रशियाने कीव्हवर केलेल्या हल्ल्यांमध्ये, 2 ठार आणि 13 जण जखमी: सूत्र

0

रशियाने कीव्हवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये 2 जण ठार आणि 13 जखमी झाले, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. राजधानीतील अनेक भागांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. 

रात्रभर झालेल्या या हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या आणि निवासी इमारतींचे नुकसान झाले, ज्यामध्ये एका किंडर गार्डनचाही समावेश आहे, असे शहर प्रशासनाने सांगितले.

“हे हल्ले पुन्हा एकदा आमच्या नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर निर्देशित केले गेले आहेत,” असे पंतप्रधान युलिया स्विरीडेंको यांनी X पोस्टद्वारे म्हटले.

“रशिया आता हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये मानवी संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” असेही ते म्हणाले.

युक्रेनचे परराष्ट्रमंत्री अँड्री सिबिहा यांनी सांगितले की, “रशियन क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सनी डिनिप्रो, खार्किव आणि सुमी या भागातही एनर्जी ग्रेड, रेल्वेमार्ग आणि घरे यांना लक्ष्य केले.”

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने टेलिग्रामवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “रात्रीच्या वेळी झालेले हे हल्ले, युक्रेनच्या लष्करी-औद्योगिक संकुलातील उद्योगांना आणि त्यांच्या ऑपरेशन्सना पाठिंबा देणाऱ्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करून करण्यात आले होते.

मंत्रालयाने अन्य एका स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, ‘त्यांच्या सैन्याने रात्रभरात 121 युक्रेनी ड्रोन पाडले, ज्यांपैकी सात मॉस्कोच्या दिशेने जात होते.’

पॅट्रियट प्रणाली

शनिवारी सकाळी, कीव्हच्या आकाशात मोठ्या प्रमाणात धूर दिसत होता, कारण अग्निशमन दल शहरभर लागलेल्या आगी विझवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धाव घेत होते.

दुपारपर्यंत, दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांनी 13,000 चौरस मीटर (सुमारे 1,40,000 चौरस फूट) गोदामातील आग आटोक्यात आणली आणि दुसऱ्या इमारतीतील आग विझवली.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, ‘रशियाच्या सततच्या हल्ल्यांपासून युक्रेनियन शहरांचे संरक्षण करण्यासाठी, या हल्ल्यांनी पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालींचे महत्त्व अधोरेखित केले आहे.’

“या वर्षाच्या सुरुवातीपासूनच, रशियाने युक्रेनवर सुमारे 770 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 50 पेक्षा जास्त ‘किन्झाल’ क्षेपणास्त्रे डागली आहेत,” असे झेलेन्स्की यांनी टेलिग्रामवर सांगितले.

पॅट्रियट प्रणालींनी, रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात प्रभावी परिणाम दाखवला आहे. सध्या युक्रेन अमेरिकेकडून 25 पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे.

युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, ‘रात्रीच्या हल्ल्यांमध्ये डागण्यात आलेल्या 9 क्षेपणास्त्रांपैकी चार आणि 62 ड्रोन्सपैकी 50 पाडण्यात आले.’

हवाई दलाने देशभरातील एकूण 11 ठिकाणी मिळून, 5 थेट क्षेपणास्त्र हल्ले आणि 12 ड्रोन हल्ल्यांची नोंद केली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleRajnath Singh to Attend ASEAN Defence Ministers’ Meeting in Malaysia; Bilateral Talks on Defence Exports Expected
Next articleFlying Through the Storm: India’s First Woman IAF Gallantry Award Winner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here