपेक्षित असणारे परिणाम

  • द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संरक्षण भागीदारी वाढवणे;
  • शांतता राखण्यासाठी आवश्यक सुधारणांच्या प्राधान्यांवर एकमत निर्माण करणे;
  • क्षमता-निर्मिती आणि प्रशिक्षण सहकार्यासाठी आवश्यक रचनेचा विस्तार करणे.

अधिक सुरक्षित, एकीकृत जागतिक शांतता राखण्याच्या चौकटीकडे

राजनैतिकदृष्ट्या असणारे महत्त्व याव्यतिरिक्त, UNTCC प्रमुखांची यंदाची परिषद ही आंतरराष्ट्रीय शांतता राखण्याच्या नैतिक आणि कार्यात्मक पाया मजबूत करण्यासाठी सैन्यदलाचे योगदान देणाऱ्या आघाडीच्या देशांच्या सामूहिक प्रतिज्ञाचे प्रतिनिधित्व करते. भारत, ब्राझील, फ्रान्स, घाना, टांझानिया आणि उरुग्वेसारख्या देशांसाठी, ही परिषद केवळ सामायिक वचनबद्धता प्रदर्शित करण्यासाठीचे एक व्यासपीठच नाही तर अधिक समावेशक, तंत्रज्ञान-सक्षम आणि लवचिक जागतिक शांतता रचनेला आकार देण्याची संधी देखील प्रदान करते.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleIndia’s Theatre Command Reform: From Rhetoric to First Steps
Next articleट्रम्प यांचे स्वप्न भंगले, मारिया मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here